शहरं
Join us  
Trending Stories
1
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
2
Maharashtra Rain: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
3
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
4
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
5
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
6
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
7
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
8
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
9
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
10
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
11
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
12
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
13
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
14
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
15
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
16
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
17
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!
18
...तर मी ट्रेनमधून पडून मेलो असतो; एक चूक अन् आयुष्य संपलं असतं, 'मुरांबा'मधील अभिनेत्याने सांगितला धक्कादायक प्रसंग
19
महिन्याला ३० हजार कमावणारेही होऊ शकतात कोट्यधीश, 'अशी' करू शकता गुंतवणूक
20
Black Box: अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले

विद्यापीठ कोरोना लॅबने गाठला कर्तव्यपूर्तीचा महिना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2020 05:01 IST

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील लॅब ४ मे रोजी कार्यान्वित झाली. एम्स, नागपूर आणि आयसीएमआर, दिल्ली यांच्या निकषानुसार या लॅबचे कामकाज होत आहे. महिन्याभरात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत आहे. त्याच त्वरेने विद्यापीठाच्या लॅबमध्ये थ्रोट स्वॅब तपासणीचे काम वेगाने होत आहे. यापूर्वी नमुने नागपूर येथे पाठविले जात होते; तथापि नमुन्यांचे अहवाल येण्यास विलंब होत असल्याने आरोग्य यंत्रणेला उपाययोजना करणे शक्य होत नव्हते.

ठळक मुद्दे३२८८ नमुन्यांची चाचणी : १८८ पॉझिटिव्ह, २८२८ निगेटिव्ह अहवाल, २३६ सदोष

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या विषाणू परीक्षण प्रयोगशाळेच्या कर्तव्यपूर्तीला गुरुवारी एक महिना पूर्ण होत आहे. आतापर्यंत लॅबमध्ये ३२८८ नमुन्यांची चाचणी करण्यात आली. यात १८८ नमुने पॉझिटिव्ह आले. २८२८ नमुन्यांचा निगेटिव्ह अहवाल देण्यात आले आहे. विद्यापीठाच्या लॅबमुळे जिल्हा आरोग्य प्रशासनाला कोरानाग्रस्तांच्या अहवालांमुळे उपाययोजना करणे शक्य झाले आहे.संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील लॅब ४ मे रोजी कार्यान्वित झाली. एम्स, नागपूर आणि आयसीएमआर, दिल्ली यांच्या निकषानुसार या लॅबचे कामकाज होत आहे. महिन्याभरात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत आहे. त्याच त्वरेने विद्यापीठाच्या लॅबमध्ये थ्रोट स्वॅब तपासणीचे काम वेगाने होत आहे. यापूर्वी नमुने नागपूर येथे पाठविले जात होते; तथापि नमुन्यांचे अहवाल येण्यास विलंब होत असल्याने आरोग्य यंत्रणेला उपाययोजना करणे शक्य होत नव्हते. मात्र, विद्यापीठात कोरोना लॅब सुरु होेताच दरदिवशी वेगाने नमुने तपासणी होत असून, अहवाल वेळेत मिळत आहे. त्यासाठी लॅबमधील चमू रात्री उशिरापर्यंत कर्तव्य बजावत आहे. येथे दरदिवशी ८० ते १०० नमुने तपासणी करण्यात येत आहे.गत महिन्याभरापासून लॅबमधील चमू कोरोनायोद्धा ठरली आहे. मध्यंतरी कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांनी लॅबला भेट देऊन कर्तव्य बजावणाऱ्या चमूचे मनोबल उंचावले होते. लॅबमध्ये निरंतर नमुन्यांची चाचणी होत असल्याने आरोग्य यंत्रणेला कोरोना संसर्ग रोखण्यासाठी उपाययोजना करण्यात मदत होेत आहे. लॅबचे नोडल अधिकारी प्रशांत ठाकरे, नीरज धनवटे, प्रशांत गावंडे, मुकेश बुरंगे, संजयसिंह ठाकूर, उज्ज्वला कवाणे, नीलू सोनी, प्रज्ञा पिंपळकर, पूजा मांडविया, योगेश बेले यांच्यासह एमएस्सीचे विद्यार्थी कोरोनायोद्धा म्हणून सेवा देत आहेत.विद्यापीठ लॅबमध्ये कोरोना चाचणी सुरू होणे ही मोठी उपलब्धी आहे. आरोग्य यंत्रणेला सहकार्य केले जात आहे. रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा या गाडगेबाबांच्या दशसूत्रीवर यानिमित्त अंमल होत आहे. लॅबची चमू सामाजिक सेवेच्या भावनेतून कर्तव्य बजावत आहे.- मुरलीधर चांदेकर, कुलगुरू अमरावती विद्यापीठ.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या