शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Update : ठाणे, रायगड, मुंबईत मुसळधार, ऑरेंज अलर्ट, पालघरसाठी रेड अलर्ट, भरती-ओहोटीबाबतही इशारा
2
आता सैनिकांसाठी अरबी भाषा आणि इस्लाम शिकणे अनिवार्य, इस्रायलचा मोठा निर्णय! कारण काय?
3
'मला बुटाने मारा', सिद्धरामय्या अन् शिवकुमार यांच्या विशेष अधिकाऱ्यांमध्ये दिल्लीत हाणामारी; कारण काय?
4
"तुम्हाला आनंद देणाऱ्या गोष्टींवरदेखील खर्च करा..," राधिका गुप्ता यांनी दिला हृदयस्पर्शी सल्ला
5
आमदार रोहित पवारांच्या अडचणीत वाढ; मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडून मोठी कारवाई
6
महायुतीत २ मंत्र्यांमध्ये रंगलं मानापमान नाट्य; शिंदेसेनेचे मंत्री नाराज, भाजपा मंत्र्यांचा पलटवार
7
सुनील शेट्टीने 'हेरा फेरी ३'मधील परेश रावलच्या एंट्रीवर दिली प्रतिक्रिया, म्हणाली- "नजर लागते..."
8
२ मुलांना विष पाजलं, पत्नीचा गळा दाबला अन् मग पतीने...; एकाच कुटुंबातील चौघांची जीवनयात्रा संपली
9
धक्कादायक घटना! एक वर्षाच्या मुलाने नागाचा चावा घेतला, कोब्राचा मृत्यू झाला; पण मुलगाही...
10
पाकिस्तानने अमेरिकेसमोर TRF'वर सूर बदलला! म्हणाले, आम्हाला काही हरकत नाही', हुशारीही दाखवली
11
अल्पवयीन मुलीवर गँगरेप, प्रेग्नेंट असल्याचं कळताच जिवंत गाडण्याचा प्रयत्न; २ अटक तर १ आरोपी फरार
12
₹३० वरुन ₹३००० पार गेला हा शेअर; आता कंपनीनं मोठ्या गुंतवणुकीची केली घोषणा, तुमच्याकडे आहे का?
13
बनावट राजदूत मोठा मासा निघाला! दहा वर्षात १६२ वेळा परदेशात गेला, या मुस्लिम देशात बऱ्याच वेळा गेला
14
ना नुकसानीची भीती, ना पैसे बुडण्याची चिंता; 'या' स्कीममध्ये ₹१ लाख गुंतवून बनवू शकता २७ लाख रुपये
15
पीएम मोदींच्या स्वागतास अख्खे मंत्रिमंडळच आले; भारत मालदीवला 'इतके' कर्ज देणार
16
Video: गुगल मॅपच्या नादात बेलापूर येथे कार पडली खाडीत; सागरी पोलिसांच्या सतर्कतेमुळे महिलेला जीवदान
17
"मेरे को बहुत तकलीफ दिया...", सोलापूरच्या युवकाची अखेरची चिठ्ठी; मृत्यूनंतर वेगळीच शंका
18
आजचे राशीभविष्य २६ जुलै २०२५: 'या' ३ राशीच्या लोकांसाठी लाभाचा दिवस, अपूर्ण कामे पूर्ण होतील
19
"म्हातारी झालीस, लग्न कधी करणार?"; चाहत्याने केली कमेंट, ३८ वर्षीय अभिनेत्री म्हणाली-
20
कारगिल विजयदिन : वयाच्या विसाव्या वर्षी पती शहीद, आता मुलगाही देशसेवेसाठी झाला सज्ज

गडगा प्रकल्पात चोरीच्या रेतीचा वापर

By admin | Updated: June 28, 2015 00:36 IST

गडगा मध्यम सिंचन प्रकल्पात विनारायेल्टी २२५ ब्रास रेतीचा अवैध साठा येथील एसडीओ व्ही.के. राठोड यांनी पकडला व पंचनामा

