लोकमत न्यूज नेटवर्कधारणी : शहरातील प्रभाग क्रमांक एक मध्ये २० वर्षांपासून वसलेल्या नागरिकांना मुख्य मार्गावरून ये-जा करण्यास मुख्य जोडरस्ता नाही. त्यामुळे तेथील महिलांनी प्रशासनासोबत संघर्ष सुरू केला आहे. प्रशासनाने मागणी पूर्ण न केल्यामुळे त्यांनी आमदार राजकुमार पटेल यांना जोडरस्त्याकरिता साकडे घातले आहे.शहरातील प्रभाग क्रमांक एक हा उपविभागीय अधिकारी, तहसील, पंचायत समिती, भूमीअभिलेख कार्यालयाच्या मार्ग आहे. तेथून मुख्य मार्गावर ये-जा करण्याकरिता तब्बल २ किलोमीटरचा वळसा घालावालागतोे. त्यासाठी पर्यायी व्यवस्था म्हणून तेथील महिलांनी भूमिअभिलेख कार्यालयालमागील मोकळ्या जागेतून ये-जा करण्यासाठी रस्त्याची मागणी केली आहे. त्यासाठी मुख्याधिकारी, तहसीलदार, एसडीपीओंकडे दोन महिन्यांपासून निवेदन देऊन संघर्ष सुरू केला. तरीसुद्धा नगरपंचायत प्रशासन, उपविभागीय अधिकाऱ्यांनी महिलांना न्याय मिळवून न दिल्यामुळे आमदार राजकुमार पटेल यांच्याकडे साकडे घालून जोडरस्त्याची मागणी केली आहे. त्यासाठी महिलांनी शुक्रवारी पटेल यांना निवेदन दिले. त्यांनी सर्व अधिकाऱ्यांना मोका पाहणीकरिता नेऊन जोडरस्त्याचा मार्ग सुकर करण्याचे सुचविल्याने प्रशासनाच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे.प्रभाग १ च्या महिलांच्या विनंतीनुसार मोक्का पाहणी केली. रस्ता उभारणीसाठी निधी दिला आहे. धारणीतील नागरिकांना मुलभूत सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी आपण प्रयत्नशील आहोत.- राजकुमार पटेल, आमदारजुना रस्ता म्हणजे तारेवरची कसरतसद्यस्थितीत तेथील रहिवासी विद्यार्थी अंगणवाडीचे चिमुकले, गर्भवती माता व म्हाताºयांना दगडातून टेकडी चढावी लागते. चिमुकले तर पाय घसरून नेहमीच पडतात. त्यामुळे त्यामुळे महिलांनी जोडरस्त्याकरिता संघर्ष सुरू केला आहे.
मीटरभर अंतरासाठी दोन किमीचा वळसा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2020 05:00 IST
शहरातील प्रभाग क्रमांक एक हा उपविभागीय अधिकारी, तहसील, पंचायत समिती, भूमीअभिलेख कार्यालयाच्या मार्ग आहे. तेथून मुख्य मार्गावर ये-जा करण्याकरिता तब्बल २ किलोमीटरचा वळसा घालावालागतोे. त्यासाठी पर्यायी व्यवस्था म्हणून तेथील महिलांनी भूमिअभिलेख कार्यालयालमागील मोकळ्या जागेतून ये-जा करण्यासाठी रस्त्याची मागणी केली आहे.
मीटरभर अंतरासाठी दोन किमीचा वळसा
ठळक मुद्देमहिला आक्रमक : प्रभाग १ च्या रहिवाशांना रस्ताच नाही