शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

पोषण आहाराचे धान्य निकृष्ट आढळल्यास कारवाई; भरारी पथकामार्फत धान्याची तपासणी बंधनकारक

By जितेंद्र दखने | Updated: April 5, 2023 18:39 IST

प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेअंतर्गत शाळांना पुरवल्या जाणाऱ्या धान्यादी मालाची शालेय शिक्षण विभागाच्या भरारी पथकामार्फत तपासणी बंधनकारक करण्यात आली आहे

अमरावती : प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेअंतर्गत शाळांना पुरवल्या जाणाऱ्या धान्यादी मालाची शालेय शिक्षण विभागाच्या भरारी पथकामार्फत तपासणी बंधनकारक करण्यात आली आहे. हे धान्य निकृष्ट दर्जाचे आढळल्यास संबंधित पुरवठादारावर दंडात्मक कारवाईचा बडगा उभारला जाणार आहे. त्यानुसार शिक्षण विभागाने पोषण आहार धान्याची तपासणी करण्याचे निर्देश भरारी पथकाला दिल्याने पुरवठादारांचे धाबे दणाणले आहेत. 

केंद्र आणि राज्य शासनातर्फे राज्यातील इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी पोषण आहार योजना राबविली जाते. यामध्ये तांदूळ आणि अन्य धान्य शाळांना पुरविण्यासाठी जिल्हानिहाय पुरवठादार नियुक्त करण्यात आले आहे. त्यासाठी पुरवठादाराबरोबर करारनामा करण्यात आला आहे. धान्याची चढ-उतार वाहतूक आणि सुरक्षित वितरणाची जबाबदारी पुरवठादारांचीच राहणार आहे. पोत्यावर प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना विक्रीसाठी नाही, असा उल्लेख असणे बंधनकारक आहे. शासनाच्या आदेशानुसार आणि जिल्ह्यांनी नोंदवलेल्या मागणीनुसार धान्याचा पुरवठा करणे, पुरवठादारास बंधनकारक आहे. अहवाल सादर करावा लागणारया धान्याची भरारी पथकातर्फे तपासणी करावी, प्राथमिक शिक्षणाधिकारी यांनी त्यांचे प्रतिनिधी दर महिन्याला पुरवठादाराच्या गोदामांना भेटी देऊन तांदूळ आणि धान्याचा दर्जा साठवणूक वितरण आणि शिल्लक धान्य बाबतच्या नोंदीची तपासणी करून त्याचा अहवाल शिक्षण संचालनालयास सादर करावा लागणार आहे. पुरवठादारांनी निकृष्ट धान्य पुरवल्याचे आणि प्रयोगशाळेत तपासणी करून समाधानकारक अहवाल प्राप्त न झाल्यास धान्याच्या पुरवठ्यात गैरप्रकार केल्याचे निदर्शनास आल्यास कारवाई करण्यात येईल, तसेच फौजदारी गुन्हा दाखल करणे, पुरवठादाराला काळ्या यादीत टाकण्याची कारवाई करण्याचे अधिकार प्राथमिक शिक्षण संचालकांकडे सोपविण्यात आले आहे.

शालेय पोषण आहारातील धान्याची तपासणी करण्याबाबत वरिष्ठस्तरावरून सूचना मिळालेल्या आहेत. त्यानुसार पोषण आहाराची तपासणी केली जाईल. त्यात काही गैरप्रकार आढळल्यास किंवा धान्य निकृष्ट असल्याचे आढळल्यास संबंधितांवर योग्य ती कारवाई करण्याबाबत वरिष्ठांकडे अहवाल पाठविला जाईल. - बी. आर. खरात, शिक्षणाधिकारी (प्राथमिक)

 

टॅग्स :Amravatiअमरावती