शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
4
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
5
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
6
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
7
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
8
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
9
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
10
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
11
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
12
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
13
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
14
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
15
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
16
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
17
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
18
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
19
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
20
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेच्या कामात गैरप्रकार

By admin | Updated: August 25, 2015 00:31 IST

पर्यावरण व महसूल विभागाची शासकीय परवानगी न घेता एका कंस्ट्रक्शन कंपनीच्या कंत्राटदाराने मांडवा येथे पाच महिन्यांपासून अवैधरीत्या बोगस हॉटमिक्स प्लांट टाकून...

करबुडव्या कंत्राटदाराला अभय कुणाचे?: बोगस हॉटमिक्स प्लांटराजेश मालवीय धारणीपर्यावरण व महसूल विभागाची शासकीय परवानगी न घेता एका कंस्ट्रक्शन कंपनीच्या कंत्राटदाराने मांडवा येथे पाच महिन्यांपासून अवैधरीत्या बोगस हॉटमिक्स प्लांट टाकून त्याआधारे प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत लाखो रूपयांच्या डांबरी रस्त्यांची कामे केलीत. शासनाचा हजारो रूपयांचा महसूल कर बुडविणाऱ्या या कंत्राटदाराचे शासकीय कंत्राट रद्द करून कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे.धारणीपासून ५ कि.मी. अंतरावरील मांडवा सिंचन तलावलगत चव्हाण यांचे शेत आहे. सदर शेत हे भोगवटदार वर्ग २ व मीनईअंतर्गत येत असून ती शासकीय जागा आहे. जागेची खरेदी-विक्री करता येत नाही. मात्र हरीदर्शन कंस्ट्रक्शन कंपनीच्या कंत्राटदाराने सदर शेताची कोणतीही खरेदी न करता आणि ग्रामपंचायत मांडवा, महसूल विभाग, पर्यावरण विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, नगररचना, खनीकर्म विभाग इत्यादी शासकीय कार्यालयांची ना हरकत परवानगी न घेताच शेतमालकाशी संगनमत करून तेथे अवैधरीत्या बोगस हॉट मिक्स प्लांट पाच महिन्यांपूर्वी सुरू केला. त्याआधारे कंत्राटदाराने प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतील लाखो रूपयांच्या डांबरी रस्त्याची कामे केली आहेत. मात्र पाच महिन्यांपासून अवैध सुरू असलेल्या हॉटमिक्स प्लांट व कंत्राटदारावर मांडवा ग्रामपंचायत सचिव व तलाठी, मंडळ अधिकारी यांनी कारवाई केली नाही. दिवसाढवळ्या महसूल विभागासह इतर विभागांची दिशाभूल करून महसूल कर बुडविणाऱ्या हरीदर्शन कंस्ट्रक्शन कंपनीचे शर्मा नामक कंत्राटदारावर ही बोगस कामे कोणाच्या आशीर्वादाने व विना परवानगीने करीत आहे, याची चौकशी होणे गरजेचे आहे. हॉट मिक्स प्लांट टाकणाऱ्या कंत्राटदाराचे शासकीय कंत्राट रद्द करून कंस्ट्रक्शन कंपनीला काळ्या यादीत टाकण्याची मागणी होत आहे. याप्रकरणी कंत्राटदाराशी माहितीसाठी संपर्क केला असता संपर्क होऊ शकला नाही. कंत्राटदाराकडे एनओसी नाहीहॉटमिक्ससाठी सर्वप्रथम शेत खरेदी, नगररचना विभागाकडून अकृषक, महसूल विभाग, ग्रामपंचायत पर्यावरण, सामाजिक बांधकाम विभाग, खनिकर्म इत्यादींची परवानगी आवश्यक आहे. मात्र मांडवा येथे उभारलेल्या हॉटमिक्स प्लांटला वरील पैकी एकही शासकीय विभागाची एनओसी नसतानाही बिनधास्तपणे पाच महिन्यांपासून अवैध प्लांट सुरू आहे, हे विशेष.मांडवा येथील अवैध हॉटमिक्स प्लांटबद्दल संबंधित कंत्राटदाराला नोटीस दिली आहे. याप्रकरणी एसडीओचा अहवाल आल्यानंतर योग्य ती कडक कार्यवाही केली जाईल.- किरण गित्ते,जिल्हाधिकारी, अमरावती.