शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
2
राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'ला निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर; 15 मुद्दे मांडत सर्व आरोप फेटाळले
3
देशविरोधी शक्तींसोबत मिळून भारतात षडयंत्र रचलं जातंय; भाजपाचा राहुल गांधींवर गंभीर आरोप
4
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
5
पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटर, जिचं नाव कायम चर्चेत; किती संपत्तीची आहे मालकीण?
6
१०० हून अधिक देशांमध्ये २०,००० स्टोअर्स, जागतिक विक्रीत २ टक्के वाढ; तरी का काढलंय विकायला?
7
अमेरिकेतील महापौर भारतातील महापौरापेक्षा किती पावरफुल असतो? जगभर इतकी चर्चा का होते?
8
"मी तेजश्रीच्या लग्नासाठी उत्सुक...", सुबोध भावे असं म्हणताच अभिनेत्री काय म्हणाली?
9
“उद्धव ठाकरेंचा निवडणुकीसाठी दौरा, CM असताना शेतकऱ्यांना काय दिले?”; शिंदे गटाचा पलटवार
10
Bigg Boss 19: 'बिग बॉस हिंदी'कडून मराठमोळ्या प्रणित मोरेवर अन्याय? शोसाठी मिळालं सगळ्यांपेक्षा कमी मानधन
11
Moto G67 Power: ७०००mAh बॅटरी आणि चार कॅमेरे; मोटो जी६७ पॉवर भारतात लॉन्च!
12
भारत, चीन, तुर्कस्तान... तीन देशांनी घेतला असा निर्णय की रशियाला होतंय नुकसान, ट्रम्प यांच्यामुळे नाईलाज
13
"अभी नहीं तो कभी नहीं!" अभिषेक शर्माला किंग कोहलीच्या ऑल टाइम रेकॉर्डची बरोबरी करण्याची शेवटची संधी
14
परदेशी सहल बजेटमध्ये! 'या' ५ देशांमध्ये भारतीय रुपया आहे मजबूत; कमी खर्चात करा परदेशवारी
15
महिला 'वर्ल्ड कप' पराभवानंतर कर्णधाराकडून खेळाडूंना मारहाण; वरिष्ठ खेळाडूच्या आरोपाने क्रिकेटविश्व हादरले
16
बिहारमध्ये एनडीएला मोठा धक्का! मतदानाच्या तोंडावर भाजप आमदाराने राजदमध्ये प्रवेश केला; नाराज का झाला...
17
देव दिवाळीच्या मुहुर्तावर सोनं पुन्हा स्वस्त...! पटापट चेक करा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
18
चिंताजनक! शेजारच्या देशात जीवघेण्या आजाराचं थैमान; २९२ जणांचा मृत्यू, भारतासाठी धोक्याची घंटा
19
ढाका पोहोचण्याआधीच जाकिर नाईकला मोठा 'झटका'! भारताच्या दबावापुढे बांगलादेश झुकला?
20
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'

औरंगाबाद-नागपूर महामार्गावर दोन ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2022 05:00 IST

पोलीस सूत्रांनुसार, तळेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या या अपघातामध्ये कारचा चालक गौरव लक्ष्मण ठवकर (२७, रा. कासमपूर) व त्यामधून प्रवास करीत असलेल्या मीरा भीमराव बेदरकर (रा. पिंपळखुटा) यांचा समावेश आहे. एमएच ३१ सीएम ३४७७ क्रमांकाची कार यवतमाळ जिल्ह्यातील घारफळ देवगावकडे निघाली होती. यात चालक व महिलांसह अन्य प्रवासी होते. बोरवघडनजीक एमएच ०२ एफजी २७५८ क्रमांकाच्या पिकअप वाहनाने जोरदार धडक दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कतळेगाव दशासर : औरंगाबाद-नागपूर सुपर एक्स्प्रेस हाय-वेवर बोरवघडनजीक शनिवारी सकाळी नऊच्या सुमारास दोन चारचाकी वाहने आपसांत धडकली. या अपघातात दोघे ठार झाले. यात चालक व महिलेचा समावेश आहे.पोलीस सूत्रांनुसार, तळेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या या अपघातामध्ये कारचा चालक गौरव लक्ष्मण ठवकर (२७, रा. कासमपूर) व त्यामधून प्रवास करीत असलेल्या मीरा भीमराव बेदरकर (रा. पिंपळखुटा) यांचा समावेश आहे. एमएच ३१ सीएम ३४७७ क्रमांकाची कार यवतमाळ जिल्ह्यातील घारफळ देवगावकडे निघाली होती. यात चालक व महिलांसह अन्य प्रवासी होते. बोरवघडनजीक एमएच ०२ एफजी २७५८ क्रमांकाच्या पिकअप वाहनाने जोरदार धडक दिली. गौरव व मीरा बेदूरकर हे गंभीर जखमी झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तळेगाव दशासर पोलीस ठाण्याचे निरीक्षक हेमंत चौधरी यांच्या ताफ्यासह देवगावस्थित महामार्ग पोलीस केंद्राचे उपनिरीक्षक तोकलवाड व कर्मचारी पोहोचले. अपघातामुळे विस्कळीत वाहतूक पोलिसांनी सुरळीत केली व दोन्ही मृतदेह विच्छेदनासाठी धामणगाव रेल्वे येथे पाठविण्यात आले, वैभव गायके (२६), तेजस्विनी वैभव गायके (२३) व नेहा बिदूरकर (२१) अशी जखमींची नावे आहेत. जखमींना सावंगी मेघे येथे उपचाराकरिता पाठविले. याप्रकरणी भीमराव बेदूरकर यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी पिकअप वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला. ठाणेदार हेमंत चौधरी यांच्या मार्गदर्शनात जमादार ठाकरे तपास करीत आहेत.

अकोला महामार्गावर अपघात, एकाचा मृत्यूबडनेरा : अकोला महामार्गावरील एका हॉटेलनजीक ४५ वर्षीय इसमाला गुरुवारी उशिरा रात्री दुचाकीने घरी परत जात असताना अज्ञात वाहनाने धडक दिली. गंभीर अवस्थेत जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. प्रवीण कानतोडे (रा. कंपासपुरा, जुनीवस्ती, बडनेरा) असे मृताचे नाव आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, भाऊ आहे.

 

टॅग्स :Accidentअपघात