शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांच्या दोन मारेक-यांना 24 तासांत अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2018 19:01 IST

प्राणघातक हल्ला करून पोलिसाची हत्या केल्याप्रकरणी चांदूर रेल्वे पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून, आरोपींना गुन्ह्यात मदत करणा-या पाच जणांना पोलिसांनी चौकशीकरिता ताब्यात घेतले आहे.

चांदूर रेल्वे (अमरावती) : प्राणघातक हल्ला करून पोलिसाची हत्या केल्याप्रकरणी चांदूर रेल्वे पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून, आरोपींना गुन्ह्यात मदत करणा-या पाच जणांना पोलिसांनी चौकशीकरिता ताब्यात घेतले आहे. शनिवारी सकाळी चांदूररेल्वे ठाण्याचे पोलीस अवैध दारूअड्ड्यावर धाड टाकण्यास गेले असता, आरोपींनी सतीश मडावींची हत्या करून शामराव जाधव यांना गंभीर जखमी केले.चांदूर रेल्वेच्या मांजरखेड कसबा येथील तांडा वस्तीमागील जंगलात गावठी दारूअड्ड्यावर धाड टाकण्यास दोन पोलीस कर्मचारी गेले होते. दरम्यान आरोपींनी प्राणघातक हल्ला चढविला. या घटनेने राज्याभरातील पोलीस विभागात खळबळ उडाली. पोलीस अधीक्षक अभिनाश कुमार यांनी तत्काळ चांदूर रेल्वे ठाणे गाठून घटनेचा आढावा घेतला. त्यांच्या निर्देशानुसार पोलिसांनी आरोपींना चोवीस तासांत अटक केली.पोलिसांनी आरोपी अजय ऊर्फ राजा सकरू राठोड (२०, रा. मांजरखेड, तांडा) याला वर्धा जिल्ह्यातील कारंजा (घाडगे) येथून, तर आरोपी उमेश शालीकराम राठोड (४०, मांजरखेड, तांडा) याला मालखेड -अमरावती रस्त्याने पळून जाताना शिताफीने अटक केली. आरोपी उमेशची प्रकृती बिघडल्याने त्याला अमरावती येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती केले असून, आरोपींना गुन्ह्यात मदत करणा-या दिनेश शालिकराम राठोड (४०), बाल्या कच्छीराम जाधव (३५), विष्णू रतनसिंग चव्हाण (३०), राजू वासुदेव राठोड (३०), सकरू लक्ष्मण राठोड (४०, सर्व रा. मांजरखेड (तांडा) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी आरोपीजवळून गुन्ह्यात वापरलेली कु-हाड जप्त केली आहे. पुढील चौकशी पोलीस निरीक्षक ब्रह्मानंद शेळके करीत आहे. घटनेच्या अनुषंगाने चांदूररेल्वे शहरात दोन दंगा नियंत्रण पथक, दोन गाड्या व पन्नासवर कमांडो तैनात आहेत.

चांदूरच्या इतिहासात पहिलीच घटना पोलिसांवर जीवघेणा हल्ला करणा-याची चांदूरच्या इतिहासातील ही पहिलीच घटना होय. चांदूर रेल्वे पोलीस ठाण्यात हजारो पोलीस दाखल झाल्याने शहराला पोलीस छावणीचे स्वरूप आले होते. याची दखल घेत पोलीस महानिरीक्षक सी.एच. वाकडे, पोलीस अधीक्षक अभिनाश कुमार, अप्पर पोलीस अधीक्षक एम.एस. मकानदार व उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी भेट दिली. 

दोन्ही पोलिसांच्या मोबाईलचा सीडीआर तपासणारचांदूर रेल्वेचे दोन्ही पोलीस गावठी अड्ड्यावर धाड टाकण्यासाठी जात असताना त्यांनी कोणाशी संपर्क केला? हल्ला झाल्यानंतर कोणाशी संपर्क केला, याबाबतची माहिती घेण्यासाठी दोन्ही पोलिसांच्या मोबाईलचा सीडीआर तपासला जाणार आहे. पोलिसांवर हल्ला प्रकरणात दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. जखमी पोलीस शामराव जाधवची प्रकृती धोक्याबाहेर आहे. हल्ल्याचे नेमके कारण काय, याची चौकशी करू. दोन्ही पोलिसांच्या मोबाईलचा सीडीआर तपासण्यात येईल. - अभिनाश कुमार, जिल्हा पोलीस अधीक्षक, अमरावती