शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेच्या आरक्षित जागेवर अनधिकृत बांधकाम, पाच जणांविरुद्ध गुन्हा

By प्रदीप भाकरे | Updated: February 13, 2023 14:23 IST

नोटीसला न जुमानता बांधकाम थांबविण्यास नकार

अमरावती : महापालिकेच्या आरक्षित जागेवर अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी एका महिलेसह पाच जणांविरुद्ध गाडगेनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. झोन १ चे शाखा अभियंता आनंद जोशी यांनी याबाबत ११ फेब्रुवारी रोजी गाडगेनगर ठाण्यात तक्रार दाखल केली होती.             महापालिकेच्या विकास योजना अर्थात डीपीमध्ये शहरातील काही जागा आरक्षित करण्यात आल्या आहेत. त्याच मालिकेत मौजे म्हसला येथील तपोवननजीकची गोविंदनगर येथील सर्व्हे क्रमांक २२/१९ व २३/ १ हे भूखंडदेखील आरक्षित आहेत. त्यावर गेल्या अनेक वर्षांपासून अनधिकृत बांधकाम करण्यात आले. मात्र, अलीकडे एका महिलेकडून होत असलेल्या नव्या बांधकामाबाबत महापालिकेच्या रामपुरी कॅम्प झोनकडे तक्रार करण्यात आली.

गोविंदनगर येथील रहिवाशांच्या तक्रारीच्या अनुषंगाने झोन १ चे अभियंता आनंद जोशी यांनी स्थळ पाहणी केली. तक्रारकत्यांचे बयाण नोंदवून घेतले. महापालिकेच्या आरक्षित जागेवर ज्या महिलेने बांधकाम सुरू केले. त्या महिलेला २० डिसेंबर २०२२ रोजी बांधकाम त्वरित बंद करण्याची नोटीस देण्यात आली. मात्र बांधकाम न थांबविल्यामुळे पुन्हा १ व ३ फेब्रुवारी रोजी अनुक्रमे दुसरी व तिसरी नोटीस देण्यात आली. मात्र, तिसऱ्या नोटीसनंतरही बांधकाम न थांबविल्यामुळे जोशी यांनी तक्रार नोंदविली. त्या महिलेसह अनधिकृत बांधकाम करणाऱ्या रामवतार मिश्रा, नंदू अवधूत गायगोले, जितेंद्र झटाले व गणेश चौबे (सर्व रा. अमरावती) यांच्याविरुद्ध महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम १९६६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.

मध्यस्थांकडून फसवणुकीची शक्यता

अनेकदा काही मध्यस्थांकडून डीपीत आरक्षित असलेल्या जागादेखील विक्रीला आहेत, असे ठामपणे सांगितले जाते. नकाशात डीपी असे नमूद असताना तो डीपी रोड असल्याची थाप मारली जाते. प्रसंगी खरेदीदेखील नोंदणीकृत केली जाते. असाच काहीसा प्रकार गोविंदनगर येथील प्लॉट घेणाऱ्यांशी झाल्याची माहिती हाती आली आहे.

महापालिकेच्या आरक्षित जागेवरील अनधिकृत बांधकाम थांबविण्याबाबत तीनदा नोटीस बजावल्या. मात्र, तरीही संबंधितांनी काम थांबविले नाही. त्यामुळे गाडगेनगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली. पोलिसांनी गुन्हे दाखल केलेत.

- भूषण पुसतकर, सहायक आयुक्त, झोन १

टॅग्स :Enchroachmentअतिक्रमणAmravatiअमरावती