फोटो पी १५ धामणगाव फोल्डर
धामणगाव रेल्वे : तालुक्यातील मंगरुळ दस्तगीर येथील स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना अवघ्या चार तासांत गजाआड करण्यात आले. ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने सोमवारी ही कारवाई केली.
सदर पथकाने तात्काळ मंगरुळ दस्तगीर येथे पोहोचून तांत्रिक पुराव्याच्या तसेच गोपनीय माहितीच्या आधारे एटीएम. फोडणाऱ्या सूरज गजानन शेंदरे (१९), मयूर सुखदेवराव क्षीरसागर (१८, दोन्ही रा. मंगरुळ दस्तगीर) यांना ताब्यात घेऊन विचारपूस केली असता, त्यांनी सदर गुन्ह्याची कबुली दिली. १५ मार्च रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक विजय गराड, सपोउपनि मुलचंद भांबूरकर, पोलीस जमादार सुनीत केवतकर, नायक पोलीस शिपाई बळवंत दाभणे, मंगेश लकडे यांचे पथक चांदूर रेल्वे उपविभागात जिल्हा गस्त करीत होते. तेव्हा मंगरुळ दस्तगीर पोलीस ठाण्याकडून त्यांना एटीएम फोडण्याबाबत माहिती प्राप्त झाली. त्यावर तातडीने दोन्ही आरोपींच्या मुसक्या आवळण्यात आल्या.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक हरिबालाजी एन, अपर पोलीस अधीक्षक श्याम घुगे यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखा, ग्रामीणचे पोलीस निरीक्षक तपन कोल्हे, तसेच मंगरुळ दस्तगीरचे ठाणेदार श्याम वानखडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक विजय गराड, सपोउपनि मुलचंद भांबूरकर, पोहेकां सुनीत केवतकर, नापोकां बळवंत दाभणे, मंगेश लकडे, चालक नितेश तेलगोटे यांनी केली.
पान ३ चे लिड
———————-