शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
4
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
5
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
6
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
7
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
8
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
9
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
10
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
11
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
12
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
13
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
14
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
15
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
16
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
17
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
18
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
19
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट

नर्मदा परिक्रमा सन्मान सोहळ्यात भाव-भक्तीचा अभूतपूर्व संगम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2022 05:00 IST

नर्मदामाई परिक्रमा सोहळ्याची सुरुवात ही  पुष्पमाला ठाकूर यांच्याहस्ते नर्मादामातेच्या प्रतिमेची स्थापना करून करण्यात आली. यानंतर गणेशवंदनेवर शीतल मेटकर यांच्या चमूने नृत्य सादरीकरणाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. ना. यशोमती ठाकूर यांनी  स्वामी रामराजेश्वराचार्य  यांचे पाद्यपूजन केले. तसेच पुष्पमाला ठाकूर यांच्या हस्ते कन्यापूजन करण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती :  नर्मदा नदीची परिक्रमा करणाऱ्या ॲड. यशोमती ठाकूर यांच्या मातोश्री पुष्पमाला ठाकूर यांचा सत्कार स्वामी रामराजेश्वराचार्य यांच्या हस्ते करण्यात आला.  पुष्पमाला ठाकूर यांनी १७ दिवसांत १३१२ किमी अंतर पायदळ पूर्ण करून नर्मदा परिक्रमा पूर्ण केली. यानिमित्त सांस्कृतिक भवनात शनिवारी भाव-भक्तीचा अभूतपूर्व संगम अनुभवता आला. यावेळी  कन्यापूजन, पाद्यपूजन लक्ष वेधणारे ठरले. या परिक्रमात पुष्पमाला ठाकूर यांच्या दोन भगिनी कुसुम देशमुख आणि सुमन देशमुख यांचाही सहभाग होता. या सन्मान सोहळ्याला अनाथांचे नाथ शंकरबाबा पापळकर उपस्थित होते. नर्मदामाई परिक्रमा सोहळ्याची सुरुवात ही  पुष्पमाला ठाकूर यांच्याहस्ते नर्मादामातेच्या प्रतिमेची स्थापना करून करण्यात आली. यानंतर गणेशवंदनेवर शीतल मेटकर यांच्या चमूने नृत्य सादरीकरणाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. ना. यशोमती ठाकूर यांनी  स्वामी रामराजेश्वराचार्य  यांचे पाद्यपूजन केले. तसेच पुष्पमाला ठाकूर यांच्या हस्ते कन्यापूजन करण्यात आले. सन्मान सोहळ्याला बोलताना पुष्पमाला ठाकूर म्हणाल्या की, सुरुवातीपासूनच घरामध्ये आध्यात्मिक वातावरण होते. अध्यात्माबरोबरच सामाजिक सेवा ही भय्यासाहेब ठाकूर यांनी शिकवले. ना. यशोमती ठाकूरने वडिलांची ही परंपरा कायम ठेवल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. संचालन मंदा नांदुरकर यांनी केले. कमलताई गवई, माजी मंत्री सुनील देशमुख, आ. बळवंत वानखडे, माजी आमदार वीरेंद्र जगताप, काँग्रेस जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख, माजी महापौर विलास इंगोले, मिलिंद चिमोटे, माजी आ. जगदीश गुप्ता, नरेशचंद्र ठाकरे, किशोर बोरकर  उपस्थित होते.

धर्म माणसे जोडायला शिकवतो : पालकमंत्रीसध्या देशाला विभाजन करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. परंतु आपला धर्म हा माणसांना जोडायला शिकवतो. प्रेम करायला शिकवतो, त्यामुळे देश जोडण्याचे काम हे आम्ही करत राहू, असे मत पालकमंत्री  यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केले. यावेळी आपल्या आईच्या नर्मदामाई परिक्रमा सोहळ्याला बोलताना वडिलांच्या आठवणीने त्यांचे डोळे पाणावले होते. 

वीणा देऊन सत्कारशंकरबाबा पापळकर यांनी ना. यशोमती ठाकूर यांच्या कार्याचे कौतुक करत महाराष्ट्रासाठी न थांबता देशभरात काम करण्याच्या शुभेच्छा दिल्या. सर्व नेते आपल्या मुलांना समोर आणतात. परंतु पुष्पमाला ठाकूर यांनी आपल्या मुलीला समोर आणले. यशोमतींनी स्वकर्तृत्वाने महाराष्ट्र हादरवून ठेवल्याचे शंकरबाबा पापळकर म्हणाले. पुष्पमाला ठाकूर यांना वारीमधील १५० वर्षं जुनी वीणा भेट देऊन त्यांचा सन्मान केला.

 

टॅग्स :Yashomati Thakurयशोमती ठाकूरShankarbaba Papalkarशंकरबाबा पापळकर