शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

जगावेगळा उड्डाणपूल पीडब्ल्यूडीनेही मिटले डोळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2017 23:43 IST

इर्विन ते राजापेठ पोलीस ठाण्याकडे जाणाऱ्या उड्डाणपुलावरील गतिरोधकावर भरधाव कारची धडक दुचाकीला लागली.

ठळक मुद्देअपघाताची श्रृंखला सुरूच : गतिरोधक अन् दुभाजकही, पांढरे पट्टे मात्र नाही

वैभव बाबरेकर ।आॅनलाईन लोकमतअमरावती : इर्विन ते राजापेठ पोलीस ठाण्याकडे जाणाऱ्या उड्डाणपुलावरील गतिरोधकावर भरधाव कारची धडक दुचाकीला लागली. दुचाकीस्वार सुरक्षा कठड्यावर आदळल्याने सुदैवाने बचावला. मंगळवारच्या या घटनेनंतर उड्डाणपुलाच्या तंत्रशुद्धी देखभालीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.शहरातील हा उड्डाणपूल जगावेगळा आहे. या पुलावर दोन ठिकाणी स्पीडब्रेकर्स आहेत. आता रोड डिव्हायडर निर्मितीचेही काम सुरू करण्यात आले आहे. या दोन बाबी असणारा हा बहुदा जगातील पहिलाच उड्डाणपूल ठरावा.पूर्वी हा उड्डाणपुल बेवारस स्थितीत होता. महापालिका व सार्वजनिक बांधकाम विभाग (पीडब्ल्यूडी) उड्डाणपुलाच्या जबाबदारी झटकत होते. याबाबत 'लोकमत'ने 'बेवारस उड्डाणपूल' हे वृत्त प्रकाशित करून दोन्ही विभागांचा भोंगळ कारभार लोकदरबारी मांडला. 'लोकमत'च्या पाठपुराव्यामुळे उड्डाणपुलाची जबाबदारी पीडब्ल्यूडीने स्वीकारली.जबाबदारी स्वीकारली असली तरी पालकत्त्वाचे कुठलेही कर्तव्य या उड्डाणपुलाबाबत पीडब्ल्यूडीने पार पाडलेले नाही. उड्डाणपुलावर कचरा आणि माती साचली आहे. रेती, गिट्टी, विटा हेदेखील पुलावर बघता येतात. झेब्रा क्रॉसिंगचे पट्टे दिसेनासे झाले आहेत. दिशादर्शक फलक कोलमडून पडले आहेत. अमरावतीत येणाºया बाहेरगावच्या नवख्या वाहनचालकांना उड्डाणपुलावर असलेल्या गतिरोधकांचा अंदाजच येत नाही. त्यामुळे अपघाताची श्रृंखला सुरूच आहे. बरेचदा ऐनवेळी गतिरोधक दिसल्याने वाहनचालक करकचून ब्रेक दाबतात आणि मागून येणारी वाहने पहिल्या वाहनावर धडकतात. मंगळवारी दुपारी घडलेला अपघातसुद्धा याच पद्धतीचा आहे. इर्विनकडे निघालेले दुचाकीस्वार अमोल विश्वनाथ वाकोडे (४१, रा. गोपालनगर) यांनी गतिरोधकावर गती कमी केली आणि एमएच ४० बीजी-०२८० या क्रमाकांचे वाहन दुचाकीला मागून धडकले. अमोल फेकले गेले व उड्डाणपुलाच्या कठड्यावर आदळले. अपघातानंतर कारचालक पसार झाला. उड्डाणपूल सोईसाठी की मृत्यूसाठी याचे उत्तर पीडब्ल्यूडीनेच शोधायचे आहे.उड्डाणपुलावर झेब्रा क्रॉसिंग दिसेनासे झाले आहेत. दिशादर्शक नाहीत. त्यामुळे बाहेरगावातून शहरात येणारे वाहनचालक संभ्रमात पडतात. अशाप्रसंगी अपघात घडतात.- दिलीप पाटील,ठाणेदार, कोतवाली.उड्डाणपुलाच्या देखभालीची जबाबदारी काही दिवसांपूर्वीच आमच्याकडे आली. निविदा प्रक्रिया होताच कामे सुरू होतील. उड्डाणपुलाला लवकरच वेगळे स्वरूप येईल.- सदानंद शेंडगे, कार्यकारी अभियंता, साबांवि