शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा अनर्थ टळला! AK 47 ते ३०० किलो RDX जप्त; डॉक्टरच्या मुखवट्यात लपला होता क्रूर दहशतवादी
2
पार्थ पवार ते ७० हजार कोटी; दोन मोठ्या आरोपांवर अजितदादांचे उत्तर; म्हणाले, "सकाळी कामाला लागतो ते..."
3
"कुराणची शपथ घेऊन सांगतो, भाजप...!" मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांचा मोठा दावा, राजकारण तापलं
4
“टॅरिफला विरोध करणारे मूर्ख, आम्ही अमेरिकेला श्रीमंत केले, इथे महागाई नाही”: डोनाल्ड ट्रम्प
5
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
6
जडेजा-सॅमसनच्या 'डील'मध्ये डेवाल्ड ब्रेव्हिसचा अडथळा, आयपीएलमध्ये चेन्नई, राजस्थान यांच्यात खेळाडूंची अदलाबदली होण्याची शक्यता
7
Kalbhairav Jayanti 2025: बुधवार १२ नोव्हेंबर कालभैरव जयंती; शिवाचे हे उग्ररूप कशासाठी?
8
बिहारमध्ये योगी आदित्यनाथ यांचा झंझावात, १० दिवसांत ३१ रॅली; काँग्रेस आणि RJD वर घणाघात
9
'नीट'च्या दोन मार्कलिस्ट अन् विद्यार्थिनीला धक्का, पालकही चिंताग्रस्त; कुटुंब निराशेच्या गर्तेत
10
विद्यापीठात पॉलिमर केमिस्ट्री प्रयोगशाळा; संशोधकांना मिळेल प्रेरणा, विकासात योगदान
11
आजचा अग्रलेख: भारतीयांची क्षमता जोखा, साखर नको!
12
परराज्यातील मुलांना एमबीबीएसला प्रवेश घेण्याची मुभा द्या, पालघरच्या कॉलेजने घेतली उच्च न्यायालयात धाव
13
कपड्यांवरुन होणाऱ्या ट्रोलिंगवर पहिल्यांदाच बोलल्या अमृता फडणवीस, म्हणाल्या- "मला वाईट वाटतं, पण..."
14
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
15
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
16
एक दिवस CM बनवलं तर काय कराल? अमृता फडणवीस म्हणाल्या- "मी देवेंद्रजींना..."
17
१२ वर्षांनी शतांक गजकेसरी योग: ८ राशींना लॉटरी, इच्छापूर्ती; नवीन नोकरी, अकल्पनीय पैसा-लाभ!
18
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
19
मराठी अभिनेता दुसऱ्यांदा होणार बाबा, पार पडलं पत्नीचं बेबी शॉवर; अरुण गवळीच्या मुलीसोबत थाटलाय संसार
20
मुस्लिम आणि ख्रिश्चन RSS चे सदस्य होऊ शकतात का? मोहन भागवत म्हणाले, "शाखेत येऊ शकतात, पण..."

अचलपूरमध्ये दोन हजार ऑटोरिक्षा ‘लॉकडाऊन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2020 05:01 IST

लॉकडाऊनमध्ये असलेल्या दोन हजारांहून अधिक ऑटोरिक्षांमध्ये एकट्या अचलपूर शहरातील १ हजार ३०० ऑटोरिक्षा आहेत. परतवाडा शहरात ७०० ते ८०० ऑटोरिक्षा आहेत. यातील हे ऑटोरिक्षा अचलपूरमधील देवडी, चावल मंडी, गांधी पुलावरून, तर परतवाड्यातील ऑटोरिक्षा बस स्टँड, गुजरी, दुरानी चौक, चिखलदरा बस स्टॉप, टिळक चौक, लाकूडबाजार, जयस्तंभ, कॉटन मार्केट, विदर्भ मिल, अचलपूर नाका परिसरातून ये-जा करीत असतात.

ठळक मुद्देरोजीरोटी बुडाली : आर्थिक चणचण, चालक त्रस्त; प्रवासी मिळवून देणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू

लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : अचलपूरमध्ये दोन हजारांहून अधिक ऑटोरिक्षांची चाके लॉकडाऊनमध्ये थांबली आहेत. यात ऑटोरिक्षाचालकांची रोजीरोटी बुडाली असून, त्यांचे कुटुंब आर्थिक चणचणीत भरडले जात आहे. उपासमारीची शक्यता निर्माण झाली आहे.अचलपूर-परतवाडा या जुळ्या नगरीसह लगतच्या मल्हारा, गौरखेडा, धोतरखेडा, एकलासपूर, धामणगाव गढी, देवगाव, हरम, भिलोना, नारायणपूर, जवर्डी, तोंडगाव, बेलखेडा, म्हसोना परिसरातील कुटुंबांना दोन हजारांवर ऑटोरिक्षा लाइफ लाइन ठरले आहेत. पण, लॉकडाऊनमुळे बाजारपेठा बंद आहेत. उद्योगधंदे, छोटे-मोठे व्यवसाय बंद आहेत. जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळता अन्य दुकाने बंद आहेत. एसटी महामंडळाच्या सार्वजनिक वाहतुकीसह अन्य खासगी वाहतूक बंद आहे. शाळा, महाविद्यालयेही बंद आहेत. कोरोनाच्या अनुषंगाने घरीच थांबण्याची सक्ती प्रवासी व पर्यायाने ऑटोरिक्षाचालकांवर आली आहे. ऑटोरिक्षा रस्त्यावर आलाच, तर प्रवासी उपलब्ध नाहीत. त्यामुळे कमिशनवर प्रवासी बसवणाऱ्यांचा रोजगार बुडाला आहे. आर्थिक संकटांचा सामना त्यांना करावा लागत आहे. दोन वेळच्या जेवणाची चिंता त्यांना लागली आहे.लॉकडाऊनमध्ये असलेल्या दोन हजारांहून अधिक ऑटोरिक्षांमध्ये एकट्या अचलपूर शहरातील १ हजार ३०० ऑटोरिक्षा आहेत. परतवाडा शहरात ७०० ते ८०० ऑटोरिक्षा आहेत. यातील हे ऑटोरिक्षा अचलपूरमधील देवडी, चावल मंडी, गांधी पुलावरून, तर परतवाड्यातील ऑटोरिक्षा बस स्टँड, गुजरी, दुरानी चौक, चिखलदरा बस स्टॉप, टिळक चौक, लाकूडबाजार, जयस्तंभ, कॉटन मार्केट, विदर्भ मिल, अचलपूर नाका परिसरातून ये-जा करीत असतात. पण, लॉकडाऊन मोठ्या मुश्किलीने एखादा ऑटोरिक्षा दिवसातून चौकात, रस्त्याने दिसतो, तोही प्रवाशांविना.लॉकडाऊन हटल्यानंतरही जोपर्यंत सर्वच यंत्रणा सुरळीत होत नाही, लोकांची ये-जा वाढत नाही तोपर्यंत या ऑटोरिक्षाचालकांच्या रोजीरोटीचे खरे नाही. त्यांच्या रोजीरोटीबाबत अनिश्चितता आहे. अशात या अ‍ॅटोचालकांच्या दोन हजार कुटुंबांतील दहा हजार लोकांच्या जीवन-मरणाचा प्रश्न उभा ठाकला आहे. शासन-प्रशासनाकडून या लोकांनाही मदतीची अपेक्षा आहे.पुसल्यातील चालकांवर उपासमारीची वेळपुसला : देशात लॉकडाऊन लागल्यापासून हाताला काम नसल्यामुळे पुसला येथील ऑटोरिक्षाचालकांवर उपासमाराची वेळ ओढवली आहे. त्यामुळे ऑटोरिक्षाचालक-मालकांना शासनाने आर्थिक मदत देण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन आ. देवेंद्र भुयार व प्रशासनाकडे देण्यात आले. यावेळी प्रकाश गजभिये, शफीक बबलू शेख, सुनिल पाटील, महम्मद शकील आदी उपस्थित होते.मृत्यू दुर्दैवीऑटोरिक्षामध्ये कमिशनवर प्रवासी बसवणाºया राजेश माहोरे यांची रोजगाराअभावी आर्थिक विवंचनेने प्रकृती खालावली अन् त्यातच त्यांचा मृत्यू झाला. चिखलदरा स्टॉपवर ते १० रुपये प्रतिवाहन दराने प्रवासी उपलब्ध करायचे. दिवसाकाठी ३०० ते ४०० रुपये त्यांना मिळायचे. पण, लॉकडाऊनमध्ये वाहनांची चाके थांबली.अचलपूरमध्ये दोन हजारांहून अधिक ऑटोरिक्षा आहेत. यात अचलपूर शहरातून १ हजार ३००, तर परतवाड्यातून ७०० ते ८०० ऑटोरिक्षा जवळच्या खेडेगावापर्यंत प्रवाशांची ने-आण करतात. लॉकडाऊनमुळे ही लाइफ लाइन ठप्प पडली आहे. चालकांसह प्रवासी मिळवून देणाºयांचाही रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे. रोजगार बुडाल्यामुळे आर्थिक संकटाचा सामना सर्वांना करावा लागत आहे.- अब्दुल मलीक, अध्यक्ष, विदर्भ प्रदेश, राष्ट्रीय ऑटोरिक्षा युनियन.

टॅग्स :auto rickshawऑटो रिक्षाcorona virusकोरोना वायरस बातम्या