शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

गरजूंसाठी बांधून दिली दोन शौचालये

By admin | Updated: March 22, 2017 00:13 IST

यशस्वी वैद्यकीय व्यवसायी असतानाच येथील हृदयरोगतज्ज्ञ मनोज निचत यांनी त्यांचे जन्मगाव असलेले अंजनगाव बारी येथे गरजुसांठी दोन शौचालयांचे बांधकाम करून दिले.

निचत कुटुंबाचा पुढाकार : जिल्हधिकाऱ्यांची भेट, सामाजिक उपक्रमअमरावती : यशस्वी वैद्यकीय व्यवसायी असतानाच येथील हृदयरोगतज्ज्ञ मनोज निचत यांनी त्यांचे जन्मगाव असलेले अंजनगाव बारी येथे गरजुसांठी दोन शौचालयांचे बांधकाम करून दिले. आपल्या मूळ गावाचे आपण काही तरी देणे लागतो, ही भावना ठेवून ऋणातून उतराई होण्याकरिता त्यांनी समाजभान ठेवत हे कार्य केले. शिवाय हागणदारीमुक्तीच्या मोहिमेत सहभागी होऊन सामाजिक जबाबदारीही पार पाडली. सोमवारी जिल्हाधिकारी किरण गित्ते यांच्या हस्ते ही दोन्ही शौचालये हस्तांतरित करण्यात आलीत. येथील दिव्यांग नागरिक रतन सुरजुसे व विधवा वच्छला खडसे यांना हे शौचालय हस्तांतरित करण्यात आले आहे. हृदयरोगतज्ज्ञ मनोज निचत नेहमीच विविध सामाजिक कार्यात सहभाग नोंदवित असतात. शासनाने शंभर टक्के गावे हागणदारीमुक्त करण्याचा संकल्प केला आहे. याअनुषंगानेच निचत कुटुंबाने येथील दोन गरजुंना स्वखर्चाने शौचालये उभारून दिली आणि समाजापुढे एक आदर्श ठेवला. यावेळी जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी उपस्थिताना मार्गदर्शन केले. गावातील शेतीच्या सिंचनाची याकरिता शेततळे व विहिरींच्या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहनही यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी केले. यावेळी व्यासपीठावर तहसीलदार बगळे, हद्यरोगतज्ज्ञ मनोज निचत, अंजनगावबारी येथील सरपंच मंदा कळंबे, उपसरपंच लक्ष्मण कदम पंचायत समिती सदस्य मीनल डकरे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मनोज निचत यांनी केले. संचालन नीलेश दातीर यांनी, तर आभार वसंत सोनार यांनी मानले. गावातील चार गरीब व गरजू कुटुबीयांना शौचालय बाधूंन देण्याचा यानंतरही आपाला संकल्प असल्याचे मत मनोज निचत यांनी व्यक्त केले. ( प्रतिनिधी)