अचलपूर : अचलपूर विधानसभेचे आमदार बच्चू कडू यांचेवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यासह अभियंत्यांना सुरक्षा देण्याची मागणी करीत बुधवारी अचलपूर आणि मोर्शी येथील कार्यकारी अभियंता कार्यालयात चार तास अभियंत्यांनी ठिय्या आंदोलन केले. रविवारी परतवाडा येथील वाघामाता संस्थानवर आ. बच्चू कडू यांच्यावतीने विद्युत ग्राहक तक्रार निवारण मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात विद्युत वितरण कंपनीचे अचलपूर व मोर्शी उपविभागातील कार्यकारी अभियंता, व इतर अभियंते मोठ्या संख्येने उपस्थित होते. मेळाव्यात आ.कडू यांनी विद्युत अभियंत्यांना शिवीगाळ करून पेटवून देण्याची धमकी दिली होती. शेतकरी आत्महत्येला अभियंतेच जबाबदार असल्याचे त्यांचे म्हणणे होते. बच्चू कडू यांचा विद्युत वितरण कंपनीच्या अभियंत्यांनी मंगळवारी अचलपूर येथे निषेध करून संरक्षणाची मागणी केली होती. २४ ला मूकमोर्चाबच्चू कडू यांच्या वक्तव्याचा निषेध करीत मंगळवारी अचलपूर येथे कार्यकारी अभियंत्यांना एक निवेदन ‘एसईए’ या अभियंता संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिले. अचलपूर, मोर्शीत ठिय्याबुधवारी विद्युत वितरण कंपनीच्या अचलपूर व मोर्शी येथील कार्यकारी अभियंता कार्यालयात जवळपास चार तास ठिय्या आंदोलन करण्यात आले. बच्चू कडू यांच्या विद्युत ग्राहक तक्रार मेळाव्यात कार्यकारी अभियंत्यांनी अधिनस्थ अभियंत्यांना उपस्थित राहण्याचे लेखी पत्र दिले होते. त्यानुसार अभियंते मेळाव्याला उपस्थित राहिले. तेथे अभियंत्यांना शिवीगाळ व मारण्याची, पेटविण्याची धमकी दिली. याविरुध्द खुद्द कार्यकारी अभियंत्यांनी बच्चू कडूंविरुद्ध तक्रार दाखल करण्याची मागणी ठिय्या आंदोलनातून केली. या मेळाव्याला कार्यकारी अभियंता स्वत: हजर होते. बच्चू कडूंचे अधीक्षक अभियंत्यांना पत्रपरतवाडा येथील वाघामाता संस्थानमध्ये आयोजित तक्रार निवारण मेळाव्याला अधिकारी व कर्मचाऱ्यांना उपस्थित राहण्यासंदर्भातील पत्र दिले होते. त्यानुसार अधीक्षक अभियंत्यांनी अचलपूर, मोर्शी येथील कार्यकारी अभियंत्यांना हजर राहण्यासंबंधी पत्र दिले. बच्चू कडू यांचे पत्रच संबंधितांनी ‘लोकमत’ला पाठविले.
बच्चू कडूंवर गुन्हा दाखल करण्याची मागणीवाद पेटला : अचलपूर, मोर्शी अभियंत्यांचे ठिय्या आंदोलन
By admin | Updated: July 23, 2015 00:07 IST