शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा
2
"कुठल्याही थेट युद्धातल्या विजयापेक्षा..."; एकनाथ शिंदेंनी केलं PM नरेंद्र मोदींचं कौतुक
3
पाकिस्तानविरुद्धच्या संघर्षादरम्यान या पिल्लांना सरकारने दिली झेड प्लस सुरक्षा, ७०० किमी दूर केली रवानगी
4
भारतीय सैन्याची मोठी तयारी!६ जण ठार, ११ जणांच्या खात्म्यासाठी ऑपरेशन; लष्कर -जैश'च्या दहशतवाद्यांचा शोध सुरू
5
आयकर अधिकारी सांगून छगन भुजबळ यांच्याकडे मागितली एक कोटीची खंडणी; युवक अटकेत
6
पंख्याच्या हवेवरून वरातीत पेटला वाद, लाठ्या-काठ्या, दगड धोंडे घेऊन तुंबळ हाणामारी, एकाचा मृत्यू  
7
पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा आरोप, प्रसिद्ध युट्युबर ज्योती मल्होत्रा हिच्यासह सहा जण अटकेत
8
वेळीच व्हा सावध! टूथपेस्टमुळे होऊ शकतो कॅन्सर; 'हे' केमिकल बेतेल जीवावर, आताच घ्या काळजी
9
गुन्हेगारांना पकडण्यासाठी कालव्यात मारली उडी; तेव्हाच पडली विजेची तार, कॉन्स्टेबलचा मृत्यू
10
केंद्राच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळात शशी थरूर यांचं नाव पाहून काँग्रेस अवाक्, व्यक्त केली अशी प्रतिक्रिया
11
IPL 2025 अंतिम सामन्यावरून मोठा गोंधळ; BCCIच्या 'या' निर्णयावर चाहते संतापले, नेमकं काय घडलं?
12
जबरदस्त! कंपनी असावी तर अशी, नफा होताच बोनस म्हणून दिली ७ महिन्यांची दिली सॅलरी
13
पुणे IED केस: ISIS साठी काम करणाऱ्या दोन जणांना NIA ने विमानतळावरून केली अटक
14
चर्चा युद्धबंदीची सुरू होती, रशियाने हल्ले वाढवले, प्रवाशांवर बॉम्ब टाकले; ९ जणांचा मृत्यू झाला
15
मनाविरुद्ध काही झालं की संताप होतो, चिडचिड होते? रागावर नियंत्रण मिळवण्याच्या ६ टिप्स
16
भयानक! तरुणाची स्टंटबाजी, वेगाने कार चालवून ४ जणांना चिरडलं; थरकाप उडवणारा Video
17
"ओशो आश्रमात गेल्यावर बाबांनी.."; अक्षय खन्नाचा मोठा खुलासा, विनोद खन्नांविषयी काय म्हणाला?
18
Video: केदारनाथ धामला जाताना हेलिकॉप्टर क्रॅश; दैव बलवत्तर म्हणून वाचले
19
Coronavirus Outbreak: टेन्शन वाढलं! हाँगकाँग-सिंगापूरमध्ये कोरोनाचं थैमान, रुग्णांमध्ये मोठी वाढ; भारताला किती धोका?
20
Video - जॉर्जिया मेलोनींच्या स्वागतासाठी अल्बेनियाचे पंतप्रधान भर पावसात गुडघ्यावर बसले अन्...

विद्यापीठ कुशल मनुष्यबळ निर्माण करणार

By admin | Updated: August 6, 2016 00:08 IST

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात शॉर्ट टर्म अभ्यासक्रम सुरु करून कुशल मनुष्यबळ निर्माण करण्यासाठी पुढाकार घेईल,...

कुलगुरुंचे प्रतिपादन : भारत, जपानच्या विद्यार्थ्यांची कार्यशाळाअमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात शॉर्ट टर्म अभ्यासक्रम सुरु करून कुशल मनुष्यबळ निर्माण करण्यासाठी पुढाकार घेईल, असे प्रतिपादन कुलगुरु मुरलीधर चांदेकर यांनी मंगळवारी व्यक्त केले. विद्यापीठाच्या डॉ.के.जी.देशमुख सभागृहात ‘सेतू- स्ट्रेंड रिलेशन्स बिटविन इंडिया अ‍ॅण्ड जपान’ या थीमवर आधारित ‘भारत व जपान येथील विद्यार्थी आणि उद्योजकांसाठी असलेल्या संधी’ याविषयावर आयोजित कार्यशाळेचे अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर कुलसचिव अजय देशमुख, एमबीए विभागप्रमुख संतोष सदार, प्रमुख अतिथी म्हणून जपानचे नैकी माकिनो, इसमू कोयमा, सुसूके मिझुनो आणि आरियोशी नामी, रासेयो समन्वयक गणेश मालटे, प्रौढे निरंतर शिक्षण आणि विस्तारसेवा विभागाचे संचालक श्रीकांत पाटील, महाव्यवस्थापक उदय पुरी उपस्थित होते. आपल्या भागातील विद्यार्थ्यांमध्ये कुशल कामगार घडवून त्यांना जपान येथील रोजगाराच्या संधी मिळाव्यात, या उद्देशाने ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. विद्यापीठाच्या प्रौढ निरंतर शिक्षण आणि विस्तारसेवा विभागाच्यावतीने प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू करणार असल्याचे त्यांनी सांगितले. इसमू कोयमा म्हणाले, जपानमधील अनेक कंपन्या भारतात आल्या आहेत आणि भविष्यात येणार आहेत. भारतात इतर देशांच्या तुलनेत कमी पगारामध्ये दर्जेदार मनुष्यबळ उपलब्ध होते. त्यामुळे भारताला प्राधान्य दिले जाते. सन २०२० पर्यंत भारतात सर्वात जास्त कुशल मनुष्यबळ उपलब्ध होणार आहे. १२०९ जपानी कंपन्यांची २०१४ पर्यंत भारतात नोंदणी केली आहे. मोबाईल वापरणाऱ्यांची संख्या भारतात सर्वात जास्त आहे. स्टार्ट-अप इंडियामध्ये जपान, अमेरिका व इतर देशांच्या कंपन्या भारतात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करीत असून भारतीयांना रोजगारांच्या अनेक संधी उपलब्ध होणार आहेत. विद्यार्थ्यांनी त्यासाठी कठोर परिश्रम व कौशल्य वाढविण्याची गरज आहे. भारतीय विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञान व कौशल्य आत्मसात करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. प्रास्ताविक श्रीकांत पाटील संचालन माधुरी दिवरे यांनी केले. (प्रतिनिधी)