शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदे निष्ठावंतांना संधी देतात, तेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार, येणाऱ्या निवडणुकांमध्ये..."
2
'टीम इंडिया'त मिळाली नाही संधी; अखेर परदेशी संघाकडून खेळला, पहिल्याच सामन्यात ठोकलं शतक
3
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
4
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
5
दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवण्याचं 'चॅलेंज', आमिर खानच्या 'सितारे जमीन पर'चा ट्रेलर आउट
6
Mumbai: ताज हॉटेलबाहेर पहाटे संशयास्पद उडणारी वस्तू दिसली, तपासात संतापजनक प्रकार उघड
7
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
8
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
9
दात घासाच! रात्री ब्रश न करणं बेतेल थेट जीवावर; दातांच्या स्वच्छतेचं हार्ट ॲटॅकशी काय कनेक्शन?
10
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
11
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
12
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
13
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
14
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
15
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
16
Nagpur: हेविवेट नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्वबदल, दयाशंकर तिवारी नवे शहराध्यक्ष
17
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल
18
निवृत्तीनंतर विराट-अनुष्का प्रेमानंद महाराजांच्या चरणी, हातातील गुलाबी अंगठीनं वेधलं सर्वांचं लक्ष!
19
'हॅलो, तुमच्या विमानात बॉम्ब आहे', एका फोनमुळे विमानतळावर गदारोळ; तत्काळ हाय अलर्ट जारी!
20
कोहलीसाठी कायपण! 'टेस्ट फेअरवेल' देण्यासाठी चाहत्यांनी आखलाय एकदम 'बेस्ट प्लॅन'; जाणून घ्या सविस्तर

उर्ध्व वर्धा, सपन, पूर्णा फुल्ल

By admin | Updated: August 2, 2016 00:07 IST

यंदा सरासरीपेक्षा अधिक व धरणक्षेत्रात जोरदार पाऊस झाल्याने पूर्णा व सपन प्रकल्पाचे दरवाजे उघडण्यात आले त..

तीन प्रकल्पांची दारे उघडली : ८२ प्रकल्पांमध्ये ८०.३८ टक्के जलसाठा अमरावती : यंदा सरासरीपेक्षा अधिक व धरणक्षेत्रात जोरदार पाऊस झाल्याने पूर्णा व सपन प्रकल्पाचे दरवाजे उघडण्यात आले तर मध्यप्रदेशातून पाण्याची आवक (येवा) वाढल्याने उध्व वर्धा धरणाचे सर्वच १३ दरवाजे उघडण्यात आले आहेत. त्यामुळे नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा ईशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे. जिल्ह्यात ८२ प्रकल्प आहेत. यामध्ये एकूण प्रकल्पित संकलित ९०५ दलघमी पातळीच्या तुलनेत १ आॅगस्ट रोजी ७२७.५२ दलघमी जलसाठा शिल्लक आहे. ही टक्केवारी ८०.३८ इतकी आहे. शहानूर प्रकल्पात ४६.४ संकल्पित जलसाठ्याच्या तुलनेत सद्यस्थितीत ३३.०२ दलघमी जलसाठा आहे. ही टक्केवारी ७१.७२ इतकी आहे. चंद्रभागा प्रकल्पात संकल्पित साठ्याच्या तुलनेत सध्या २१.७२ दलघमी जलसाठा आहे. तर सपन प्रकल्पात ३८.६० संकल्पित जलसाठ्याच्या तुलनेत २६.६५ दलघमी जलसाठा आहे. ही टक्केवारी ६९.०४ इतकी आहे. मागील २४ तासांत १८.७ मिमी पाऊस पडला. सर्वाधिक ५१ मिमी पाऊस नांदगाव तालुक्यात पडला. या तालुक्यात लोणी व माहुली (चोर) या महसूल मंडळात अतिवृष्टी झाली. अमरावती १० मिमी, भातकुली ४.८ मिमी, चांदूररेल्वे २३.६, धामणगाव ४, तिवसा १६, मोर्शी १९.२, वरूड २.४, अचलपूर २०.२, चांदूरबाजार ५, दर्यापूर २९.६, अंजनगाव सुर्जी २८, धारणी ११.४ व चिखलदरा तालुक्यात ३७.२ मिमी पाऊस पडला. १ जून ते १ आॅगस्ट या कालावधीत जिल्ह्यात ४२९.५ मिमी पाऊस अपेक्षित असताना सद्यस्थितीत ६५०.८ मिमी पाऊस पडला. ही टक्केवारी १५१.५ टक्केवारी आहे. वार्षिक सरासरीच्या तुलनेत हा पाऊस ७९९.९ टक्के आहे. उध्ववर्धाचे १३ दरवाजे उघडले मध्यप्रदेशातून पाण्याची आवक वाढल्याने धरणात ८० टक्के साठा झाला आहे. धरणाच्या सुरक्षेचा उपाय म्हणून सोमवारी सकाळी १० वाजता १३ दरवाजे ५० सेमीने उघडण्यात आलेत. यामधून १०३० घनमिटर प्रती सेंकदनुसार पाण्याचा विसर्ग होत आहे.१५ कुटूंबांना हलविलेमोर्शी तालुक्यात चारघड नदीला पूर आल्यामुळे उमरखेड गावातील ३ घरात पाणी शिरले. याच नदीच्या पुरामुळे घाटलाडकी व बेलमंडळी या गावांचा संपर्क शनिवारी तुटला होता व गावातील घरांमध्ये पाणी शिरले. अशा एकूण १५ कुटूंबांना सुरक्षित स्थळी हलविले आहे.काही घरांची पडझड झाली आहे. मोर्शी येथील दमयंती नदीला आलेल्या पुरात येथील आशुब मेहबुब पठाण हा १२ वर्षांचा मुलगा वाहून गेला. शोध व बचाव पथकाद्वारा त्याचा शोध घेणे सुरू आहे.