नांदगाव खंडेश्वर : अमरावती-यवतमाळ मार्गावर नांदगाव खंडेश्वर येथील पेट्रोल पंपाजवळ माहूरहून अमरावतीकडे जाणाऱ्या एमएच २० डी ९७२३ या बसची दोन मोटरसायकलला धडक बसल्याने एक ठार व एक जण जखमी झाल्याची घटना सोमवारी सकाळी ११.१५ वाजतादरम्यान घडली.या घटनेत दुचाकीस्वार संजय नामदेवराव कांबळे (३५, रा. टाकळी कानडा) हा इसम जागीच ठार, तर दुसरा जखमी झाला. त्याला अमरावती येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले आहे. एमएच २७ एन ५२५६ या बॉक्सर मोटरसायकलने मृत संजय कांबळे हा येथील पेट्रोल पंपावरून पेट्रोल भरून यवतमाळकडे जात होता. त्याला समोरून येणाऱ्या एसटीची जबर धडक बसली. तसेच अमरावतीकडून एम.एच. २९ ए.एच. ८२७३ या पॅशन प्रो दुचाकीने येणारा हेमंत मनोहर श्रृंगारे हादेखील एसटीच्या धडकेने जखमी झाला. दोन्ही मोटरसायकली या एसटीखाली चेंगरल्या गेल्याने संजय हा जागीच ठार झाला, तर हेमंत जखमी झाला. पोलिसांनी याप्रकरणी भादंविच्या कलम २७९, ३३७, ३०४ (अ) अन्वये एसटीचालक शे. खुसतर शे. अब्दुल (रा. माहुर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. (तालुका प्रतिनिधी)
एसटीची दोन मोटरसायकलला धडक, एक ठार, एक जखमी
By admin | Updated: November 10, 2015 00:34 IST