२२५ ब्रास वाळूचा अवैध साठा : ३७ लाख रूपये दंड होण्याची शक्यताराजेश मालवीय धारणीगडगा मध्यम सिंचन प्रकल्पात विनारायेल्टी २२५ ब्रास रेतीचा अवैध साठा येथील एसडीओ व्ही.के. राठोड यांनी पकडला व पंचनामा करून संबंधित पाटबंधारे अधिकारी व कंत्राटदाराला धारणीची अधिकृत रॉयल्टी पास सादर करण्याचे सांगितले आहे, अन्यथा शासकीय महसूल गौणखनीज अधिनियमानुसार प्रति ब्रासप्रमाणे ३७ लाख रुपयांचा दंड संबंधित कंत्राटदारावर आकारले जाण्याचे संकेत आहे. पाटबंधारे विभाग अमरावती अंतर्गत धारणी तालुक्यात बिजुधावडी येथे १२९ कोटींच्या व सध्या १८० कोटी वाढीव किमतीच्या गडगा मध्यम प्रकल्पात मातीमिश्रित अवैधरीत्या रेती वापरली जात असल्याची माहिती एसडीओ व्ही.के. राठोड यांना कळताच त्यांनी तहसीलदार पुरूषोत्तम भुसारी यांना सोबत घेऊन गडगा प्रकल्पावर धाड टाकली. यात २२५ ब्रास विनारॉयल्टीचा अवैध रेतीसाठा आढळला. एसडीओंनी रॉयल्टी मागितली, मात्र उपस्थितांनी रॉयल्टी नसल्याचे सांगत रेतीचा पंचनामा करून तत्काळ अधिकृत रॉयल्टी सादर करण्याचे सांगितले. अन्यथा महसूल गौण खनीज अधिनियमानुसार १६,८०० रूपये प्रतिब्रासप्रमाणे दंड आकारण्यात येईल, असे ठणकावून सांगताच लाखो रूपयांच्या दंडात्मक कारवाईच्या धास्तीने संबंधित कंत्राटदाराच्या जवळच्या अभियंत्याने म.प्र. ४५ कि. मी. वरून रेती आणल्याचे काही रॉयल्टी पास उशिरा एसडीओंकडे सादर केल्याने शंका निर्माण झाली आहे. गडगा प्रकल्पापासून धारणीच्या सोनाबर्डी रेती खदानीचे अंतर २५ कि. मी. आहे. मग मध्यप्रदेशातून ४५ कि. मी. अंतरावरून रेती आणण्याचे कारण काय, या सर्व बाबींचा तपास एसडीओ राठोड करीत असून पूर्ण चौकशीअंती ३७ लाखांच्या दंडात्मक कारवाई करणार असल्याचे सांगितले आहे. अचलपूर कार्यालयातून चालतो कारभारअमरावती पाटबंधारे विभागाचे धारणी येथे उपविभागीय कार्यालय असतानाही आर्थिक लालसेपायी नवीन लहान पाटबंधारे उपविभाग अचलपूर येथून अभियंता व उप. वि. अभियंता हे कारभार चालवीत आहे. १८० कोटींच्या गडगा प्रकल्पावर १२५ कि.मी. अंतरावरुन कारभार पूर्णत: रामभरोसे सुरू असून लाखो रूपयांची कामे न करताच कंत्राटदाराला आर्थिक लाभ मिळवून देण्यासाठी मोजमाप पुस्तिकेवर अभियंता खोट्या नोंदी घेऊन लाखो देयके आणि प्रवास भत्ता काढून शासनाला आर्थिक फटका नुकसान पोहोचवीत आहे.कंत्राटदारावर होऊ शकते ‘एमपीडीए’ अंतर्गत कारवाई अवैध रेतीसाठा करणाऱ्यांवर १२ जून २०१५ च्या गौण खनीज कायद्यांतर्गत सक्तीची कारवाई करण्याचे शासन आदेश आहे. त्यानुसार गडगा प्रकल्पावरील रेती ही विनारॉयल्टीची असल्याचे सिद्ध झाल्यास संबंधित एफ. ए. कंस्ट्रक्शन कंपनीवर एम.पी.डी.ए. अंतर्गत कारवाई होण्याची शक्यता नाकारता येत नाही. असे झाल्यास महसूल प्रशासन संबंंिधत कंत्राटदाराजवळून सुमारे ३७ लाख रुपये दंड आकारण्याची कारवाई करु शकते. त्यामुळे आता याप्रकरणात संबंधित कंत्राटदारावर काय कारवाई होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.शासकीय किंवा गैरशासकीय कामात अवैध रेतीचा वापर करणाऱ्यांविरुद्ध गौण खनिज कायद्यांतर्गत कारवाई केली जाईल. तसेच गडगा प्रकल्पाच्या अवैध रेतीसाठ्यामध्ये कंत्राटदारासोबत पाटबंधारे विभागाचे अभियंता सहभागी असेल तर त्यांच्यावरही कारवाई करण्यात येईल. - किरण गित्ते,जिल्हाधिकारी, अमरावती.