शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

हवालदाराला मारहाण करून वाहनाची तोडफोड; आरोपीला दोन वर्षांची सक्तमजुरी

By प्रदीप भाकरे | Updated: December 19, 2022 17:33 IST

जुलै २०२० मधील घटना

अमरावती : शहर कोतवाली पोलीस ठाण्यातील हवालदाराला मारहाण करून वाहनाची तोडफोड करणाऱ्या एका आरोपीला स्थानिक न्यायालयाने दोन वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली. जिल्हा न्यायाधीश आर. व्ही. ताम्हणेकर यांनी १९ डिसेंबर रोजी हा निर्णय दिला. शेख इजाजोद्दिन शेख निजामोद्दिन (३०, रा. अलीम नगर, अमरावती) असे शिक्षाप्राप्त आरोपीचे नाव आहे.

१७ जुलै २०२० रोजी दुपारी १२.३०च्या दरम्यान कोतवाली ठाण्याचे पोलिस कर्मचारी अशोक बुंदेले (५५, रा. श्रीराम नगर, राठीनगर) हे जिल्हा सामान्य रुग्णालयातील पोलीस चौकीवर कर्तव्यावर होते. दरम्यान एक इसम इर्विन हॉस्पिटलच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ पोलीसांना मारहाण करीत आहे, अशी माहिती बुंदेले यांना मिळाली. त्यानुसार ते पोलिस हवालदार रुपेश खुरकटे यांच्यासोबत मुख्य प्रवेशद्वाराजवळ गेले असता, शेख इजाजोद्दिन शेख निजामोद्दिन नामक व्यक्ती हा पोलिस हवालदार सागर चव्हाण यांना मारहाण करीत असल्याचे दिसले.

त्यांनी तत्काळ आरोपी शेख इजाजोद्दिन शेख निजामोद्दिनला ताब्यात घेतले. त्यावेळी शेख इजाजोद्दिन हा सराईत गुन्हेगार असल्याचे हवालदार बुंदेले यांच्या लक्षात आले. त्यावेळी आरोपीने हवालदार बुंदेले यांना शिवीगाळ करून धक्काबुक्की केली. त्यावेळी आरोपी बुंदेले यांच्या हातातुन सुटला, त्याने तेथे पडलेला दगड बुंदेले यांना मारला. त्यामुळे ते जखमी झाले. आरोपीने पोलिसांच्या वाहनाच्या दगड मारून नुकसान केले व उपस्थित सर्वांना मारण्याची धमकी दिली.

कोतवालीत तक्रार, न्यायालयात आरोपपत्र

पोलिस हवालदार बुंदेले यांनी त्याबाबत कोतवाली ठाण्यात फिर्याद नोंदविली. त्यानुसार पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदविला. तपास पूर्ण करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सरकारी पक्षातर्फे अतिरीक्त सरकारी वकील रणजीत भेटाळू यांनी सात साक्षीदार तपासले. त्यांचा युक्तीवाद ग्राहय धरुन जिल्हा व सत्र न्यायाधीश (क्रमांक ३) रविंद्र ताम्हाणेकर यांनी आरोपीला दोषी ठरवित दोन वर्षे सश्रम कारावास व दोन हजार रुपये दंड व दंड न भरल्यास २ महिने अतिरिक्त कारावास ठोठावला. हवालदार बाबाराव मेश्राम यांनी पैरवी केली. तर, नापोकॉं अरूण हटवार यांनी सहकार्य केले.

टॅग्स :Courtन्यायालयPoliceपोलिसAmravatiअमरावती