शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

अंजनगावात अडीच लाखांचे अवैध लाकूड जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2017 23:24 IST

वेळप्रसंगी विल्हेवाट लावण्यासाठी खुल्या जागेवर बेवारस ठेवलेला हजारो टन अवैध आडजात लाकडाचा साठा अंजनगाव सुर्जीत गुरुवारी जप्त करण्यात आला.

ठळक मुद्दे११ जणांविरूद्ध वनगुन्हे दाखल : खुल्या जागेवर बेवारस लाकडाला अभय कुणाचे?

लोकमत न्यूज नेटवर्कअंजनगाव सुर्जी : वेळप्रसंगी विल्हेवाट लावण्यासाठी खुल्या जागेवर बेवारस ठेवलेला हजारो टन अवैध आडजात लाकडाचा साठा अंजनगाव सुर्जीत गुरुवारी जप्त करण्यात आला. लाकूड साठा मोठ्या प्रमाणात असल्याने परतवाडा वनविभागाला क्रेनद्वारे लाकूड जप्त करावे लागले, हे विशेष. ११ जणांविरुद्ध वनगुन्हे दाखल करण्यात आले आहे.अमरावतीचे उपवनसंरक्षक हेमंत मिणा यांच्या आदेशाने लाकूड तस्करी रोखण्याठी धडक मोहीम हाती घेण्यात आली आहे. परतवाड्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी एस.बी. बारखडे यांच्या मार्गदर्शनात अमरावती फिरते पथकाचे वनपरिक्षेत्राधिकारी महेश धंदर यांच्या चमूने ही कारवाई फत्ते केली. लाकूड साठा हा जुने बसस्टँडचे उत्तरेकडील बाजूस शहानूर नदी पात्रालगतच्या भागात ठिकठिकाणी साठवून ठेवलेला वनविभागाला आढळला. य्ाामध्ये निंब, चिरेल, महारूख, पिंपळ, जामून, गोंदन, बाभूळ प्रजातीचे २९० नग व ४८.८६८ घनमीटर लाकूड आढळले. २ लाख ६७ हजार ६४६ रुपये किंमत वन विभागाने ठरविली आहे. याप्रकरणी भारतीय वन अधिनियम १९२७ चे कलम ४१, ४२ महाराष्टÑ वन नियमावली २०१४ चे नियम ३१, ४७ चे उल्लंघन झाल्यामुळे आरोपींवर गुन्हे दाखल झाले.वनविभागाची कारवाईशे. आशिक शे. हसन, नाजुउद्दीन अल्लाउद्दीन, इम्रान खान, शफावत खान, रफीक शहा भोला शहा, शे. आशिक शे. युनुस, सलीम शहा भाऊ शहा, फारुख शहा जमीर शहा, अशोक बठाळे, जुबेर उद्दीन नसीम उद्दीन, अ. नसीम अ. कलाम (सर्व रा. अंजनगाव सुर्जी) यांच्याविरुद्ध वन गुन्हे दाखल करण्यात आले आहे. या जम्बो कारवाईत दर्यापूरचे वनपाल जी. व्ही. आमले, परतवाडा वनपाल बी. आर. झामरे , वनपाल एम.डब्ल्यू. वाटाणे, वनरक्षक एस.बी. बरवट, एम.जे. ठाकूर, बी.आर. पवार, पी.ए. कले, जे.टी. भारती, निर्मळ, वाटाणे, पालीयाड, तायडे, भोंडे, इंदोरे, वनपाल इंगळे आदींनी सहभाग घेतला.

टॅग्स :forestजंगल