शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

विद्यापीठात नर, मादी बिबट्यासह बछड्याचा वावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2019 00:55 IST

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात नर, मादी बिबट्यासह बछड्याचा वावर रविवारी दिसून आला. त्यामुळे सुरक्षा यंत्रणेने पुन्हा अलर्ट जारी केले असून, कुलगुरू बंगल्याच्या समोरील रस्त्यावरून तलाव मार्गाकडे ये-जा करण्यास नागरिकांना मनाई करण्यात आली आहे. महिनाभरापासून विद्यापीठ परिसरात बिबट्याने वास्तव्य चालविले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात नर, मादी बिबट्यासह बछड्याचा वावर रविवारी दिसून आला. त्यामुळे सुरक्षा यंत्रणेने पुन्हा अलर्ट जारी केले असून, कुलगुरू बंगल्याच्या समोरील रस्त्यावरून तलाव मार्गाकडे ये-जा करण्यास नागरिकांना मनाई करण्यात आली आहे. महिनाभरापासून विद्यापीठ परिसरात बिबट्याने वास्तव्य चालविले आहे.विद्यापीठ परिसरात बिबट असल्याचे सर्वश्रुत आहे. त्यानुसार प्रशासनाने आतील भागात ये-जा करताना नागिरकांनी सतर्कता बाळगावी, अशा सूचनांचे फलक दर्शनी भागात लावले आहे. मध्यंतरी बिबट विद्यापीठ परिसरात दिसून आला नाही. मात्र, रविवार १९ मे रोजी दुपारी ४ वाजता आणि सायंकाळी ७ वाजता दोन बिबट्यासह बछडा दिसून आले. विद्यापीठ परिसरात ज्या मार्गाने बिबट्याचा संचार आहे, त्या मार्गावर मचान बनविण्यात आले आहे. रविवारी सायंकाळी एक बिबट कुलगुरू बंगल्याच्या मागील बाजूला पाणी पिण्यास आले असताना मचानीवरून विद्यापीठ कर्मचाऱ्यांनी बघितले. मात्र, सुरक्षा रक्षकाने या बिबट्याजवळ वाहन नेताच त्याने नाल्याच्या मार्गाने धूम ठोकली, अशी माहिती सुरक्षा अधिकारी रवींद्र सयाम यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. रविवारी दुपारी ४ वाजता एक बिबट नाल्यात दडून बसल्याचे दिसून आले. त्यामुळे आता विद्यापीठ परिसरात नर, मादी बिबट्यासह बछडा असल्याचे स्पष्ट झाले आहे.दरम्यान, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात सुरक्षा अधिकाऱ्यांनी वनाधिकाºयांना पाचारण केले. मात्र, तोपर्यंत बिबट्याने पोबारा केला होता.सुरक्षा यंत्रणा पुन्हा अलर्ट : संत्राबाग, कुलगुरू बंगल्याच्या मागील बाजूस नाल्यात आढळलेकुलगुरूंचा सीसीएफसोबत मोबाईलवर संवादविद्यापीठ परिसरात बिबट असल्याचे यापूर्वी ट्रॅप कॅमेºयात कैद झाले. रविवारी तीन तासांच्या फरकाने दोन बिबट दिसून आल्यामुळे अधिकारी, कर्मचारी, नागरिकांच्या जीविताचा प्रश्न निर्माण झाला आहे. बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांनी मुख्य वनसंरक्षक प्रवीण चव्हाण यांच्याशी मोबाइलवर संवाद साधला. उपाययोजना तातडीने कराव्यात, असे कुलगुरू चांदेकर म्हणाले.तृष्णातृप्तीसाठी विद्यापीठात धावजंगलात पाणी, भक्ष्य शोधणे कठीण झाले आहे. त्यामुळे महिनाभरापासून वनक्षेत्रात गेलेल्या नर-मादी बिबट्याच्या जोडीने पुन्हा विद्यापीठात धाव घेतली आहे. कुलगुरूंच्या बंगला परिसरात बिबट्याचा संचार असल्याने अप्रिय घडना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. हल्ली बिबट भक्ष्य, पाण्याच्या शोधात असल्याचा अंदाज वनविभागाने वर्तविला आहे.विद्यापीठात नाल्याच्या मार्गाने ये-जा करण्याचा बिबट्याचा संचार मार्ग बंद करण्याबाबत पत्र दिले आहे. रविवारी वनकर्मचाºयांनीसुद्धा नाल्यात बिबट बघितला. तीन ट्रॅप कॅमेरे बसविले होते. पुन्हा दोन कॅमेरे वाढविले आहेत.- कैलास भुंबर, आरएफओ

टॅग्स :leopardबिबट्या