रत्नागिरी : महाविद्यालयीन कबड्डी स्पर्धेसाठी रत्नागिरीत आलेल्या अमरावती येथील दोन तरुणी सिटी बसच्या धडकेने जखमी झाल्या. ही घटना सोमवारी रात्री सव्वा नउच्या सुमारास जेल नाका येथे घडली. पूजा आगरकर आणि प्रिया काळे अशी त्यांची नावे आहेत. यापैकी पूजाला गंभीर दुखापत झाली आहे.रत्नागिरीमध्ये सध्या आंतरमहाविद्यालयीन कबड्डी स्पर्धा सुरु आहे. या स्पर्धेत अमरावतीचा मुलींचा संघ सहभागी झाला आहे. संघातील सर्व खेळाडू रात्री मुख्य रस्त्यावरुन जात असताना जेल नाका येथे एका सिटी बसची (एमएच २0 बीएल ७५१) दोघींना धडक बसली. त्यात प्रिया काळेला किरकोळ दुखापत झाली तर पूजा आगरकरची दुखापत गंभीर आहे. त्यांच्या सोबत असणाऱ्या मैत्रिणींनी त्या दोघींना जवळच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले.
सिटीबसच्या धडकेत दोन खेळाडू जखमी
By admin | Updated: December 8, 2015 00:40 IST