शहरं
Join us  
Trending Stories
1
विनाशाची ढगफुटी! पृथ्वी कोपली तर केलेल्या चुकांची माफी मागण्याची संधीदेखील देणार नाही
2
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
3
रशियाशी व्यापार केल्याबद्दल फक्त भारतालाच का लक्ष्य केले? ट्रम्प म्हणाले, 'आता फक्त ८ तास...'
4
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
5
पक्के घर देण्याचा वादा तीन वर्षांनंतरही पूर्ण हाेईना; महाराष्ट्रात ‘पीएम आवास’ ची २७ लाख घरे अद्याप अपूर्ण
6
डोनाल्ड ट्रम्पच्या प्रयत्नांनाही पुतिन बधले नाहीत! चीनसोबत युद्धाची तयारी सुरू; पुढे काय करणार?
7
पाकिस्तान-अमेरिकेत नक्की काय सुरू? आधी तेलाचा करार, मग टॅरिफही कमी केला; आता असिम मुनीर USच्या वाटेवर!
8
मतदार यादीतील ६५ लाख नावे का वगळली हे सांगा, बिहारवरून सुप्रीम कोर्टाचे  आयोगाला आदेश
9
घरे, झाडे सर्व काही गाडले, हाती काही लागेना; मानवाच्या हव्यासाने आले संकट
10
डोनाल्ड ट्रम्प भारतात राहायला येणार? रहिवासी प्रमाणपत्रासाठी केला अर्ज! प्रशासनाची कोंडी
11
उत्तराखंडमधील ढगफुटीचे थैमान; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित
12
सावरकर सदन: वारसास्थळ दर्जाचा लवकरच निर्णय; महापालिकेची हायकोर्टात माहिती; अभिनव भारत काँग्रेसची याचिका
13
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
14
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब
15
महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे कर्मचारी होणार मालामाल, मिळणार ५०० कोटींचे शेअर्स
16
शिंदे, ठाकरे दिल्लीत, चर्चा महाराष्ट्रात! एकनाथ शिंदेंची अमित शाह यांच्याशी बंदद्वार चर्चा; पंतप्रधानांना सहकुटुंब भेटले
17
यूपीआय फ्री की फी? शुल्काचे संकेत; काय म्हणाले RBI गवर्नर संजय मल्होत्रा?
18
...तर निवृत्तीनंतरचे आयुष्य येईल धोक्यात, हे करा उपाय
19
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
20
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर

नववर्षात उद्ध्वस्त झाले वंदनाबार्इंचे जग

By admin | Updated: January 3, 2017 00:05 IST

नववर्षाचा पहिला दिवस सायंकाळ होता होता असा काही भेसूर होईल की ‘त्या’ माऊलीचे सगळेच जगच कायमचे अंधारेल, असे कुणालाच वाटले नव्हते.

