सूरज दाहाट।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती/तिवसा : शेतकऱ्यांना वरदान ठरणारा अप्पर वर्धा$ प्रकल्पाचा तिवसा-सातरगाव मार्गावरील कालवा हा नागरिकांसाठी मात्र जीवघेणा ठरत आहे. या कालव्यात अनेकांचे जीव गेले असले तरीही तातडीच्या उपाययोजनांकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. या जीवघेण्या दुर्लक्षितपणासाठी संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध सदोष मनुष्यवधाचे गुन्हे का नोंदविण्यात येऊ नयेत, असा सवाल उपस्थित होत आहे.शेतकऱ्यांच्या शेतजमिनी ओलिताखाली याव्यात, यासाठी तिवसा तालुक्यातून कालवा गेला आहे. यात मोर्शीच्या अप्पर वर्धा धरणातून या कालव्यात पाणी सोडले जाते. आता रब्बी हंगामातील पिकांसाठी कालव्यात १३ फुटांहून अधिक पाणी आहे. हा कालवा सिमेंट काँक्रीटने बांधला असून, यात पाण्याचा प्रवाह वेगवान असतो. त्यामुळे कोणी कालव्यात पडला की, त्याचा मृत्यूच अटळ आहे. महिनाभरात या कालव्यात दोघांचा मृत्यू झाला. मात्र, तरीही या कालव्यात नागरिक कपडे धुण्यासाठी, आंघोळीसाठी येतात. त्यांना धोक्याच्या सूचना देणाऱ्या उपाययोजनांची येथे वानवा आहे.जाळ्या लावण्याची मागणीतिवसा ते सातरगाव रोडवर आनंदवाडी येथे लोकवस्तीनजीक हा कालवा वाहतो. येथेच अनेक जण कालव्यात वाहून गेले आहेत. सुरक्षेसाठी लोकवस्तीनजीक कालव्याला जाळ्या लावणे गरजेचे झाले आहे. कालव्यात लोखंडी कड्या तसेच चाळणी लावण्यात याव्या, अशीही मागणी होत आहे. मात्र, अप्पर वर्धा प्रकल्प प्रशासनाने यातील एकही मागणी पूर्ण केलेली नाही.कठड्याची उंची वाढवाकाही तरुण सातरगाव मार्गातील पुलाच्या कठड्यावरून कालव्यात उडी घेतात. त्यामुळे या कालव्याच्या पुलाच्या कठड्याची उंचीदेखील वाढविण्याची गरज आहे.फलक धूसरकालव्याच्या कडेला लावलेले धोक्याची सूचना देणारे फलक पूर्णपणे धूसर झाले आहेत. निदान ते व्यवस्थित केले तरी नागरिकांना इशारा मिळू शकतो. मात्र, तेही झालेले नाही.कालवा हा रेड झोनमध्ये आहे. या कालव्यात कोणी आंघोळ अथवा कपडे धुण्यासाठी जाऊ नये. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अप्पर वर्धा विभागाला सूचना देण्यात आल्या आहेत.- वैभव फरतारे,तहसीलदार, तिवसापाण्याचा प्रवाह वेगवान असल्याने कालवा परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित आहे. या क्षेत्रात धोक्याची सूचना देणारे फलक लावले आहेत. पोलिसांनाही याबाबत कळविले आहे. आमच्याकडे कालवा निरीक्षक आदी पदांचा वानवा आहे, शिवाय एवढ्या मोठ्या क्षेत्रासाठी कठडे लावणे शक्य नाही.- पी.डी. सोळंके, कार्यकारी अभियंता, अप्पर वर्धा प्रकल्प
महिनाभरात दोन बळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2020 06:00 IST
शेतकऱ्यांच्या शेतजमिनी ओलिताखाली याव्यात, यासाठी तिवसा तालुक्यातून कालवा गेला आहे. यात मोर्शीच्या अप्पर वर्धा धरणातून या कालव्यात पाणी सोडले जाते. आता रब्बी हंगामातील पिकांसाठी कालव्यात १३ फुटांहून अधिक पाणी आहे. हा कालवा सिमेंट काँक्रीटने बांधला असून, यात पाण्याचा प्रवाह वेगवान असतो. त्यामुळे कोणी कालव्यात पडला की, त्याचा मृत्यूच अटळ आहे. महिनाभरात या कालव्यात दोघांचा मृत्यू झाला.
महिनाभरात दोन बळी
ठळक मुद्देउपाययोजना केव्हा? : अधिकाऱ्यांविरुद्ध सदोष मनुष्यवधाचे गुन्हे का नाही?