शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात मध्यरात्री २ तास गावगुंडांचा धुमाकूळ; रिक्षा, कार, स्कूल बससह २० ते २५ वाहनांची तोडफोड
2
उपराष्ट्रपतीपदासाठी राजनाथ सिंह यांचे नाव? राष्ट्रपतींनी स्वीकारला धनखड यांचा राजीनामा
3
आजचे राशीभविष्य २३ जुलै २०२५ : या राशींना आजचा दिवस लाभदायी, या राशींसाठी...
4
मराठी तरुणीला मारहाण करून पळालेल्या परप्रांतीय तरुणाला मनसैनिकांनी पकडले, चोप देऊन पोलिसांच्या हवाली केले 
5
केवळ १८ महिन्यांचा संसार, मागितली १२ कोटींची पोटगी, बीएमडब्ल्यू! कोर्ट महिलेला म्हणाले... 
6
महिलांना लग्नाच्या जाळ्यात ओढून उकळायचा पैसे; मंदिरात लग्न उरकायचा अन्...
7
७/११ बॉम्बस्फोटाच्या निकालाविराेधात सरकार सुप्रीम कोर्टात; गुरुवारी सुनावणी
8
३०० बंधारे आणि छोटी धरणे काढली, चीनची ‘यांगत्सी’ जिवंत झाली, आपण ‘मुळा-मुठेला’ कोंडून मारणार?
9
भोंग्याबाबतचे नियम दुसऱ्यांदा मोडल्यास गुन्हा नोंदवा! राज्याच्या पोलिस महासंचालकांचे आदेश
10
नवे उपराष्ट्रपती निवडताना भाजपला नाही चिंता; ४२२ सदस्यांचे समर्थन; बहुमताने एकच उमेदवार
11
अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार; शिक्षिकेला मिळाला जामीन
12
कृषिमंत्री माणिकराव कोकाटे पुन्हा वादात; म्हणे ‘शासनच भिकारी’
13
संपादकीय : ओसाड गावची तोंडपाटीलकी! असंवेदनशील कृषिमंत्र्यांच्या वादांची मालिका
14
दिल्लीत लँडिंग होताच विमानाला अचानक आग; सर्व प्रवासी व कर्मचारी सुखरूप
15
मतदार यादीवरून विरोधक आक्रमकच; पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी कामकाज ठप्प
16
पंचाहत्तराव्या वर्षी निवृत्ती.. संघाचे ‘ठरले’? पण सरकारसाठी नियम वेगळे!
17
धनखड यांनी राजीनामा नेमका का दिला? संसदेबाहेर चर्चा
18
गडचिरोलीत विकासविरोधी कारवायांना विदेशातून फंडिंग! नक्षलींनी बंदुका सोडून मुख्य प्रवाहात येण्याचे आवाहन
19
Mumbai Local: मुंबईहून कसाऱ्याला जाणाऱ्या लोकलवर दरड कोसळली, २ प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती 
20
कॅप्टनच्या 'सेंच्युरी'नंतर टीम इंडियाकडून क्रांतीचा 'सिक्सर'! टी-२० सह इंग्लंडला वनडेतही 'धोबीपछाड'

विविध अपघातात दोन दुचाकीस्वार ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2018 21:58 IST

वरूड मार्गावर सेेंट्रल बँक आॅफ इंडियापुढे खासगी बसच्या धडकेत दुचाकीवरील युवक ठार झाला, तर त्याचा सहकारी गंभीर जखमी झाला. शुक्रवारी सकाळी ११ वाजता हा भीषण अपघात घडला. यानंतर संतप्त नागरिकांनी हिवरखेडनजीक वाहन गाठून त्याची तोडफोड केली.

ठळक मुद्देतिघे जखमी : मोर्शी, शिरजगाव येथे अपघात

लोकमत न्यूज नेटवर्कमोर्शी : वरूड मार्गावर सेेंट्रल बँक आॅफ इंडियापुढे खासगी बसच्या धडकेत दुचाकीवरील युवक ठार झाला, तर त्याचा सहकारी गंभीर जखमी झाला. शुक्रवारी सकाळी ११ वाजता हा भीषण अपघात घडला. यानंतर संतप्त नागरिकांनी हिवरखेडनजीक वाहन गाठून त्याची तोडफोड केली.नीलेश केशवराव बोंडे (२७, रा. खोलवाटपुरा) असे मृताचे व सागर शिवहरी बोंडे (१८) असे जखमीचे नाव आहे. नीलेशचे निंभोरा रोडवर भाजीपाल्याचे दुकान असून, तो दलालीदेखील करीत होता. तो एमएच २७ सीएफ ०२०१ क्रमांकाच्या दुचाकीने डेपो मार्गे घराकडे निघाला होता. यादरम्यान त्याचा बारावीतील पुतण्या समीर हा आर.आर. लाहोटी विज्ञान महाविद्यालयाजवळून दुचाकीवर बसला. सेंट्रल बँकेपुढे अमरावतीवरून मुलताईकडे जाणाऱ्या एमपी ०५ पी ०३५४ क्रमांकाच्या खासगी बसने दुचाकीला धडक दिली. त्यामुळे नीलेशचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले व तो बसच्या चाकाखाली आला. डोक्याला जबर दुखापत झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. समीर बोंडे याच्याही डोक्याला जखम असून, तो गंभीर जखमी आहे.अपघातानंतर चालकाने बस पळविली. मात्र, संतप्त नागरिकांनी पाठलाग करून बस हिवरखडेनजीक बस अडविली आणि काचा फोडून संताप व्यक्त केला. चालक मोबीन अहमद अ. रशीद मन्सुरी (रा. माहुली जहागीर, मूळ रा. खानापूर, ता. मोर्शी) याला मोर्शी पोलिसांनी अटक केली. चालकाविरुद्ध भादंविचे कलम २७९, ३०४ अ, ३३७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. मोर्शीचे ठाणेदार राजेश राठोड यांच्या मार्गदर्शनात पुढील तपास एएसआय नामदेव राठोड, हेडकॉन्स्टेबल कुंदन मुधोळकर करीत आहेत.शिरजगाव कसबा : स्थानिक पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन दुचाकींमध्ये शुक्रवारी सकाळी गजानन महाराज मंदिरजवळ टर्निंगवर घडली. दत्तात्रय जोशी (रा.शिरजगाव कसबा) असे मृताचे नाव आहे. ते निवृत्त बीएसएनएल अधिकारी होते. त्यांची जखमी पत्नी संजीवनी यांना परतवाडा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.जोशी दाम्पत्य एमएच २७ बीआर १८४३ क्रमांकाच्या दुचाकीने परतवाडाकडे जात होते. दरम्यान, सकाळी नऊ वाजताच्या सुमारास शुभम संजय नांदुरकर (२३, रा. शिरजगाव कसबा) याच्या एमएच २७ एएक्स ११७१ क्रमांकाच्या दुचाकीने धडक दिली. शुभम हा परतवाडा येथे दाखल आहे. अपघाताची माहिती मिळताच शिरजगावचे ठाणेदार मुकूंद कवाडे यांनी अपघाताचा पंचनामा करून गुन्हे दाखल केले आहेत. सदर गुन्ह्याचा तपास शिरजगाव पोलीस स्टेशनचे हेडकॉन्स्टेबल सुने करीत आहेत.