शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने एकामागोमाग एक १५ गोल डागले; समोरचे '0'वरच पाहत राहिले
2
मुंबईकडे जाण्यासाठी रेल्वे स्थानकांवर गर्दीच-गर्दी; मराठा आंदोलकांवर रेल्वे पोलिसांचे लक्ष...
3
मोदी चीनमध्ये असताना डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा; म्हणे, भारताने टेरिफवर ऑफर दिली...
4
डोनाल्ड ट्रम्प यांची भगवा पार्टीने अंत्ययात्रा काढली, लोकांना तेराव्यालाही बोलावले
5
शक्य तितक्या लवकर मुंबईचे रस्ते सोडा...; मनोज जरांगे यांची मराठा आंदोलकांना सूचना
6
...तर आम्हीही लाखोंच्या संख्येने मुंबईत येऊ; OBC समाजाचा इशारा, मंत्री छगन भुजबळ जरांगेंवर संतापले
7
जगदीप धनखड कुठे आहेत? एका बड्या नेत्याच्या फार्महाऊसवर...; माजी आमदारांच्या पेन्शनसाठीही अर्ज...
8
अफगाणिस्तानात भूकंपामुळे हाहाकार, भारताने पुढे केला मदतीचा हात!१ हजार तंबूंसह काय काय पाठवलं?
9
PNB आणि बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी...; आजपासून स्वस्त झालं कर्ज!
10
WhatsApp हॅकर्सच्या निशाण्यावर? 'ही' चूक केल्यास तुमचा फोन होऊ शकतो हॅक!
11
"...तर यातून लवकर मार्ग निघू शकतो"; CM देवेंद्र फडणवीसांचा मराठा आंदोलकांना प्रामाणिक सल्ला
12
जीममध्ये पुरुष ट्रेनर महिलांना देतायेत ट्रेनिंग...! अलाहाबाद उच्च न्यायालयाने व्यक्त केली चिंता; म्हणाले...
13
"आता प्रशासन कोर्टाच्या निर्णयाचे उचित पालन करेल..."; CM देवेंद्र फडणवीसांचं रोखठोक मत
14
हॉटेलला पोहचूनही ५० मिनिटे कारमध्येच थांबले; मोदी-पुतिन यांची खास भेट, जाणून घ्या भेटीमागे काय?
15
५ वर्ष बेस्ट फ्रेंडच्या पतीसोबत अफेअर; पत्नीला भनक लागली, तिनं 'असा' बदला घेतला अख्खं शहर बघत राहिलं
16
लग्नाला २२ वर्षे झाली तरी 'तो' देतोय त्रास; पत्नीने थेट मुख्यमंत्र्याकडे मागितली इच्छामृत्यूची परवानगी
17
१४५ कोटींची लोकसंख्या मोजण्यासाठी खर्च किती? जनगणनेसाठी मागितले गेले एवढे पैसे...
18
रोहित शर्माची फिटनेस टेस्ट झाली; निकालही आला! किंग कोहलीचं काय?
19
मराठा आंदोलनात नियमांचे उल्लंघन, हायकोर्टाची नाराजी; राज्य सरकारला निर्देश, सुनावणीत काय घडले?
20
फक्त कारच नाहीत, १७५ वस्तू स्वस्त होणार, पण या वस्तू महागणार...

‘त्य“ १० आरोपींना दोन दिवसांचा पीसीआर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:22 IST

अमरावती : ठाण्यात येऊन आवाज चढविणे, आरडाओरड करून शासकीय कामात अडथळा आणून ठाणेदारांशी लोंबाझोंबी करून ठाण्यात गोंधळ घातल्याप्रकरणी ...

अमरावती : ठाण्यात येऊन आवाज चढविणे, आरडाओरड करून शासकीय कामात अडथळा आणून ठाणेदारांशी लोंबाझोंबी करून ठाण्यात गोंधळ घातल्याप्रकरणी राजकीय पक्षाच्या महिला पदाधिकाऱ्यांसह १० जणांना पोलिसांनी मंगळवारी अटक केली होती. त्यांना बुधवारी न्यायालयासमोर हजर केले असता, दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

पोलीस सूत्रानुसार अंबिका ललित अग्निहोत्री (२२, रा. विसावा कॉलनी, ह.मु. माताखिडकी), नेहा रोशन ढेंगे (३०, रा. मुक्ता सेंटर अपार्टमेंटनजीक, रहाटगाव), रुपाली बजरंग कोठार (३०, रा. कुंभारवाडा, महाजनपुरा) ललित रामसंजीवन अग्निहोत्री, भूषण गोविंदराव उईके, सौरभ धीरज निखाडे, सुमित हरिहरराव निखाडे, रोशन कृष्णराव घोरमाडे, राम मारोतराव तायडे, अभिजित अजय हिंगमिरे अशी आरोपींची नावे आहेत. आरोपींविरुद्ध भादंविचे कलम ३५३, १४३, १४७, १४८, १४९, १२० ब, १८६, १८८, १८९, २६९, २७०, २७१, सहकलम २, ३, ४ साथीचे रोग अधिनियम ५१ ब आपत्ती व्यवस्थापन अधिनियम सहकलम १२०, १७०, ११२, ११७, सहकलम ७ शासकीय गोपनियता अधिनियमानुसार गुन्हा नोंदविला.

मुख्य आरोपी अंबिका हिने गैरकायद्याची मंडळी जमवून पोलीस ठाण्यात दोन चारचाकी वाहनांसह आली. सोबत व्हिडीओ कॅमेरा आणला. आरोपी ठाणेदार आसाराम चोरमले यांच्याशी बोलताना अचानक आरोपींना शासकीय कामात अडथळा निर्माण करून ठाणेदारांशी हुज्जत घालून लोंबाझोंबी केली. ठाण्यात गोंधळ घालून घोषणाबाजी केली तसेच ललित अग्निहोत्री याच्या मोबाईलने अंबिका हिने पोलीस स्टेशनच्या कामकाजाचे व्हिडीओ चित्रीकरण करून ते फेसबूकवर पोस्ट केले. ठाणेदार चोरमले यांनी सहकारी पोलीस कर्मचारी यांच्यासमोर आरोपीला ताब्यात घेत असताना त्यांना मरणाच्या धमकी दिली तसेच तुमच्याविरुद्ध विधानसभेत लक्षवेधी लावतो, अशी धमकी दिली होती. या प्रकरणाचा अधिक तपास करण्याकरिता शुक्रवारी पीसीआर वाढवून देण्याबाबत न्यायालयाला विनंती करणार असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.