शहरं
Join us  
Trending Stories
1
Uddhav Thackeray pats Raj Thackeray Video : कौतुकाची थाप..!! राज ठाकरे यांच्या भाषणानंतर उद्धव ठाकरे यांच्या कृतीने मराठी माणूस सुखावला...
2
Raj Thackeray : "तुमच्याकडे सत्ता विधान भवनात असेल, आमच्याकडे रस्त्यावर...",हिंदी सक्तीवरुन राज ठाकरेंचा राज्य सरकारला इशारा
3
"३० वर्ष झाली तरी मराठी माणसासारखी..."; सुशील केडियांनी राज ठाकरेंची जाहीर माफी मागितली
4
Uddhav Thackeray : "आमच्या दोघांमधला अंतरपाट अनाजी पंतांनी दूर केला"; उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला
5
Raj Thackeray : ठाकरेंची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकली, या आरोपावर राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
6
मराठी कलाकारांसमोर राज ठाकरेंकडून बॉलिवूडच्या ए.आर.रहमानचं कौतुक, सांगितला 'तो' प्रसंग
7
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: ...तर आहोत आम्ही गुंड; उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना आव्हान
8
"जे बाळासाहेबांना आणि इतरांना जमलं नाही ते फडणवीसांना जमलं’’, राज ठाकरे यांचं मोठं विधान
9
"एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी, आमचं एकत्र दिसणं महत्त्वाचं," उद्धव ठाकरेंचं सूचक विधान
10
Raj Thackeray : जास्त नाटकं केली, तर कानाखाली आवाज काढलाच पाहिजे; पण...; राज ठाकरेंचा 'सैनिकां'ना आदेश
11
सुरतेची "स्वारी" आता हुजरेगिरीसाठी उरली...; अमोल कोल्हेंचा एकनाथ शिंदेवर कवितेतून निशाणा
12
'मुंबई आकर सारी हेकडी निकाल दूंगा', पप्पू यादव यांचे राज ठाकरेंना चॅलेंज!
13
खळखट्याक सुरू; मराठीत बोलणार नाही म्हणणाऱ्या सुशील केडिया यांचं कार्यालय फोडलं
14
त्रिनिदाद आणि टोबॅगोच नव्हे, 'या' २५ देशांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलाय सर्वोच्च सन्मान!
15
"इथेच येऊन बिजनेस करता आणि...", सुशील केडियांवर संतापले भरत जाधव, म्हणाले- "मराठी माणसाने जागं व्हायला हवं..."
16
Zerodha च्या संस्थापकांचा मोठा इशारा, एक्सचेज आणि ब्रोकर्ससाठी वाईट ठरू शकतं हे वृत्त; का म्हणाले नितीन कामथ असं?
17
"…हे तर पुतना मावशीचे प्रेम!’’ भाजपाचा उद्धव ठाकरेंना टोला, ती उदाहरणं देत साधला निशाणा
18
Raj-Uddhav Thackeray Rally : "मराठी भाषेचा विजय झालाय!"; ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात सिद्धार्थ-भरत जाधव, तेजस्विनी पंडित दाखल, व्यक्त केला आनंद
19
आषाढीला करा उपासाची थंडगार रसमलाई; घरचे खुश होतील, पुन्हा पुन्हा मागून खातील!
20
'एअर इंडिया'च्या अडचणी संपेनात! ऐन उड्डाणाच्या वेळीच पायलटला चक्कर आली अन्...; कुठे घडला 'हा' प्रसंग?

तूर पहिल्यांदा उच्चांकी, १०४५१ भाव; बाजार समित्यांमध्ये वाढली आवक

By गजानन उत्तमराव मोहोड | Updated: June 2, 2023 18:12 IST

खरिपाच्या तोंडावर शेतकऱ्यांना दिलासा

अमरावती : पेरणीच्या तोंडावर तुरीच्या दरात रोज वाढ होत आहे. शुक्रवारी येथील बाजार समितीमध्ये ४११० क्विंटलची आवक झाली व उच्चांकी १०,४५१ रुपये क्विंटल रुपयांचा भाव मिळाला आहे. देशांतर्गत तुरीचे उत्पादन घटले आहे व यंदाची तूर फेब्रुवारी २०२४ नंतर बाजारात येणार आहे. त्याला आठ महिन्यांचा अवधी असल्याने तुरीची मागणी अन् भावही वाढले आहेत. त्यामुळे तुरदाळीच्या दरातही वाढ झालेली आहे.

जिल्ह्यात मागच्या हंगामात तुरीचे १.११ लाख हेक्टर क्षेत्र होते. यामध्ये अतिवृष्टी व सततच्या पावसाने ‘मर’ रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने किमान ३० ते ४० हजार हेक्टरमध्ये मोठे नुकसान झालेले आहे. याशिवाय कडाक्याची थंडीमुळे दवाळ गेल्यानेही काही प्रमाणात नुकसान झाल्याने सरासरी उत्पादनात कमी आलेली आहे. जिल्ह्यातच नव्हे तर देशातंर्गत तूर पिकाची अशीच स्थिती असल्याने तुरीची मागणी वाढली व दरातही सातत्याने वाढ होत आहे.मागच्या हंगामात तुरीला ६,६०० रुपये प्रति क्विंटल असा हमीभाव मिळालेला आहे.

प्रत्यक्षात हंगामात खासगी बाजारात तुरीला आठ हजारापर्यंत भाव मिळत असल्याने तुरीचे खरेदी केंद्र सुरु झालेच नाही. कृषी विभागाच्या माहितीनूसार यावेळी तुरीची उत्पादकता हेक्टरी ४०९ किलो राहिली आहे. उत्पादनात कमी आल्याने दरवाढ होत आहे. त्यामुळे तुरदाळीचे दरदेखील कडाडले आहेत.

टॅग्स :FarmerशेतकरीAmravatiअमरावतीagricultureशेती