लोकमत न्यूज नेटवर्कगुरुकुंज मोझरी : मानवी मन चंचल आहे. त्यामुळे ते एकप्रकारे दुश्मनही आहे आणि दोस्तसुद्धा आहे. या मानवी मनाच्या चंचलतेला सामुदायिक ध्यानाच्या माध्यमातून दिशा देऊन ईश्वरप्राप्ती होऊ शकते, असे प्रतिपादन हार्टफुलनेस या संस्थेचे संचालक डॉ. कमलेश पटेल यांनी केले. राष्ट्रसंतांच्या ५१ व्या पुण्यतिथी महोत्सवात शनिवारी त्यांनी सामुदायिक ध्यानावरील चिंतन प्रस्तुत केले.कमलेश पटेल पुढे म्हणाले, पूर्वसंस्कारांमुळे मानवाला सुख-दु:ख येते. मानवी जीवनात माणसावर, समाजावर, देशावर संकटे, आपत्ती येतच असतात. या संकटांना सक्षमपणे तोंड देण्यासाठी साधनेशिवाय पर्याय नाही. त्यामुळे मानवाचे मन मजबूत होऊन संकटकाळी सामना करू शकतो. लाखो लोकांना ध्यानाच्या माध्यमातून येणाऱ्या संकटाचा सक्षमपणे मुकाबला करता येतो. नुसती शरीराची सफाई करून भागणार नाही, तर मनसुद्धा पवित्र आणि साफ ठेवले पाहिजे. त्याशिवाय ध्यानाचा परिणाम जाणवणार नाही. मानवाचे शारीरिक व मानसिक असे आरोग्याचे दोन भाग आहेत. शारीरिक आजार दिसून येतो; परंतु मानसिक आजार दिसून येत नाही. सध्या मानसिक आजारात वाढ झाली आहे. परंतु, त्याकडे दुर्लक्ष होत आहे. सामुदायिक ध्यान आवश्यक असून, त्याद्वारे संकल्प पार पाडले जाऊ शकतात, असे कमलेश पटेल म्हणाले.ग्रामगीताचार्य पदवीदान, सत्कारग्रामगीता जीवन विकास परीक्षा विभागाने शुक्रवारी ग्रामगीताचार्य पदवीदान समारंभ आयोजित केला होता. अखिल भारतीय श्रीगुरुदेव सेवा मंडळाचे सर्वाधिकारी प्रकाश वाघ अध्यक्षस्थानी होते. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू सिद्धार्थ काने, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पदवीदान करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर उपसर्वाधिकारी लक्षमण गमे, प्रचारप्रमुख दामोदर पाटील, सरचिटणीस जनार्दन बोथे, ग्रामगीता जीवन विकास परीक्षेचे अध्यक्ष केशवदास रामटेके, प्रदीप विटाळकर, ममता इगोले, पौर्णिमा सवाई, रामदास देशमुख, विठ्ठलराव सावरकर, ज्ञानेश्वर मुडे, विलास साबळे, भानुदास कराळे, कांताप्रसाद मिश्रा, अशोक कोठारी यांचीसुद्धा उपस्थिती होती. डॉ. सूर्यप्रकाश जयस्वाल (यवतमाळ), अनुताई कपाळे (गुरुदत्तनगर), शुभांगी वानखडे (नागपूर), इंदिरा पाळेकर (गुसुदेवनगर), ज्ञानेश्वर घाटोळ (मोर्शी), मोहन गाखरे (उमरी), विठ्ठल उमप (शेंदोळा खुर्द), योगिता भुसारी (रहाटगाव), रामकृष्ण राऊत (नेरी), स्वाती पाटखेडे (अकोला), स्मिता केंडे (वरूड), सुधीर मते (घोणसा), शोभा गावनेर (लहानी आर्वी), उमाकांत म्हसे (वणी), सुरेश कांडलकर (अमरायती), वर्षा भोसे (वरूड), संजय क्षीरसागर (कारंजा लाड), उज्ज्वला हुकूम (गुंथळा), अलका बढिये (नाचनगाव), नागोराव काकपुरे (यवतमाळ), संध्या धामणकर (गुरुदेवनगर), मीराबाई फुसे (जरूड), राजू भोंगडे (नवेगाव) याना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते ग्रामगीताचार्य पदवी प्रमाणपत्र, स्मृतिचिन्ह व पदक देऊन सन्मानित करण्यात आले. प्रास्ताविक ग्रामगीता जीवन विकास परीक्षाचे सचिव गुलाब खबसे यांनी केले. संचालन श्रीगुरुदेव प्रकाशन विभागाचे प्रमुख गोपाल कडू यांनी केले.आज दिंड्यांची ग्रामप्रदक्षिणामहोत्सवातील शेवटच्या दिवशी २० ऑक्टोबर रोजी सकाळी ६.४0 पासून गुरुकुंज आश्रम ते मोझरी दिंडी पालख्यांची ग्राम प्रदक्षिणा होणार आहे. दुपारी ३ ते ५.३० या वेळेत व्यायाम संमेलन व व्यायाम प्रात्यक्षिके होतील.
मन:शांतीसाठी सामुदायिक ध्यानाची नितांत आवश्यकता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2019 06:00 IST
कमलेश पटेल पुढे म्हणाले, पूर्वसंस्कारांमुळे मानवाला सुख-दु:ख येते. मानवी जीवनात माणसावर, समाजावर, देशावर संकटे, आपत्ती येतच असतात. या संकटांना सक्षमपणे तोंड देण्यासाठी साधनेशिवाय पर्याय नाही. त्यामुळे मानवाचे मन मजबूत होऊन संकटकाळी सामना करू शकतो. लाखो लोकांना ध्यानाच्या माध्यमातून येणाऱ्या संकटाचा सक्षमपणे मुकाबला करता येतो.
मन:शांतीसाठी सामुदायिक ध्यानाची नितांत आवश्यकता
ठळक मुद्देकमलेश पटेल। राष्ट्रसंतांचा ५१ वा पुण्यतिथी महोत्सव; सामुदायिक ध्यानावर चिंतन, हजारो गुरुदेवभक्तांची गुरुकुंजात मांदियाळी