शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

चाकू विक्री करणाऱ्या विद्यार्थ्यासह दोघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2019 23:30 IST

अभियांत्रिकीचा एक विद्यार्थी पैशांची गरज भागविण्यासाठी साथीदारासह चक्क चाकू विकत असल्याचे आढळून आले. फ्रेजरपुरा पोलिसांनी विद्यार्थी यश सुरेश चव्हाण (१९, रा. जय श्रीरामनगर, कांडली रोड, परतवाडा) व स्पर्धा परीक्षेची तयारी करणारा प्रवीण सुंदरलाल चव्हाण (२८, रा. दाढीपेढी, ता. भातकुली) या दोघांना बुधवारी दुपारी मालटेकडीमागील परिसरातून अटक केली.

ठळक मुद्देपाच मोठे चाकू जप्त : फ्रेजरपुरा पोलिसांची कामगिरी

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : अभियांत्रिकीचा एक विद्यार्थी पैशांची गरज भागविण्यासाठी साथीदारासह चक्क चाकू विकत असल्याचे आढळून आले. फ्रेजरपुरा पोलिसांनी विद्यार्थी यश सुरेश चव्हाण (१९, रा. जय श्रीरामनगर, कांडली रोड, परतवाडा) व स्पर्धा परीक्षेची तयारी करणारा प्रवीण सुंदरलाल चव्हाण (२८, रा. दाढीपेढी, ता. भातकुली) या दोघांना बुधवारी दुपारी मालटेकडीमागील परिसरातून अटक केली.शहरात काही दिवसांपूर्वीच एका तरुणीची चाकूने निर्घृण हत्या करण्यात आली. प्राणघातक हल्ल्याच्याही काही घटना पुढे आल्या. त्या अनुषंगाने पोलिसांनी धारदार शस्त्र बाळगणाºया तरुणांची धरपकड सुरू केली आहे. यासंदर्भात पोलीस आयुक्त संजयकुमार बाविस्कर यांनी सर्व ठाणेदारांना सूचना देऊन आपल्या हद्दीत शस्त्र बाळगणाऱ्यांविरुद्ध कारवाईचे निर्देश दिले. दरम्यान फ्रेजरपुरा पोलिसांना बुधवारी कारवाई केली. पोलीस उपायुक्त यशवंत सोळंके व पोलीस निरीक्षक पंजाब वंजारी यांच्या मार्गदर्शनात पीएसआय अयूब हिराजी शेख, एएसआय प्रकाश राठोड, पोलीस शिपाई शेखर गायकवाड, चालक दिनेश जवंजाळ यांनी मालटेकडीमागील परिसरात सापळा रचला. वसंत हॉलच्या बाजूच्या दोन तरुण संशयास्पद स्थितीत आढळले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन अंगझडती घेतली. यशजवळ तीन चाकू, तर प्रवीणजवळ दोन मोठे चाकू आढळले. पोलिसांनी त्यांच्याजवळील पाच चाकूसह एमएच ३७ आर ०८५४ क्रमांकाची दुचाकी असा एकूण २२ हजारांचा मुद्देमाल जप्त केली. पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक करून, त्याच्याविरुद्ध कलम ४, २५ शस्त्र अधिनियम, १३५ महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये गुन्हा नोंदविला.यश हा वाशिम येथे अभियांत्रिकीच्या पहिल्या वर्षाला आहे. तो तेथे एका वसतिगृहात राहतो.