शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
4
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
5
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
6
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
7
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
8
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
9
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
10
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
11
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
12
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
13
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
14
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
15
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
16
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
17
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
18
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
19
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
20
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

अविश्वसनीय!

By admin | Updated: June 3, 2016 00:09 IST

गुरुवारी अविश्वसनीयच घडले. दिगंबर डहाके गेले. मुंबईत उपचारादरम्यान झालेल्या त्यांच्या अकाली मृत्यूची बातमी अंबानगरीत सायंकाळी साडेसहाच्या सुमारास धडकली,

गुरुवारी अविश्वसनीयच घडले. दिगंबर डहाके गेले. मुंबईत उपचारादरम्यान झालेल्या त्यांच्या अकाली मृत्यूची बातमी अंबानगरीत सायंकाळी साडेसहाच्या सुमारास धडकली, त्यावेळी ऐकणाऱ्या प्रत्येकाचे काळीजही धडकलेच. गरिबी, संघर्ष आणि कर्तृत्त्वातून साकार झालेले व्यक्तिमत्त्व म्हणजे दिगंबर डहाके. वयाची जेमतेम पंचेचाळीशी गाठलेल्या या कार्यकर्त्याच्या लोकप्रियतेची उंची वयाच्या तुलनेत कैकपटीने अधिक होती. महापालिकेत चतुर्थ श्रेणी कर्मचारीपदी राबलेल्या वडिलांच्या पोटी जन्मलेल्या दिगंबर यांनी त्याच महापालिकेचे उपमहापौरपद भूषविले. माळीपुऱ्यातील आठ बाय वीस क्षेत्रफळाच्या घरात तीन भाऊ आणि बहिणीसह लहानपण घालविलेल्या दिगंबर यांनी गरिबी जवळून अनुभवली होती. खेळण्या-बागडण्याच्या, खेळणी घेऊन मागण्यासाठी आईवडिलांकडे हट्ट धरण्याच्या वयात त्यांनी कुंकू आणि अगरबत्ती निर्मितीच्या कारखान्यात कष्ट उपसले. स्वत:च्या कर्तव्याची जाण या उमद्या तरुणाला त्या वयापासूनच होती. 'जगावे की शिकावे' या कात्रित आयुष्य सापडले. त्यांनी आयुष्याची शाळा निवडली. पुस्तकांच्या शाळेत ते १२ वी पर्यंतच शिकले. आयुष्याच्या शाळेत मात्र ते कायम गुणवत्ता यादीत राहिले. परिस्थिती नाही म्हणून रडत-कुढत आयुष्य जगण्याऐवजी परिस्थितीवर मात करून आयुष्य जिंकण्याच्या पर्यायाची निवड या लढवय्याने केली होती. विचारच माणसाच्या आयुष्याला आकार देतो. 'आयुष्य किती जगलात, यापेक्षा आयुष्य कसे जगलात', हे महत्त्वाचे सूत्र दिगंबरांच्या जगण्याची दिशा ठरवीत होते. किशोरवयात प्रभात मंडळाशी ते जुळले. त्याचकाळी प्रवीण हरमकर यांच्याशी त्यांची घनिष्ट मैत्री झाली. या मंडळातूनच दिगंबर घडले. 'धाडस' हा दिगंबर यांचा 'रक्तगट'च. अन्याय दिसला की धमण्यांमधून वाहणारे रक्त उसळलेच म्हणून समजा. 'अन्याय सहन करणे म्हणजे अन्यायाला साथ देणे' हे महात्मा गांधी यांचे तत्त्वज्ञान हाडाचे शिवसैनिक असलेल्या दिगंबर यांच्या व्यक्तिमत्त्वात ठासून भरले होते. स्वत:ची वैचारिक भूमिका मांडण्याइतपत आणि त्या भूमिकेच्या पाठीशी ताकदीने उभे राहण्याइतपत वैचारिक अधिष्ठान दिगंबरांनी कमविले होते. तारूण्यात अन्यायाविरुद्ध पेटून उठताना दिगंबर यांची आक्रमक ओळख अमरावतीला झाली. १९९४ साली इंद्रपुरीत उसळलेल्या दंगलीदरम्यान त्यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे या 'अँग्री यंग मॅन'ला समाजमानात आगळी मान्यता मिळाली. पुढे ओघानेच हा तरुण राजकारणात ओढला गेला. विविध प्रभागांतून सलग पाचवेळा हा तरुण नगरसेवकपदी निवडून गेला. कॅम्पसारख्या उच्चविद्याविभूषित आणि उच्चभ्रु लोकांनी दिगंबर यांना दोनवेळा प्रतिनिधीत्त्व बहाल केले. आक्रमकतेसोबतच वैचारिकतेला मिळालेली ती मान्यता ठरली.