शहरं
Join us  
Trending Stories
1
' भारतीय अपमान सहन करीत नाहीत, अमेरिकेच्या दबावापुढे भारत कधीच झुकणार नाही' : पुतिन
2
...तर पाकिस्तान जागतिक नकाशावर दिसणार नाही! भारतीय लष्करप्रमुखांनी खडसावले 
3
अमेरिकी रस्त्यावर भारतीय बाइक्सने अभिमान वाटतो; राहुल यांनी अमेरिकेत केला भारतीय कंपन्यांचा गौरव
4
लेह हिंसाचार : सोनम वांगचुक यांना अटक; न्याय मागण्यासाठी पत्नी कोर्टात
5
‘बाबा’ विद्यार्थिनींना रात्री खोलीत येण्यास भाग पाडायचा; मिळाली १४ दिवस कोठडी
6
आता सौरऊर्जेवर चालणारी ई-बुलेट आली; ऊर्जाबचत, प्रदूषण नियंत्रणासाठी मोठा फायदा
7
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
8
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
9
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
10
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
11
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
12
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
13
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
14
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
15
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
16
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
17
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
18
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
19
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
20
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की

अग्रीम समायोजनातील गोंधळ निस्तरेना !

By admin | Updated: February 26, 2017 00:13 IST

सुमारे तीन वर्षांपासून महापालिकेत सुरू असलेला अग्रीम समायोजनातील गोंधळ अद्यापपर्यंतही निस्तारलेला नाही.

महापालिकेतील गौडबंगाल : अधिकारी-कर्मचाऱ्यांचा खोअमरावती : सुमारे तीन वर्षांपासून महापालिकेत सुरू असलेला अग्रीम समायोजनातील गोंधळ अद्यापपर्यंतही निस्तारलेला नाही. अतिरिक्त आयुक्त हा गोंधळ शमविण्यासाठी आग्रही असले तरी लेखा विभागाकडून त्यांना सहकार्य मिळत नसल्याने या प्रशासकीय सावळागोंधळात भर पडली आहे. चार-पाच हजार रुपयांचा मालमतता कर थकित ठेवल्यास संबंधितांवर कारवाईचा दंडुका उगारण्यात येतो. कर थकविणाऱ्यांच्या घरासमोर ‘डफ’ वाजण्याचा इशारा दिला जातो. मात्र, प्रशासनात राहून महापालिकेचे आर्थिक नुकसान करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांविरुद्ध फारशी कारवाई केली जात नसल्याचे या निमित्ताने उघड झाले आहे. महापालिकेतील ६३ पेक्षा अधिक अधिकारी-कर्मचाऱ्यांनी सन २०११-१२ मध्ये ८६ लाख ६१ हजार ७७९ रुपये अग्रीम उचलले. सदर काम पूर्ण झाल्यानंतर त्याची संपूर्ण देयके व हिशेब ठेवून उचललेल्या अग्रीम रकमेचे समायोजन करणे अनिवार्य होते. मात्र, अनेक विभागप्रमुख व अन्य कर्मचाऱ्यांनी ८६ लाखांहून अधिक असलेली ही रक्कम अ‍ॅडव्हान्स म्हणून उचलली खरी; मात्र ती कुठे खर्च केली, याचा हिशेब त्यांना देता अद्यापही देता आलेला नाही, हे विशेष. त्यामुळे आर्थिक अनियमिततेची पालही चुकचुकली. या आर्थिक अनियमिततेवर ठपका ठेवून ही अग्रीम रक्कम संबंधित कर्मचारी अधिकाऱ्यांच्या वेतनातून वसूल करावी, असे निर्देश लेखा परीक्षकांनी घेतले होते. २०१३-१४ मध्ये हे लेखा आक्षेप महापालिकेला कळविल्यानंतरही यंत्रणेने ही रक्कम वसूल करण्यासाठी फारसे प्रयत्न केले नाहीत; तथापि अतिरिक्त आयुक्त म्हणून लेखा विभागाची जबाबदारी घेतल्यानंतर सोमनाथ शेटे यांनी अग्रीम समायोजनातील गोंधळावर प्रकाशझोत टाकला. लेखाधिकाऱ्यांशी वारंवार पत्रव्यवहार करून ती रक्कम वेतनातून वसूल करण्याच्या सूचना दिल्या आहेत. जुलै २०१६ मध्ये या सूचना देण्यात आल्यानंतरही अग्रीमची रक्कम समायोजित करण्यात आलेली नाही. १० लाखांची वसुली ?अग्रीम समायोजनाची रक्कम संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या वेतनातून कपात करण्याच्या सूचना अतिरिक्त आयुक्त शेटे यांनी जुलै २०१६ मध्ये मुख्य लेखाधिकाऱ्यांना दिल्या होत्या. मात्र, अनेक कर्मचाऱ्यांनी दबाव आणून आपले संपूर्ण वेतन काढून घेऊन शेटेंच्या आदेशाची पायमल्ली केली. जुलै ते डिसेंबर या कालावधीत ८६.६१ लाखांपैकी केवळ १० लाख रुपयेच वसूल करण्यात आल्याची माहिती आहे. जानेवारीचे वेतन अद्याप देण्यात आले नसल्याची ओरड आहे. देयके देणार कुठून ?८१.६१ लाखांचे अग्रीम समायोजन २०११-१२ आर्थिक वर्षातील आहे. २०१७ मध्येही प्रशासन ही रक्कम संबंधितांकडून वसूल करू शकले नाही. विशेष म्हणजे यातील काही रक्कम संबंधितांनी परस्पर वापरल्याची बाब अधोरेखित झाली आहे. आता त्या रक्कमेचे समायोजन करण्यासाठी पाच वर्षांनंतर बनावट देयके देण्याशिवाय संबंधितांकडे पर्याय नसल्याचे महापालिकेत बोलले जाते. एकतर बनावट देयके देऊन हिशोब सादर करा, अन्यथा ती रक्कम भरा, असे दोन पर्याय असल्याने ८६ लाखांपैकी सुमारे ५० लाखांच्या अग्रीमचे समायोजन होऊच शकत नाही, असा दावा कर्मचाऱ्यांमधून होत आहे.