शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

अनलॉकमध्येही शाळा राहणार ‘लॉक’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2021 05:00 IST

कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत शिक्षकांना कोरोनायोद्ध्यांसाेबत कर्तव्य बजावण्यासाठी काही कामे सोपविण्यात आली होती. कोरोनाकाळात शिक्षकांंनी गाव, खेड्यांमध्ये त्यांना दिलेले कर्तव्य चोखपणे बजावले. मात्र, वर्षभर अध्यापनाचे काम मागे राहिले. यावर्षी जूनपासून शाळा सुरू होतील, अशी शक्यता वर्तविली जात होती. मात्र, शाळेची घंटा केव्हा वाजणार, हा प्रश्न गतवर्षाप्रमाणे यंदाही शिक्षकांना अनुत्तरित करीत आहे. 

ठळक मुद्देशासनाचे शाळा सुरू करण्याबाबत तूर्त धोरण नाही, विद्यार्थी, शिक्षकवृंद घरीच

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : गतवर्षी मार्चपासून कोरोना आला आणि शाळा-महाविद्यालये बंदचा निर्णय शासनाने घेतला. हल्ली कोविड- १९ चे रुग्ण कमी होत असल्याने अनलॉकचा निर्णय घेत, संचारबंदीत काही प्रमाणात शिथिलता दिली आहे. जीवनावश्यक वस्तूंसह अन्य दुकाने, प्रतिष्ठाने सुरू करण्यात आली आहेत. मात्र, जून उजाडला असताना शाळा सुरू होण्याचे नाव घेत नाही. परिणामी, विद्यार्थी, शिक्षकवृंद कधीपर्यंत ‘लॉक’ राहणार, असा सवाल उपस्थित होत आहे.कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत शिक्षकांना कोरोनायोद्ध्यांसाेबत कर्तव्य बजावण्यासाठी काही कामे सोपविण्यात आली होती. कोरोनाकाळात शिक्षकांंनी गाव, खेड्यांमध्ये त्यांना दिलेले कर्तव्य चोखपणे बजावले. मात्र, वर्षभर अध्यापनाचे काम मागे राहिले. यावर्षी जूनपासून शाळा सुरू होतील, अशी शक्यता वर्तविली जात होती. मात्र, शाळेची घंटा केव्हा वाजणार, हा प्रश्न गतवर्षाप्रमाणे यंदाही शिक्षकांना अनुत्तरित करीत आहे. गतवर्षी फेब्रुवारी, मार्चपासून शाळा बंद आहेत. यादरम्यान शाळांची दुरुस्ती, डागडुजीची कामे प्रलंबित आहे. शाळा सुरू नाही, शिक्षक काय करणार, निकालाची बोंबाबोंब, असे मुद्दे चर्चेत आहेत. जिल्ह्यात पहिली ते दहावीपर्यंत १लाख ८९ हजार १२ मुले, तर २ लाख १२ लाख ४८९ मुलींची पटसंख्या आहे. 

४०० शाळांची कामे प्रस्तावितजिल्हा परिषदेच्या सुमारे ४०० शाळांची जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कामे करणे गरजेचे आहे. त्याअनुषंगाने मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांच्या मंजुरीनंतर या शाळांतील बांधकाम सन २०२०-२०२१ या वर्षात प्रस्तावित आहेत. काही ठिकाणी किरकोळ दुरुस्ती असल्याची माहिती जिल्हा परिषदचे शिक्षणाधिकारी (प्राथमिक) ई.झेड. खान यांनी दिली. या किरकोळ दुरुस्तीसाठी शाळा व्यवस्थापन समितीकडे निधी दिला असून, ही कामे शाळास्तरावर केली जाणार आहेत. 

गुरुजींची शाळा सुरू होणार..?-  १५ महिन्यांपासून ना अध्ययन, ना शाळा सुरू आहे. त्यामुळे शिक्षकही घरी कंटाळून गेले आहेत. ऑनलाईन शिक्षणातून विद्यार्थी अथवा शिक्षकही समाधानी नाही.- विद्यार्थी घरीच ‘लॉक’ असल्याने पालकही वैतागून गेले आहेत. मुलांना घरी मोबाईल, टीव्हीचे वेड लागले असल्याने शाळा सुरू व्हाव्यात, अशी पालकांची मागणी आहे.

 

टॅग्स :Schoolशाळाcorona virusकोरोना वायरस बातम्या