शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

बेलोरा विमानतळाचा वळण मार्ग निर्माण होणार

By admin | Updated: April 2, 2015 23:56 IST

बेलोरा विमानतळाचे विस्तारीकरण, सांैदर्यीकरणात खोडा ठरणारा यवतमाळ वळण मार्ग निर्मितीमधील अडचणी दूर

१९ कोटी रुपये प्राप्त : सार्वजनिक बांधकाम विभागावर जबाबदारीअमरावती : बेलोरा विमानतळाचे विस्तारीकरण, सांैदर्यीकरणात खोडा ठरणारा यवतमाळ वळण मार्ग निर्मितीमधील अडचणी दूर झाल्या आहेत. राज्य शासनाने अर्थसंकल्पात त्याकरीता १९ कोटी रुपयांची तरतूद केल्याने हा वळण मार्ग लवकरच निर्माण होणार आहे. जळू ते बेलोरा या दरम्यान ३.८० किलोमिटर रस्ता निर्मितीची निविदा प्रक्रिया सार्वजनिक बांधकाम विभाग राबविणार आहे.महाराष्ट्र विमानतळ कंपनीला बेलोरा विमानतळावर धावपट्टी, रस्ते निर्मिती, विद्युतीकरण, पाणी पुरवठा आदी महत्त्वाची कामे पूर्ण करुन हे विमानतळ एयरपोर्ट अ‍ॅथॉरिटी आॅफ इंडियाला द्यावे लागणार आहे. बेलोरा विमानतळावरुन प्रवासी विमाने सुरु करण्याचा मानस शासनाचा आहे. मात्र, बेलोरा विमानतळवर पायाभूत सुविधा असल्याशिवाय प्रवासी विमाने कशी सुरु करावी, हा प्रश्न निर्माण झाला आहे. २९ फेब्रुवारी २०१४ च्या शासन निर्णयानुसार बेलोरा विमानतळावरुन प्रवासी विमाने सुरु करण्याच्या मोबदल्यात एअरपोर्ट अ‍ॅथॉरिटी आॅफ इंडिया हे महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीला दरमहिन्याला एक लाख रुपये देणार आहे. मात्र, बेलोरा विमानतळावरुन प्रवासी विमाने सुरु करण्यासाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधा पूर्ण केल्याशिवाय काहीही शक्य नाही, हे वास्तव आहे. यवतमाळ वळण मार्ग हा अकोला राष्ट्रीय महामार्गाशी जोडणे आवश्यक असून ते काम पूर्ण झाल्याशिवाय विमानतळाचे विस्तारीकरण करता येणार नाही, ही बाब बेलोरा विमानतळाच्या प्रबंधकांनी शासनाला कळविली आहे. प्रवासी विमाने सुरू करण्याची लगबगबेलोरा विमानतळावरुन देशातंर्गत प्रवासी विमाने सुरु करण्याची लगबग एअरपोर्ट अ‍ॅथॉरिटी आॅफ इंडियाची आहे. विमानतळावर पायाभूत सुविधा पूर्ण होताच बेलोरा विमानतळ महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीकडून ताब्यात घेतले जाणार आहे. त्याअनुषंगाने शासन निर्णय देखील पारित करण्यात आला आहे. केवळ विमानतळावर पायाभूत सोयी सुविधांची प्रतीक्षा आहे.ना. फडणवीस, ना. गडकरींचा दौरामुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रिय भुपृष्ठमंत्री नितीन गडकरी हे अमरावतीत १० व ११ एप्रिल रोजी होऊ घातलेल्या कृषी मेळाव्याला विमानाने येत असल्याचा पार्श्वभूमीवर विमानतळ प्रबंधकांनी व्यवस्थेचा आढावा घेतला आहे. धावपट्टी, विद्युत व्यवस्था, पाणी पुरवठा आदीबाबत उणीवा राहू नये, याची दक्षता घेतली आहे. अद्यापर्यंत गडकरी, फडणवीस यांचा दौरा आला नसला तरी संभावित दौरा निश्चित होईल, असे संकेत आहे.बेलोरा विमानतळावरुन प्रवासी विमाने सुरु करण्याचे धोरण आहे. त्यानुसार शासन निर्णय असून विमानतळावर पायाभूत सोयीसुविधा निर्मितीवर भर दिल्या जात आहे. १९ कोटी रुपये प्राप्त झाल्यामुळे वळण मार्ग निर्मितीतील अडचणी दूर झाल्या आहेत. धावपट्टीची लांबी वाढविणे गरजेचे आहे.एम.पी. पाठकप्रबंधक, बेलोरा विमानतळ