शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

शहरातील विनापरवानगी आरओ प्लांट, बोअर सील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2020 05:00 IST

राष्ट्रीय हरित लवाद (एनजीटी) व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने (एमपीसीबी) सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांना प्लांटच्या चौकशीचे आदेश निर्गमित केले आहेत. याअनुषंगाने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडाळाचे कॉन्सेट टू ऑपरेट सेंट्रल ग्राऊंड वॉटर अथॉरिटी आणि फूड अ‍ॅन्ड ड्रग अ‍ॅडमिनिस्ट्रेशन यांच्या ना-हरकत, परवानगीशिवाय बेकायदेशीररीत्या पिण्याच्या थंड पाण्याचे जार-कॅन विक्री करण्याचा व्यवसाय, प्लांट तात्काळ बंद, सील करण्याबाबत निर्देश मिळाले आहेत.

ठळक मुद्देआयुक्तांचे आदेश, मानवी आरोग्यास पाणी अपायकारक

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शुद्ध व थंड पाण्याच्या नावावर अनेकांनी शहरात विनापरवानगी आरओ प्लॉंट सुरू केले आहेत.  हे पाणी मानवी आरोग्यास अपायकारक अन् भूगर्भातील अमर्याद उपसा करून मिळविलेले असल्याने महापालिका क्षेत्रातील सर्व पिण्याचे थंड पाणी कॅन-जार प्लांट बंद करून सील करण्याचे आदेश आयुक्त प्रशांत रोडे यांनी  प्रशासनाला दिले. राष्ट्रीय हरित लवाद (एनजीटी) व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने (एमपीसीबी) सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांना प्लांटच्या चौकशीचे आदेश निर्गमित केले आहेत. याअनुषंगाने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडाळाचे कॉन्सेट टू ऑपरेट सेंट्रल ग्राऊंड वॉटर अथॉरिटी आणि फूड अ‍ॅन्ड ड्रग अ‍ॅडमिनिस्ट्रेशन यांच्या ना-हरकत, परवानगीशिवाय बेकायदेशीररीत्या पिण्याच्या थंड पाण्याचे जार-कॅन विक्री करण्याचा व्यवसाय, प्लांट तात्काळ बंद, सील करण्याबाबत निर्देश मिळाले आहेत. हरित लवादात दाखल प्रकरण क्र. ७५/२०१७ नुसार जलप्रदूषण अधिनियम १९७४ व वायुप्रदूषण अधिनियम १९८१ अन्वये पिण्याचे थंड पाणी कॅन-जारमध्ये विक्रीकरिता निर्माण करणाऱ्या उद्योगांसंदर्भात उपरोक्त याचिका दाखल असून, विनापरवानगी सुरू असलेले युनिट-प्लांट तात्काळ सील करण्याचे व कारवाईचा अनुपालन अहवाल सादर करण्याचे आदेश राष्ट्रीय हरित लवादाचे आहेत. महानगरपालिकेने त्यानुसार कारवाई सुरू केली आहे. 

तीन दिवसांत मागितला अहवालआदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी महापालिकेच्या सर्व झोन अंतर्गत ज्येष्ठ स्वास्थ्य निरीक्षक, स्वास्थ्य निरीक्षक आणि बाजार व परवाना विभागाकडून पथक स्थापन करण्यात आले.  तीन दिवसांच्या आत थंड पाणी विक्री व उत्पादन होणारे प्लांट बंद करून सील करण्याचे आदेश व तसा अहवाल सादर करण्याचे आदेश मनपा आयुक्त प्रशांत रोडे यांनी यंत्रणेला दिले आहेत. 

भूगर्भाचा अमर्याद उपसा  महापालिका क्षेत्रातील आरओ प्लांटमुळे भूगर्भातील पाण्याचा अमर्याद उपसा होत असल्याने शहरातील पाण्याची पातळी दिवसेंदिवस खालावली असल्याचे निदर्शनास आले आहे. अशा प्लांटचा शोध घेऊन त्यांना ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’ व बाजार परवाना विभागाची नोंदणी करणे यापूर्वीच बंधनकारक करण्यात आले. मात्र, प्रशासनाला याचा विसर पडला. 

हॉटेलमध्येही वापरले जाते बोअरचे पाणी अनेक हॉटेलमध्ये नियमबाह्य बोअर करून पाण्याचा वाणिज्यीक वापर होत आहे. आरओ प्लांटमध्येही नियमबाह्य बोअर तयार करून विनापरवानगी उपसा होत आहे. या व्यावसायिकांकडे तीन प्रकारच्या एनओसी नसल्याने अशा ठिकाणी कारवाई करण्यात येत आहे. सध्या ३० ठिकाणी कारवाई करण्यात आल्याचे बाजार परवाना विभागाचे प्रमुख श्रीकांत चव्हाण यांनी सांगितले.

टॅग्स :Waterपाणी