शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

गुंडाच्या हत्याप्रकरणी आणखी दोघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 04:10 IST

अमरावती : अशोक सरदार हत्याकांडात राजापेठ पोलिसांनी आणखी दोघांना अटक केली. या प्रकरणात अटक केलेल्या चारही आरोपींना न्यायालयाने ८ ...

अमरावती : अशोक सरदार हत्याकांडात राजापेठ पोलिसांनी आणखी दोघांना अटक केली. या प्रकरणात अटक केलेल्या चारही आरोपींना न्यायालयाने ८ जूनपर्यंतची पोलीस कोठडी सुनावली आहे.

पोलीस सूत्रांनुसार, अनिल चंपतराव डोळे (३६) आणि प्रतीक प्रकाश कांबळे (२५, दोन्ही रा. जेवडनगर) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. या प्रकरणात शुक्रवारी अतुल सुभाष तुपाळे (३२) व राजेश अशोक थोरात (३५, दोन्ही रा. जेवडनगर) यांना अटक करण्यात आली होती. त्यांनी तडीपार गुंड अशोक सरदार (रा. जेवडनगर) याच्या डोक्यात मोठा दगड घालून शुक्रवारी निर्घृण हत्या केली. गुन्हेगारी वर्चस्वाच्या लढाईत ही हत्या करण्यात आल्याचे पोलीस चौकशीत पुढे आले.

शुक्रवारी रात्री मृत अशोकच्या पत्नीने राजापेठ ठाण्यात या घटनेची तक्रार नोंदविली. या खूनप्रकरणात आणखी दोघे सहभागी असल्याचे पोलिसांना दिलेल्या तक्रारीत नमूद केले होते. त्यावरून पोलिसांनी अनिल व प्रतीक यांना रात्री अटक केली. पुढील तपास राजापेठ ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनीष ठाकरे करीत आहेत.

बॉक्स:

अशोक सरदार तीन वेळा तडीपार

हत्या झालेला गुंड अशोक सरदार याच्याविरुद्ध विविध ठाण्यांच्या हद्दीत २० पेक्षा जास्त गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याचे राजापेठ पोलिसांनी सांगितले. मुख्य आरोपी अतुल तुपाळे, राजेश थोरात व मृतक अशोक सरदार यांनी पाच वर्षांपूर्वी एका जणावर चाकुहल्ला चढविला होता. या गुन्ह्यात भादंविचे कलम ३२४ अन्वये तिन्ही आरोपी सोबत होते, असे पोलीस तपासात पुढे आले आहे.