लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : वझ्झर येथील स्व. अंबादासपंत वैद्य अनाथालयातील वैशाली व अनिल यांचा विवाह सोहळा ९ फेबु्रवारी रोजी होत असून, त्याची जय्यत तयारी श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या प्रांगणात झाली आहे. दरम्यान, शुक्रवारी खा. आनंदराव अडसूळ यांच्या घरी ते कन्यादान करीत असलेल्या वैशाली व नियोजित वर अनिल यांना हळद लागली. खासदार वधुपिता व पोलीस आयुक्त वरपिता असल्याने या हायप्रोफाइल विवाह सोहळ्याची उत्सुकता अमरावतीकरांना लागली आहे.वैशालीला शुक्रवारी खा. अडसूळ यांच्या निवासस्थानी हळद लागली. शहनाईच्या सुरात वैशालीच्या हातावर मेंदी चढली. सायंकाळच्या वेळी वऱ्हाडींच्या हर्षोल्हासात हळदीचा कार्यक्रम आटोपला. यावेळी खासदारपत्नी मंगला अडसूळ, मिनिषा अडसुळ, प्रणिता खराटे, वर्षा भोयर, मनीषा टेंभरे, सुनीता फिस्के, रेखा खारोडे, भावना कोंडे, अनिता सदाफळे आदी उपस्थित होते. खासदारांच्या घरात वºहाडीदेखील हळदीने माखले होते.दरम्यान, मंडळाच्या प्रांगणात प्रधान सचिव प्रभाकरराव वैद्य यांच्या पुढाकारातून विवाह सोहळ्याची जय्यत तयारी झाली आहे. नेहरू मैदानातून शनिवारी सकाळी नवरदेव अनिलची घोड्यावरून मिरवणूक निघणार असून, ती मंडळातील लग्न मंडपापर्यंत नेली जाणार आहे.सीपींनी घेतला अनिलसाठी लग्नबस्तापोलीस आयुक्त संजयकुमार बाविस्कर यांनी अनिलचे पालकत्व स्वीकारले असून, त्यांनी गुरुवारी अनिलसाठी लग्नबस्ता खरेदी केला. अनिलसाठी सुंदर कपडे व बूट खरेदी करून सीपींनी पालकत्वाची जबाबदारी सांभाळली.
हळद लागली, मेंदी सजली; आज लग्नसोहळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2019 22:24 IST
वझ्झर येथील स्व. अंबादासपंत वैद्य अनाथालयातील वैशाली व अनिल यांचा विवाह सोहळा ९ फेबु्रवारी रोजी होत असून, त्याची जय्यत तयारी श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या प्रांगणात झाली आहे. दरम्यान, शुक्रवारी खा. आनंदराव अडसूळ यांच्या घरी ते कन्यादान करीत असलेल्या वैशाली व नियोजित वर अनिल यांना हळद लागली. खासदार वधुपिता व पोलीस आयुक्त वरपिता असल्याने या हायप्रोफाइल विवाह सोहळ्याची उत्सुकता अमरावतीकरांना लागली आहे.
हळद लागली, मेंदी सजली; आज लग्नसोहळा
ठळक मुद्देहनुमान व्यायाम प्रसारक मंडळात जय्यत तयारी : मंत्र्यांसह शहरातील गणमान्य राहणार उपस्थित