शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

शहरात दोन हजार घरकुले पूर्णत्वाला, 800 प्रगतिपथावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 05:00 IST

प्रधानमंत्री आवास योजनेतंर्गत ‘सर्वांसाठी घरे’ हा प्रकल्प मार्च २०२२ पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने या विभागाची लगबग सुरू आहे. या प्रकल्पात एकूण चार घटक आहेत. यापैकी आर्थिक दुर्बल घटकांसाठी असलेल्या घटक क्रमांक ४ मध्ये आतापर्यंत २८०० लाभार्थींना कार्यारंभ आदेश देण्यात आले आहेत. सद्यस्थितीत यापैकी दोन हजारांवर घरकुलांची कामे पूर्णत्वाला गेली आहेत.

ठळक मुद्देसर्वांसाठी घरे योजना, महापालिकेचा प्रकल्प राज्यात ठरला अव्वल

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत महापालिका क्षेत्रात आता सर्वांसाठी घरे प्रकल्पांतर्गत २८०० घरकुलांपैकी दोन हजार घरकुलांचे काम पूर्ण झाली असल्याने आर्थिक दुर्बल घटकांसाठी असलेला हा प्रकल्प राज्यात अव्वल ठरला आहे. प्रधानमंत्री आवास योजनेतंर्गत ‘सर्वांसाठी घरे’ हा प्रकल्प मार्च २०२२ पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने या विभागाची लगबग सुरू आहे. या प्रकल्पात एकूण चार घटक आहेत. यापैकी आर्थिक दुर्बल घटकांसाठी असलेल्या घटक क्रमांक ४ मध्ये आतापर्यंत २८०० लाभार्थींना कार्यारंभ आदेश देण्यात आले आहेत. सद्यस्थितीत यापैकी दोन हजारांवर घरकुलांची कामे पूर्णत्वाला गेली आहेत. महापौर चेतन गावंडे व आयुक्त प्रशांत रोडे यांच्या पाठपुराव्यामुळे या योजनेत अमरावती महापालिका राज्यात अव्वल ठरली असल्याची माहिती उपअभियंता सुनील चौधरी यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.लाभार्थींना या घटकामध्ये ३० चौ.मी. चटई क्षेत्राचे बांधकाम करावयाचे आहे. बांधकामाचा अंदाजे खर्च सहा लाखांचा आहे व यामध्ये लाभार्थींना ३.५० लाखांचा खर्च करावा लागत आहे. यामध्ये प्लिंथ पूर्ण झाल्यावर एक लाख, स्लॅब लेव्हलवर एक लाख, वीज जोडणी, शौचालय, छपाई व फरशी पूर्ण झाल्यावर ५० हजारांचे अनुदान लाभार्थींच्या बँक खात्यात जमा करण्यात येत असल्याची माहिती चौधरी यांनी दिली. घटक-१ मध्ये महापालिका हद्दीतील ६९ झोपडपट्ट्यांचे सर्वेक्षण करण्यात आले. यामध्ये शासनाच्या विविध विभागांची  एनओसी प्राप्त झाल्यानंतर आतापर्यंत १० झोपडपट्ट्यांचे प्रस्ताव समितीकडे पाठविण्यात आले व जिल्हाधिकाऱ्यांनी मान्यता प्रदान केली. त्यामुळे ४०० अतिक्रमितांना घरकुलाचा लाभ देण्यात येत असल्याची माहिती उपअभियंता चौधरी यांनी दिली.

घरकुलासाठी २.६७ लाखविविध राष्ट्रीयीकृत बँकांमार्फत या योजनेतील घटक क्रमांक २ मधील कार्य होत आहे. लाभार्थींना २.६७ लाखांपर्यंत व्याजदरात सवलत दिली जाते. या घटकामध्ये महापालिका क्षेत्रात साधारणपणे दोन हजार लाभार्थींना या घटकांतर्गत घरांचा लाभ दिला गेला असल्याची माहिती या विभागाने दिली.

८६० सदनिकांची कामेखासगी भागीदारीत ८६० सदनिकांची कामे प्रस्तावित आहे. केंद्र शासनाने ६१.४९ कोटींच्या प्रकल्प किमतीला मान्यता दिली. मार्च २०२२ पर्यंत निकषपात्र सदनिकांची कामे पूर्ण करण्यात येणार आहे. बडनेरा, निंभोरा, बेनोडा, नवसारी, तारखेडा, गंभीरपूर, रहाटगाव येथे सदनिकेचे बांधकाम प्रस्तावित आहे. म्हसला येथे ६० सदनिका १३ एप्रिलला लाभार्थींना हस्तांतरित झाल्या.

१० झोपडपट्टीमध्ये १६०० पट्टेवाटप प्रक्रियेतघटक-१ मध्ये हनुमाननगर, चमननगर, गंभीरपूर (लालखडी),  सद्गुरूनगर बडनेरा, चपराशीपुरा, वैकंय्यापुरा, लुंबिनीनगर, बिच्छुटेकडी-१, बिच्छुटेकडी-२ व आदर्श नेहरूनगर या भागात १६०० च्या वर पट्टावाटपधारक आहे. महापालिका प्रशासनस्तरावर पाठपुरावा करण्यात येत आहे.

 

टॅग्स :Pradhan Mantri Awas Yojanaप्रधानमंत्री आवास योजना