अमरावती : माहुलीत मंगळवारी सकाळी साहिल डायरे याचा एसटीखाली येऊन मृत्यू झाल्याने तणाव निर्माण झाला. शासकीय अधिकाऱ्यांनी तणाव निवळण्यासाठी परिश्रम घेतले. यामध्ये जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांनी धाडसाने नागरिकांना समजविले. या तणावाच्या स्थितीत ठाणेदार हिरासिंग राठोड, खुफिया विभागाचे नितीन वानखडे, योगेश आडणे, दत्तात्रेय वानखडे, संतोष लवणकर, सतीश ठवकर जखमी झाले. एसआरपीएफचे व अन्य पोलीस ठाण्याचा पोलीस ताफा दाखल होताच पोलिसांनी गावकऱ्यांवर लाठीचार्ज, अश्रुधुराचा वापर करून छुर्ऱ्यांच्या बदुकी चालविल्या. त्यामध्ये दिनेश कांबळे, मोहम्मद अफसर, मंगेश पांडुरंग राजुरकर, सुभाष लायबर, शशिकांत साबळे, अन्सार अब्दूल जब्बार, नरेंद्र खासबागे, राजेश ठाकूर, मनोहर निशांत हे जखमी झाले.
लाठीचार्ज, अश्रुधुराचा वापर, छर्ऱ्यांच्या बंदुकीने गोळीबार
By admin | Updated: August 26, 2015 00:08 IST