शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी सत्तेसाठी कधीच हापापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत
2
"दादांना विचारतो त्यांनी कुठल्या ज्योतिष्याकडे पाहिलं"; CM व्हावं वाटतं म्हणणाऱ्या अजित पवारांना गोगावलेंचा टोला
3
बलुचिस्तानात मोठा खेला...! सरकारी इमारतींवर बंडखोरांचा ताबा, लावली आग; भारताला पोकळ धमक्या देणारा पाक उघडा पडला
4
१३२ सेवा, २४ राज्ये, २८४ जिल्ह्यांना जोडणाऱ्या ‘वंदे भारत’मुळे रेल्वेची किती कमाई होते?
5
Pune Accident: कीर्तन ऐकून घरी परतताना भरधाव मर्सिडीजनं उडवलं; दुचाकीस्वार जागीच ठार
6
“प्रत्येकाने सद्भावना मंत्र जोपासावा, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी काँग्रेसचा सत्याग्रह”
7
Sita Navami 2025: संततीप्राप्तीसाठी सीता नवमीचे व्रत कसे व कधी करावे ते जाणून घ्या!
8
भयंकर! ४ वर्षे पालकांनी ३ मुलांना घरात ठेवलेलं कोंडून; कारण ऐकून बसेल मोठा धक्का
9
पुत्र जन्मला! मराठी अभिनेत्रीच्या घरी पाळणा हलला, गोंडस लेकाला दिला जन्म
10
पत्नीची हत्या करुन मृतदेह पुरला, तीन दिवसांनी हात बाहेर येताच...; दृष्य पाहून पोलिसही हादरले
11
लाडकी बहीण योजनेसाठी निधी वळवला; संजय शिरसाट संतापले, म्हणाले, “खाते बंद केले तरी चालेल”
12
"तुम्ही अजित पवारांना भेटल्या, खरं की खोटं... उत्तर द्या?"; सुषमा अंधारे-अंजली दमानिया सोशल मीडियावर भिडल्या
13
“तेव्हा मी केंद्रात होतो, फडणवीस नाही”; जातनिहाय जनगणनेवर पृथ्वीराज चव्हाण स्पष्टच बोलले
14
Tata Motors नं Q4 निकाल आणि डिविडेंडपूर्वी घेतला मोठा निर्णय; ५०० कोटी रुपयांचं आहे प्रकरण
15
"...तर पाकिस्तान हल्ला करेल!"; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची भारताला पोकळ धमकी
16
Tarot Card: 'पेराल ते उगवेल' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
17
गर्लफ्रेंडसोबत चायनीज खाताना आईने लेकाला रंगेहाथ पकडलं; रस्त्यात चपलेने मारलं, धू-धू धुतलं
18
'या' कंपनीनं लाँच केला १८० दिवसांचा प्लान; SonyLIV सारख्या OTT चं मिळणार सबस्क्रिप्शन, काय आहे खास?
19
Leopard in Marathi: परीकडे बघून राधा अन् समृद्धी हसली; तिघींची गट्टी जमली
20
क्रिकेटवेडी, बोल्ड फोटो अन् शुबमनसोबत रिलेशनशीपची चर्चा; अवनीत कौर नेमकी आहे तरी कोण?

मेळघाटात अस्वलाच्या हल्ल्यात दोन ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2020 11:28 IST

११ जून रोजी सकाळी ७ वाजता दोन गावकरी रक्तबंबाळ अवस्थेत जंगलात पडून असल्याची माहिती वनाधिकाऱ्यांना मिळताच त्यांनी घटनास्थळी भेट दिली.

ठळक मुद्देअकोट वन्यजीव विभागातील आलेवाडी परिसरातील घटना

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : मेळघाट व्याघ्र प्रकल्प अंतर्गत येणाऱ्या अकोट वन्यजीव विभागाच्या दक्षिण आलेवाडी बीटमध्ये गुरुवारी सकाळी ७ वाजता दरम्यान अस्वलाच्या हल्ल्यात दोन जण ठार झाले. त्यांचे सवंगडी पळून गेल्याची माहिती आहे. या घटनेने पुन्हा एकदा अकोट व परिसरासह मेळघाटात खळबळ उडाली आहे. अशोक मोतीलाल गवते (५४) व माना बंडू गवते (४२, दोघेही रा. निमखेडी, ता.अकोट) अशी मृतांची नावे आहेत.११ जून रोजी सकाळी ७ वाजता दोन गावकरी रक्तबंबाळ अवस्थेत जंगलात पडून असल्याची माहिती वनाधिकाऱ्यांना मिळताच त्यांनी घटनास्थळी भेट दिली. ते सोनाळा परिक्षेत्रातील वारवट बकाल वर्तुळांतर्गत येणाऱ्या दक्षिण अलेवाडी बीट क्रमांक ३५७ मध्ये आढळून आले. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. काही गावकरी जंगलात विनापरवानगी शिरल्याची माहिती मिळाली. या गावकऱ्यांवर अस्वलाने हल्ला चढविताच इतर सहकारी पळून गेल्याचा प्राथमिक अंदाज व्याघ्र अधिकाºयांंनी वर्तविला आहे. सदर घटनेची माहिती वनरक्षक ए. आर. थोटे यांनी अकोट वन्यजीव विभागाच्या उपवनसंरक्षक टी. बेऊला यांना दिली. राज्याचे वनमंत्री संजय राठोड शुक्रवारपासून दोन दिवस मेळघाट दौऱ्यावर आहेत.जारिदात केले होते चौघांना ठारचिखलदरा तालुका अंतर्गत येणाऱ्या जारिदा येथे आठ वर्षांपूर्वी एका चवताळलेल्या अस्वलाने चौघांना ठार केले होते. त्यामध्ये वनकर्मचारी, शिक्षक, आश्रम शाळेतील विद्यार्थी व एका गावकऱ्याचा समावेश होता.सोनाळा परिक्षेत्रांतर्गत असलेल्या जंगलात अस्वलाने हल्ला करून दोन व्यक्ती ठार केले. यासंदर्भात चौकशी सुरू आहे. घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली.- टी. बेऊलाउपवनसंरक्षक, अकोट वन्यजीव

टॅग्स :wildlifeवन्यजीव