लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शहरातील मुख्य १४ चौकांमधील वाहतूक सिग्नल दुरुस्त करण्यात आले आहेत. काही चौकांमध्ये वाहतूक पोलिसांअभावी सिग्नल ब्लिंकर (उघडझाप) मोडवर आहेत, तर शेगाव नाका चौकातील टायमरची दुरुस्ती एक-दोन दिवसांत करण्यात येत असल्याची माहिती महापालिकेच्या विद्युत विभागाचे उपअभियंता श्याम टोपरे यांनी दिली.शहरातील मुख्य चौक असलेल्या राजकमल, इर्विन, पंचवटी, गर्ल्स हायस्कूल, बियाणी व शेगाव नाका चौकातील वाहतूक सिग्नल सुरू आहेत. शुक्रवारी पंचवटी चौकातील सिग्नलच्या टायमरची दुरुस्ती करून सुरू करण्यात आले आहे. शेगाव नाका चौकातील टायमरची एक-दोन दिवसांत दुरुस्ती करून ते सुरू करण्यात येणार आहे. चपराशीपुरा चौकात सार्वजनिक बांधकाम विभागाकडून रस्त्याचे काम सुरू असल्याने या ठिकाणी सिग्नल हे ब्लिंकर मोडवर सुरू असल्याची माहिती टोपरे यांनी दिली.दस्तुरनगर चौकात सिग्नलसमोर झाड आडवे येत असले तरी हा सिग्नल सुरू करण्यात येईल. नवाथे चौकात ब्लिंकर बंद करून तेथे सिग्नल सुरू करण्याचे आयुक्तांचे निर्देश आहेत. गोपालनगर चौकात सिग्नल सुरू आहे. मात्र, या ठिकाणी पोलीस शिपाई आवश्यक असल्याचे टोपरे यांनी सांगितले. पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी शहरातील वाहतूक समस्यांबाबत पोलीस आयुक्त व महापालिका आयुक्त यांनी निर्देशित केल्यानंतर या दोन्ही विभागांमध्ये समन्वय बैठक झाली.या ठिकाणी हवे पोलीस कर्मचारीशेगाव नाका चौक, बियाणी चौक, कोर्ट, चपराशीपुरा चौक, कठोरा नाका या ठिकाणचे सिग्नल सुरू आहेत. शहरातील वाहतूक सुरळीत व्हावीत, यासाठी कोर्ट, चपराशीपुरा व अन्य ठिकाणी पोलीस कर्मचारी नियुक्त करणे महत्त्वाचे असल्याचे महापालिका प्रशासनाने सांगितले. सिग्नल दुरुस्तीचा इलेक्ट्रोअॅड हे कंत्राटदार इंंदोर येथील असल्याने देखभाल दुरुस्तीला अवधी लागतो.