शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
5
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
6
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
7
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
8
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
9
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
10
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
11
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
12
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
13
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
14
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
15
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
16
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
17
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
18
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
19
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
20
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार

वरुडात क्रिकेट सामन्यावर बेटिंग; दोन सट्टेबाजांना अटक

By प्रदीप भाकरे | Updated: November 2, 2022 18:19 IST

ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

अमरावती : वरूड शहरातील नगर परिषद कॉम्प्लेक्समध्ये सुरू असलेल्या क्रिकेट सामन्यावरील ऑनलाइन सट्ट्यावर ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धाड टाकली. या कारवाईत दोन सट्टेबाजांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून रोख व चार मोबाइल असा ८२ हजार ६१० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक तपन कोल्हे यांच्या नेतृत्वातील पथकाने १ नोव्हेंबर रोजी ही कारवाई केली.

पोलिसांनुसार, अमोल पुंडलिकराव यावले (२७, रा. जरूड) व प्रणय मुरलीधर धरमठोक (३७, रा. वरूड) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. आस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी-२० विश्वचषकातील क्रिकेट सामन्यांवर ऑनलाइन पद्धतीने सट्टा खेळविला जात असल्याच्या गोपनीय माहितीवरून पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांनी कारवाईचे आदेश दिले होते. त्या अनुषंगाने वरूडच्या नगर परिषद कॉम्प्लेक्समध्ये दोन जण विश्वचषकातील अफगाणिस्तान विरुद्ध श्रीलंका या संघांमध्ये सुरू असलेल्या सामन्यावर मोबाइलद्वारे ऑनलाइन सट्टा खेळत असल्याची माहिती गस्तीवरील पथकाला मिळाली. त्या माहितीच्या आधारावर पथकाने मंगळवारी त्या सट्टयावर धाड टाकली. कारवाईदरम्यान यावले व धरमठोक यांना ऑनलाइन सट्टा खेळताना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून ८२ हजार ६१० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

वरूडमध्ये जुगाऱ्यांचे हब

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक तपन कोल्हे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक नितीन चुलपार व सूरज सुसतकर, संतोष मुंदाने, दीपक सोनाळेकर, सुनील महात्मे, अमित वानखडे, शकील चव्हाण, उमेश वाकपांजर, सय्यद अजमत, नीलेश डांगोरे, पंकज फाटे, दिनेश कनोजिया व कमलेश पाचपोर आदींनी केली. वरूडमध्ये याआधीदेखील तीनदा क्रिकेट सट्टा पकडला गेला होता. त्यात चार ते सहा जणांना अटक देखील झाली होती. त्यामुळे एलसीबी येथून जाऊन तेथे कारवाई करत असताना स्थानिक वरूड पोलिसांचा क्रिकेट सटोडियांना आशीर्वाद तर नाही ना, अशी शंका उपस्थित केली जात आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीCricket Bettingक्रिकेट सट्टेबाजीAmravatiअमरावती