शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

विद्यापीठात विद्वत परिषदेतून सिकची, खाद्री तूर्तास ‘आऊट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2018 21:57 IST

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या विद्वत परिषदेवर (अ‍ॅकेडेमिक कौन्सिल) राज्यपालांचे सदस्य म्हणून नामनिर्देशित केलेले प्राचार्य राधेशाम सिकची व एस.एफ.आर. खाद्री यांचे सदस्यत्व धोक्यात आले आहे.

ठळक मुद्देचौकशी समितीचा अहवाल : राज्यपालांच्या निर्णयाकडे लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या विद्वत परिषदेवर (अ‍ॅकेडेमिक कौन्सिल) राज्यपालांचे सदस्य म्हणून नामनिर्देशित केलेले प्राचार्य राधेशाम सिकची व एस.एफ.आर. खाद्री यांचे सदस्यत्व धोक्यात आले आहे. कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांनी चौकशी समितीच्या आधारे या दोघांनाही पदमुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे याबाबत राज्यपाल कोणता निर्णय घेतात, याकडे नजरा लागल्या आहेत.अकोला येथील सीताबाई कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य राधेशाम सिकची व विद्यापीठाचे भूगर्भशास्त्र विभागप्रमुख एस.एफ.आर.खाद्री यांची फेब्रुवारी २०१८ मध्ये विद्यापीठाच्या विद्वत परिषदेवर राज्यपालांचे नामनिर्देशित सदस्य म्हणून निवड झाली होती. मात्र, विद्यापीठाचे रसायनशास्त्र विभागप्रमुख राजेंद्र प्रसाद यांनी या दोघांच्याही निवडीवर आक्षेप नोंदविला होता. त्याअनुषंगाने कुलगुरू चांदेकर यांनी के.एम. कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती गठित केली होती. या समितीने वस्तुनिष्ठ अहवाल विद्यापीठ प्रशासनाकडे सादर केला आहे. सिकची व खाद्री यांना वेगवेगळ्या प्रकरणात दंड आणि शिक्षा झाल्याचे अहवालात नमूद आहे. त्यामुळे कुलगुरूंनी याप्रकरणी राज्यपालांकडे मार्गदर्शन मागविले आहे. दरम्यान खाद्री, सिकची यांना विद्वत परिषदेतून विद्यापीठ अधिनियम २०१६ च्या ६४ (एफ) अंतर्गत तूर्तास बाहेर ठेवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आहे.प्राचार्य राधेशाम सिकची, एस.एफ.आर. खाद्री यांची राज्यपालांचे सदस्य म्हणून विद्वत परिषदेवर झालेली नियुक्ती नियमबाह्य असल्याचे चौकशी अहवाल प्रशासनाकडे प्राप्त झाला आहे. आता याबाबत राज्यपालांना निर्णय घ्यायचा असून, चौकशी अहवाल पाठविला आहे.- मुरलीधर चांदेकर,कुलगुरू, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