शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

दोन दिवसांत २४ जणांविरूद्ध पोलिसांत तक्रार दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2018 05:15 IST

सहा हजार कोटी रुपयांच्या घोटाळाप्रकरणी आदिवासी विकास विभागाच्या नागपूर व अमरावती अपर आयुक्त कार्यालयांतर्गत दोन दिवसांत २४ जणांविरूद्ध पोलिसांत तक्रारी दाखल झाल्यात.

- गणेश वासनिक अमरावती : सहा हजार कोटी रुपयांच्या घोटाळाप्रकरणी आदिवासी विकास विभागाच्या नागपूर व अमरावती अपर आयुक्त कार्यालयांतर्गत दोन दिवसांत २४ जणांविरूद्ध पोलिसांत तक्रारी दाखल झाल्यात. विशेष चौकशी पथकाने दोषींची नावे दिल्यानुसार तक्रार अधिकाऱ्यांनी पोलिसात धाव घेतली आहे.आदिवासी विकास विभागात २००४ ते २००९ या कालावधीत सहा हजार कोटींच्या घोटाळाप्रकरणी माजी न्यायमूर्ती एम.जी. गायकवाड यांच्या अध्यक्षतेतील चौकशी समितीच्या शिफारशीनुसार दोषींवर कारवाईचा बडगा उगारला गेला आहे. मुंबई उच्च न्यायालयात न्यायमूर्ती शंतनू केमकर आणि न्यायमूर्ती नितीन सांब्रे यांच्या खंडपीठात १० जुलै रोजी नाशिक येथील बहिराम मोतीराम आणि गुलाब पवार यांच्यावतीने दाखल जनहित याचिकेवर सुनावणी झाली. १० दिवसांत दोषींवर कारवाई करून वस्तुनिष्ठ अहवाल सादर करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले होते. त्यामुळे या विभागाच्या प्रधान सचिव मनीषा वर्मा यांनी नाशिक, ठाणे, नागपूर व अमरावती येथील अपर आयुक्तांना व्हिडीओ कॉन्फरसिंगने घोटाळ्यातील दोषींवर पोलिसात तक्रार दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानुसार शनिवार व रविवार असे दोन दिवस २४ दोषींविरूद्ध पोलिसात तक्रारी देण्यात आल्या आहेत.>यांच्याविरूद्ध तक्रारचंद्रपूरचे माजी प्रकल्प अधिकारी अशोकुमार शुक्ला, गडचिरोलीचे बी. गिरी, भामरागड येथील मधुकर गायकवाड, देवरीचे हरिराम मडावी, अकोला माजी प्रकल्प अधिकारी अरुणकुमार जाधवसह अन्य ६, किनवट येथील वाढकर व अन्य ४, औरंगाबाद येथे देशमुखसह ८ तर धारणीचे माजी पीओ रमेश मांजरीकर यांची नावे तक्रारीत असल्याचे समजते.