जीवित हानी टळली : विम्याबाबत नागरिक अनभिन्नचांदूरबाजार : स्थानिक भक्तीधाम परिसरातील अंबिका नगरमध्ये गुरुवारी दुपारी सव्वादोनच्या सुमारास गजानन लोखंडे यांच्या घरात सिलिंडरचा अचानक स्फोट झाला. त्यात संगीता लोखंडेसह शेजारच्या अलका विठ्ठलराव मानमोडे यांच्या घराने पेट घेतला. त्यात दोन्ही घरे पूर्णत: जळून खाक झालेत. यात लाखोंचे नुकसान झाले आहे. प्राप्त महिनीनुसार संगीता लोखंडे व अलका मानमोडे यांचे अंबिका नगरमध्ये लागूनच घर आहे. नित्यनेमाप्रमाणे ते मोलमजुरीसाठी बाहेर पडले होते. दरम्यान दुपारी संगीता लोखंडे यांचा घरात ठेवलेल्या सिलिंडरचा स्फोट झाला. त्यात तेथीलयच फ्रीजच्या सुध्दा स्फोट झाला. यामुळे संगिता लोखंड यांच्या घरासह शेजारच्या अलका विठ्ठलराव मानमोडे यांच्या घराने सुध्दा पेट घेतला. स्फोट इतका जबर होता की, त्यामुळे काही क्षणाताच दोन्ही घर बेचीराख झाले. यात दोन्ही घरांचे पाच लाख रुपयांचे नुकसान झाले असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केल्या जात आहे.स्फोटाने आवाज एकूाण परिसरातील नागरिकांनी अंबिका नगराकडे एकच धाव घेतली होती. उपस्थित नागरिकांनी तत्काळ स्थानिक पोलीस स्टेशनला दूरध्वनीवरुन माहिती दिली. माहिती मिळताच पोलीस निरीक्षक सतीशसिंह राजपूत हे ताफ्यास घटनास्थळी दाखल झाले. तसेच अग्निशामक दलाने आग आटोक्यात आणली. यावेळी नगराध्यक्षांचे पती मनीष नांगलिया, आरोग्य सभपती गोपाल तीरमारे, नगरसेवक भैय्यासाहेब लंगोटे, आरोग्य निरीक्षक राजेंद्र जाधव, संतोष डोळे, आदी कर्मचाऱ्यांनी तसेच परिसरातील नागरिकांनी आग विझविण्यास मदत केली. यावेळी अचलपूर येथील अग्निशामक दलाची गाडी घटनास्थळावर पोहोचली होती. जीवित हानी टळली घटनेच्यावेळी संगीता गजानन लोखंडे व अलका विठ्ठलराव मानमोडे हे घरी नसल्याने झालेल्या स्फोटात जीवित हानी टळली. तसेच या आगीत दोन्ही परिवार उघड्यावर आले आहे. त्यांची घरे या आगीत घरातील साहित्य पूर्णत: जळून खाक झाले आहे. तीन महिन्यांत सिलिंडर स्फोटाची दुसरी घटनागॅस सिलिंडर स्फोटाची तालुक्यात गेल्या ३ महिन्यांत ही दुसरी घटना आहे. स्थानिक गॅस एजंसीतर्फे ग्राहकांना सिलिंडर देतावेळी सिलिंडर लीक आहे काय? याची तपासणी केली जात नाही, तसेच याबाबत ग्राहकांना जागरुकता नसल्याने घटना घडत आहेत. नागरिक अनभिज्ञगॅस कनेक्शन घेतेवेळी ग्राहाकंचा विमा उतरविण्यात येत असल्याबाबत सांगण्यात येते. मात्र गॅस सिलिंडरच्या स्फोटामुळे झालेल्या नुकसानाचा विमा मात्र अद्यापपर्यंत कोणत्याच ग्राहकाला मिळाले नसून यापासून ग्राहक मात्र अनभिन्न आहेत.
सिलिंडरच्या स्फोटात दोन घरे खाक
By admin | Updated: December 26, 2015 00:12 IST