शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
4
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
5
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
6
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
7
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
8
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
9
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
10
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
11
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
12
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
13
आयोग नव्हे, मतदारच राजा !
14
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
15
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
16
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
17
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
18
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
19
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
20
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले

अडीच हजार अंगणवाड्या बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2017 23:34 IST

महिला व बालविकास विभागाने अंगणवाडी कर्मचाºयांसाठी जाहीर केलेला मानधनवाढीचा प्रस्ताव वर्षभर रखडल्याने जिल्ह्यातील २४०० हजार अंगणवाडी कर्मचारी सोमवारपासून बेमुदत संपावर गेले आहेत.

ठळक मुद्देकर्मचाºयांचा संप सुरू : मानधनवाढीसह विविध मागण्या

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : महिला व बालविकास विभागाने अंगणवाडी कर्मचाºयांसाठी जाहीर केलेला मानधनवाढीचा प्रस्ताव वर्षभर रखडल्याने जिल्ह्यातील २४०० हजार अंगणवाडी कर्मचारी सोमवारपासून बेमुदत संपावर गेले आहेत. शासनाने मानधनवाढीचे दिलेले आश्वासन फोल ठरल्याने संतप्त अंगणवाडी कर्मचाºयांनी आता कोणत्याही ठोस कृतीनंतरच संप मागे घेण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे जिल्हाभरातील सुमारे अडीच हजार अंगणवाड्या बंद पडल्या आहेत.विविध मागण्यांबाबत आंदोलनाच्या माध्यमातून ग्रामविकास व महिला बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांना निवेदने देण्यातद आली. त्यावेळी पंकजा मुंडे यांनी मानधनवाढीचा प्रस्ताव तयार झाला असून आठ दिवसात मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेऊन मागण्या मंजूर करून घेण्याचे आश्वासन दिले होते. परंतु यालाही बराच कालावधी लोटून गेला आहे. त्यामुळे अंगणवाडी कर्मचारी संपावर ठाम आहेत.सन २०११ सालापासून इंधनासाठी देण्यात येणाºया रकमेमध्येही वाढ झालेली नाही. तेव्हा इंधनाच्या बिलामध्य्े वाढ व्हावी, अशी मागणीही शासन दरबारी केली. मात्र याचीही दखल घेतली नाही. परिणामी आता न्याय मागणीसाठी अंगणवाडी कर्मचाºयांनी हा संप पुकारल्याचे सांगितले. शासन आता या संपावर काय निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान अंगणवाडी सेविका मदतनिस पर्यवेक्षिका कर्मचारी संघटनेने इर्वीण चौक येथून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला.यावेळीे संघटनेचे अध्यक्ष संजय मापले यांच्या नेतुत्वात जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी रतन गुजर, चंदा नवले,रेखा गुंबळे,शालीनी देशमुख, विमल बोरकुटे,पुष्पा मेश्राम, लता दहातोंडे,मंग़ला विधळे,मिना शहाने आदीसह मोठया संख्येने अंगणवाडी सेविका सहभागी झाल्या होत्या.