वरूड : मोर्शी विधानसभा मतदारसंघाचे आमदार देवेंद्र भुयार यांच्या स्थानिक विकास निधी कार्यक्रम २०२०-२१ अंतर्गत वरूड, मोर्शी तालुक्यांमध्ये आरोग्य व्यवस्थेचे सक्षमीकरण करण्यासाठी दोन अद्ययावत रुग्णवाहिका नागरिकांच्या सेवेत रुजू झाल्या . या रुग्णवाहिकांचे लोकार्पण शेतकरी भवन येथे माजी कृषिमंत्री हर्षवर्धन देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी आ. देवेंद्र भुयार, नगराध्यक्ष स्वाती आंडे, मोर्शीच्या नगराध्यक्ष मेघना मडघे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष रमेशपंत वडस्कर, सदस्य राजेंद्र बहुरूपी, राष्ट्रवादीचे वरूड तालुकाध्यक्ष बाळू कोहळे, राष्ट्रवादी मोर्शी तालुकाध्यक्ष नरेंद्र जिचकार, नगरसेवक डॉ. प्रदीप कुऱ्हाडे, नगरसेवक ढवळे, नगरसेवक महेंद्र देशमुख, शिवसेनेचे तालुकाध्यक्ष विजय निकम, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष जितेंद्र शाह, सुधाकर बेले, संजय डफरे, संजय कानुगो, बंडू साऊत, प्रभाकर काळे, प्रफुल अनासाने, कमलाकर पावडे, रोशन दारोकर, संदीप खडसे, हितेश साबळे, ऋषीकेश राऊत, डॉ. नितीन दळवी, कृष्णा सोनारे, अभिजित पाटील, किशोर हेलोडे, किशोर चंबोळे, आकाश बेलसरे, स्वप्निल आजनकर उपस्थित होते. रुग्णवाहिकेमुळे तालुक्यातील रुग्णांना दिलासा मिळाला आहे.