मोहन राऊत धामणगाव रेल्वे नववर्षाचा पहिला दिवस सायंकाळ होता होता असा काही भेसूर होईल की ‘त्या’ माऊलीचे सगळेच जगच कायमचे अंधारेल, असे कुणालाच वाटले नव्हते. पतीचा भक्कम आधार आणि नवसासायासाने पदरी पडलेल्या चिमुरड्याची किलबिल आता कधीच ऐकू येणार नाही, या हृदयविदारक जाणिवेने ‘ती’ माता हृदय पिळवटून टाकणारा आक्रोश करीत होता. अख्ख्या गावात स्मशानशांतता होती. मधूनमधून आसमंतात गुंजत होत्या तिच्या हृदय पिळवटून टाकणाऱ्या किंकाळ्या. तूर सोंगायला गेलेला घरधनी आणि वडिलांना मदत म्हणून घरच्याच बकऱ्या चारण्याकरिता मागोमाग गेलेला चिमुकला. दोघेही तलावात बुडून मरण पावले. दोघांचेही सापडले ते पार्थिव देह. जिवनाचा अविभाज्य अंग असलेले दोघेही आता कधीच परतणार नाहीत, हे मान्य करण्यास वंदनाबाई तयारच नाहीत. त्यांचा आक्रोश गावकऱ्यांना बघवत नाही. अवघ्या दीड हजार लोकवस्तीच्या दाभाडा गावात सोमवारी स्मशानशांतता होती. प्रत्येक गावकऱ्याच्या डोळ्यांत अश्रू होते. दु:खाचा डोंगर कोसळलेल्या त्या माऊलीची समजूत कशी घालावी, कोणालाच कळत नव्हते. शेजारच्या आयाबायांनी ठोकळे कुटुंबाच्या घराभोवती गराडा घातलेला. पुरूष मंडळी लांब उभी राहून चर्चा करीत असलेली. आपला लाडका मित्र दर्शनचे काही तरी बरे वाईट झाल्याची चर्चा ऐकून भेदरलली लहान मुले, असेच वातावरण होते आज दाभाड्यात. पित्यानेही घेतली तलावात उडी अमरावती : रविवारी सकाळी सुधाकर ठोकळे स्वत:च्या मालकीच्या शेतात तूर सोंगण्याकरिता गेले. शाळेला सुटीच असल्याने देवाला हात जोडून आणि जेवण करून सकाळी दहा वाजता दर्शन देखील स्वत:ची सायकल घेऊन बकऱ्या चारण्याकरिता म्हणून वडिलांच्या मागोमाग गेला. दुपारी घरून आणलेल्या डब्यात दोघा बापलेकांनी जेवण केले. सायंकाळी घरी परतण्याची तयारी केली आणि दबा धरून बसलेल्या काळाने दोघांवरही झडप घातली. तलावात पाणी पिण्याकरिता गेलेल्या बकऱ्या तलावात पडू नयेत म्हणून त्यांना हाकण्याकरिता दर्शनही मागोमाग गेला. पाय घसरून तो तलावात पडला. त्याचा आक्रोश ऐकून त्याला वाचविण्याकरिता पित्यानेही तलावात उडी घेतली. परंतु काळ प्रबळ होता. दोघेही तलावातून बाहेर पडू शकले नाहीत. तलावातील गाळात बुडून त्यांचा मृत्यू झाला. इकडे रात्र झाली तरी शेतातून सुधाकर व दर्शन परतले नाहीत, म्हणून वंदनाबार्इंची काळजी वाढू लागली. गावकरी गोळा झाले. शोधमोहिमेनंतर पोलिसांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यात आले. घरधन्यासह पोटच्या गोळ्याचा मृत्यू : दाभाड्यात पेटली नाही चूल शाळेला सुटी दर्शन हा धामणगाव रेल्वे येथील रावसाहेब रोंघे मेमोरियल स्कूलमध्ये इयत्ता दुसरीला शिकत होता. मितभाषी व अभ्यासात तल्लख असलेल्या दर्शनच्या मृत्युुमुळे सोमवारी त्याच्या शाळेतही शोकमय वातावरण होते. शाळेला एक दिवसाची सुटी देण्यात आली. अपूर्णच राहिली दर्शनची गोडधोडाची फर्माईश पित्या मागोमाग शेतात जाताना दर्शनने सायंकाळी घरी परतल्यानंतर गोडधोड करण्याची फर्माईश आई वंदनाकडे केली होती. नववर्षानिमित्त काही तरी कर..असा तगादा त्याने लावला होता. वंदनाबार्इंनी तसा बेतही केला होता. परंतु तो सिद्धीस जाऊ शकला नाही. त्यापूर्वीच पती आणि एकुलत्या एका मुलाचे निधन झाल्याने वंदनाबार्इंना जबर धक्का बसला आहे. वीरेंद्र जगतापांनी केले ठोकळे कुटुंबाचे सांत्वन संपूर्ण तालुक्याला हादरवून टाकणाऱ्या या घटनेची माहिती मिळताच आ. वीरेंद्र जगताप यांनी सोमवारी ठोकळे कुटुंबाला भेट देऊन वंदना ठोकळे यांचे सांत्वन केले. तसेच जलसंधारण विभागाच्या अधिकाऱ्यांना आदेश देऊन साठवण तलावात साचलेल्या गाळाबाबत विचारणा केली. तलावाची सफाई केली नसल्याबाबत जाब विचारून शासनाने ठोकळे कुटुंबाला तत्काळ मदत द्यावी, अशी मागणी केली.