शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षा १५ मार्चपासून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2018 23:14 IST

संत गाडगे बाबा विद्यापीठाची उन्हाळी- २०१८ ही परीक्षा १५ मार्चपासून प्रारंभ होत आहे. त्यानुसार पाचही जिल्ह्यांत १५५ महाविद्यालयांत परीक्षा घेण्यासंदर्भात २१ ङिसेंबर २०१७ रोजी अधिसूचना जारी करण्यात आली होती.

ठळक मुद्दे१५५ केंद्रांना मान्यता : २१ डिसेंबर रोजी जारी केली अधिसूचना

आॅनलाईन लोकमतअमरावती : संत गाडगे बाबा विद्यापीठाची उन्हाळी- २०१८ ही परीक्षा १५ मार्चपासून प्रारंभ होत आहे. त्यानुसार पाचही जिल्ह्यांत १५५ महाविद्यालयांत परीक्षा घेण्यासंदर्भात २१ ङिसेंबर २०१७ रोजी अधिसूचना जारी करण्यात आली होती.कुलगुरू मुरलीधर चांदेकर, प्र-कुलगुरू राजेश जयपूरकर यांच्या मार्गदर्शनात उन्हाळी परीक्षेचा डोलारा पार पाडण्यासाठी परीक्षा नियंत्रक व मूल्यमापन मंडळ संचालक जयंत वडते यांनी सूक्ष्म तयारी चालविली आहे. परीक्षा आटोपताच ४५ दिवसांच्या आत सदर पेपरचा निकाल लावण्यासाठी स्वतंत्र चमू गठित केली आहे. विद्यार्थ्यांचे हॉल तिकिट, नामांकन क्रमांकापासून तर परीक्षेस उशिरा अर्ज सादर करणाºया विद्यार्थ्यांचा डेटा तयार केलेला आहे. परीक्षा काळात अनुचित प्रकार घडणार नाही, यासाठी विद्यापीठ प्रशासनाने प्राचार्यांसोबत संवाद बैठक घेऊन त्यांना योग्य मार्गदर्शन करण्यात आले. अभियांत्रिकी, विधी आणि फार्मसीची आॅनलाईन परीक्षा, मूल्यांकन व निकाल या सर्व बाबी विद्यापीठ प्रशासनाने एजन्सीकडे सोपविल्या आहेत. १५ मार्चपासून आणि पुढे सुरू होणाºया परीक्षांमध्ये बीए. भाग १, ३, बीए. अ‍ॅडिशनल, बीए. समाजशास्त्र आणि बीएसडब्ल्यू भाग १, ३ तर बी.लिब., बीपीए, बीएफए व बीजेएमसी भाग १, ३ चा समावेश असणार आहे. बी.कॉम, बी.बी.ए, एम.कॉम, एमसीएम, एम.एच.आर.डी, पी.जी. डिप्लोमा इन कॉम्प्यूटर मॅनेजमेंट, पीजीडीसीसीए डिप्लोमा इन अ‍ॅक्चुरिअल सायन्स, पीजी डिप्लोमा इन साऊन्ड रेकॉर्डिंग भाग १, ३ या पेपरचा समावेश आहे. बीएसस्सी सेमीस्टर ३, ५ व बी.सी.ए. सेमिस्टर १, ३, ५ तसेच बी. टेक कॉसमॅटिक सेमिस्टर ३,५,७, बीएफडी सेमिस्टर ३,५, एम.टेक कॉसमॅटिक सेमिस्टर भाग १ या पेपरचा समावेश आहे. बी.एड सेमिस्टर भाग १, ३, बी.एड. (हिंदी) सेमिस्टर भाग १, २, ३, एम.एड भाग १, ३, सेमिस्टर १, ३, बी.पी.एड भाग १,३ आदी पेपरचा समावेश आहे.उन्हाळी परीक्षांमध्ये कोणत्याही उणिवा राहू नये, याची दक्षता घेतली जात आहे. परीक्षा विभागाचे अधिकारी, कर्मचारी त्याअनषंगाने कार्यरत असून, कुलगुरू, प्र-कुलगुरू, कुलसचिवांच्या मार्गदर्शनात परीक्षा पार पाडल्या जातील.- जयंत वडते,संचालक, परीक्षा नियंत्रक