शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

ट्रॅव्हल्सच्या धडकेत दोन युवक ठार, चिंचखेड फाट्यावरील घटना

By प्रदीप भाकरे | Updated: October 18, 2022 22:39 IST

वरुडकडे भरधाव जाणाऱ्या ट्रॅव्हल्सच्या धडकेत दुचाकीस्वार दोन युवक घटनास्थळीच ठार झाल्याची घटना मंगळवारी रात्री ९ वाजताच्या दरम्यान चिंचखेड फाट्यावर घडली.

वरुडकडे भरधाव जाणाऱ्या ट्रॅव्हल्सच्या धडकेत दुचाकीस्वार दोन युवक घटनास्थळीच ठार झाल्याची घटना मंगळवारी रात्री ९ वाजताच्या दरम्यान चिंचखेड फाट्यावर घडली. माहुली जहागीर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन दोघांचेही मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविले. दोन्ही युवकांची ओळख अद्याप पटली नसून ट्रॅव्हल्स चालकावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.ट्रॅव्हल्स क्र.एम.पी.३०,पी.२९५ भरधाव वेगाने प्रवासी घेऊन जात असतांना दोन युवक नवीन दुचाकीने माहुली जहागीरकडे येत असतांना चिंचखेड फाट्यानजीक ट्रॅव्हल्सने दुचाकीला जबर धडक दिली. यामध्ये दोन्ही युवक घटनास्थळीच ठार झाले. घटनेनंतर बघ्यांची एकच गर्दी उसळली होती. नागरिकांनी माहुली जहागीर पोलिसांना घटनेबाबत माहिती दिली. पोलिसांनी लगेच घटनास्थळ गाठून पंचनामा केला व दोन्ही मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आले.माहुली जहागीर पोलीस स्टेशनचे ठाणेदार विरुळकर यांचेशी संपर्क साधला असता त्यांनी मृतदेहाची अद्याप ओळख पटलेली नसल्याचे सांगितले. ट्रॅव्हल्स च्या चालकावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. पुढील तपास माहुली जहागीर पोलीस करीत आहेत.

टॅग्स :Accidentअपघात