शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

'यूजीसी नेट' आता ३०० गुणांची, 'जेआरएफ'ना सूट, वयाची अट शिथिल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2018 18:59 IST

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (सीबीएसई) सहायक प्राध्यापक पदासाठी घेतली जाणारी राष्ट्रीय पात्रता परीक्षा (यूजीसी नेट) आता ३०० गुणांची (१५० प्रश्न) राहणार आहे. सीबीएसईने परीक्षेच्या स्वरूपात काही बदल केले असून, ज्युनिअर रिसर्च फेलो (जेआरएफ) साठी वयाची अटही दोन वर्षांनी शिथिल करण्यात आली आहे.

अमरावती - केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (सीबीएसई) सहायक प्राध्यापक पदासाठी घेतली जाणारी राष्ट्रीय पात्रता परीक्षा (यूजीसी नेट) आता ३०० गुणांची (१५० प्रश्न) राहणार आहे. सीबीएसईने परीक्षेच्या स्वरूपात काही बदल केले असून, ज्युनिअर रिसर्च फेलो (जेआरएफ) साठी वयाची अटही दोन वर्षांनी शिथिल करण्यात आली आहे. याबाबतचे परीपत्रक सीबीएसईने जारी केले असून, नव्या नियमांनुसार ८ जुलै रोजी परीक्षा होणार आहे. याबाबतची अधिकृत घोषणा वेबसाइटवर १ फेब्रुवारीला होणार आहे. 

असे असेल परीक्षेचे स्वरूपनेट परीक्षेत सीबीएसईकडून काही मूलभूत बदल करण्यात आले आहेत. त्यानुसार परीक्षा आता ३५० ऐवजी ३०० गुणांची असणार आहे. पूर्वी असणाºया तीनऐवजी आता दोनच पेपर राहतील. पहिला पेपर ५० प्रश्नांचा व दुसरा पेपर १०० प्रश्नांचा आहे. परीक्षेच्या वेळेतही बदल करण्यात आला आहे. १०० गुणांच्या (५० प्रश्न) पहिल्या पेपरसाठी एक तासाचा अवधी असणार आहे. २०० गुणांच्या (१०० प्रश्न) दुसºया पेपरसाठी दोनच तास वेळ असणार आहे. 'जेआरएफ'साठी वयाच्या अटीत २ वर्षांनी वाढज्युनिअर रिसर्च फेलोसाठी पूर्वीच्या खुल्या गटासाठी असलेली २८ वर्षे वयाची मर्यादा ३० वर्षे करण्यात आली आहे. मागास प्रवर्गांसाठी पाच वर्षे अधिक असणार आहेत. असा असेल नेट परीक्षेचे कार्यक्रमसीबीएसईच्या नव्या नियमानुसार यूजीसी नेट परीक्षा ८ जुलै रोजी होणार आहे. ६ मार्च ते ५ एप्रिल आॅनलाइन फॉर्म भरता येईल. ६ एप्रिल रोजी चलान भरण्याची अंतिम मुदत राहील.

टॅग्स :examपरीक्षाnewsबातम्या