शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
2
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू
3
IND vs ENG : बुमराह एकटा नडला! फिल्डिंगवेळी गडबड घोटाळा; ओली पोपच्या सेंच्युरीसह दुसरा दिवस इंग्लंडचा
4
इराणवर मोठा हल्ला; इस्रायलने पुन्हा खामेनेईंचे कमांडर मारले; अणुशास्त्रज्ञाचाही मृत्यू
5
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
6
बुमराहचा मोठा पराक्रम! इंग्लंडच्या मैदानात पाकच्या वसीम अक्रमच्या विक्रमाला लावला सुरुंग
7
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
8
मोठा खुलासा! राजाचा मृतदेह घरी आणण्यापासून ते अंत्यविधीपर्यंत प्रत्येक क्षणाची खबर सोनमला देत होता राज कुशवाहा अन्... 
9
१४ वर्षांनी लहान असणाऱ्या तरुणाच्या प्रेमात पडली ४५ वर्षांची महिला, पतीला असं संपवलं की कुणाला संशयही आला नाही!
10
"पिक्चर अभी बाकी है…!"; 2029 मधील आपल्या भूमिकेबद्दल नेमकं काय म्हणाले नितिन गडकरी?
11
Superb! पंतच्या खेळीवरील गावसकरांची कमेंट चर्चेत; आधी 'स्टुपिड' म्हणत काढली होती 'अक्कल' (VIDEO)
12
युद्धाच्या सावटाखाली इराण, खामेनेई यांनी निवडले तीन संभाव्य उत्तराधिकारी, पण मुलाचे नाव नाही!
13
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
14
गोदाम फोडणाऱ्या दोघांना अटक; अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, लातूर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
15
मौसम मस्ताना..! जसप्रीत बुमराहनं पहिल्याच षटकात सलामीवीर Zak Crawley चा केला 'करेक्ट कार्यक्रम'
16
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
17
कुपवाडजवळ पावणेबारा लाखांची दारू पकडली, आटपाडीच्या दोघांना अटक, स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई
18
रिलायन्स दरोड्यातील प्रिन्सकुमारला अटक; डेहराडून कारागृहातून ताबा, साथीदारांना दुचाकी पुरवली
19
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
20
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ

कर्मचाऱ्यांच्या योगदानातून विद्यापीठ मोठे झाले

By admin | Updated: July 8, 2016 00:12 IST

कर्मचाऱ्यांनी विद्यापीठाशी ऋणानुबंध ठेवून दीर्घकाळ सेवा दिली. संस्था मोठी करण्यासाठी परिश्रम घेतले.

कुलगुरू : कर्मचाऱ्यांचे विशेष योगदानअमरावती : कर्मचाऱ्यांनी विद्यापीठाशी ऋणानुबंध ठेवून दीर्घकाळ सेवा दिली. संस्था मोठी करण्यासाठी परिश्रम घेतले. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या योगदानातूनच विद्यापीठ मोठे झाल्याचे मत कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांनी व्यक्त केले. विद्यापीठातील गणित विभागाचे प्रमुख किशोर अढाव, परीक्षा विभागातील सहायक कुलसचिव अशोक वानखेडे, वरिष्ठ सहायक च.ना. तागडे व दै.वे.विठ्ठल मावळे यांचा सेवानिवृत्तीप्रसंगी कुलगुरूंनी त्यांचा सत्कार केला. त्याप्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर कुलसचिव अजय देशमुख, परीक्षा नियंत्रक जे.डी. वडते, अढाव, वानखेडे, तागडे, कर्मचारी संघाचे अध्यक्ष अजय देशमुख व जनसंपर्क अधिकारी विलास नांदुरकर उपस्थित होते. डी.एसस्सी. मानाची पदवी विद्यापीठाने दिल्याबद्दल त्यांनी सर्वांप्रती ऋण व्यक्त केले. अशोक वानखेडे म्हणाले, मी विद्यापीठाची प्रामाणिकपणे सेवा केली. त्यामुळे मला समाजातही सन्मान मिळाला. परीक्षा विभागाला कर्मचारी उपलब्ध करून देण्याबाबत विद्यापीठ प्रशासनाने लक्ष द्यावे, असे सुचक वक्तव्य तागडे त्यांनी केले. विठ्ठलराव मावळे यांनी काम करताना सर्वांचे सहकार्य व मार्गदर्शन मिळाल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.सुरूवातीला विद्यापीठ गीताचे सादरीकरण करण्यात आले. कुलसचिव अजय देशमुख, परीक्षा नियंत्रक जे.डी. वडते, आस्थापना विभागातील अधीक्षक मोहन लोमटे यांनी मान्यवरांचे रोपटे देऊन स्वागत केले. प्रास्तविक कुलसचिव अजय देशमुख व परीक्षा नियंत्रक जे.डी. वडते यांनी केले. पतसंस्थेचे अध्यक्ष दीपक काळे यांनी कर्मचारी कल्याण निधीचा धनादेश व पुस्तक सत्कारमूर्तीला सुपूर्द केला. संचालन जनसंपर्क अधिकारी विलास नांदुरकर यांनी, आभार प्रदर्शन अजय देशमुख यांनी केले. यावेळी शशीकांत आस्वले माजी कुलगुरू विलास सपकाळ, माजी प्र-कुलगुरू जयकिरण तिडके, अधिष्ठाता मनोज तायडे, माजी कुलसचिव दिनेशकुमार जोशी, माजी परीक्षा नियंत्रक भि.र. वाघमारे, माजी व्यवस्थापन परिषद सदस्य प्रवीण रघुवंशी, अमरसिंह राठोड, विद्यापीठाच्या विविध विभागांचे विभाग प्रमुख, शिक्षक, अधिकारी व कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते. ( प्रतिनिधी)