शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

"नभ अंकुरले"कार तुळशीराम काजे काळाच्या पडद्याआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2018 15:17 IST

जुन्या पिढीतील चिंतनशील कवी म्हणून ख्यातीप्राप्त नभ अंकुरलेकार तुळशीराम काजे यांची रविवार, ९ सप्टेंबर रोजी रात्री ८.४५ वाजता दरम्यान प्राणज्योत मालवली.

ठळक मुद्देजुन्या पिढीतील कवीअमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्र्वर तालुक्यातील पुसनेर येथे अंत्यसंस्कार

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जुन्या पिढीतील चिंतनशील कवी म्हणून ख्यातीप्राप्त नभ अंकुरलेकार तुळशीराम काजे यांची रविवार, ९ सप्टेंबर रोजी रात्री ८.४५ वाजता दरम्यान प्राणज्योत मालवली. वर्षभरापूर्वी त्यांचा अपघात झाला होता. तेव्हापासून ते अंथरूणावर खिळले होते. अचानक प्रकृती खालावल्याने त्यांनी अमरावती येथील झेंडा चौकातील निवासस्थानी अखेरचा श्वास घेतला. सोमवारी नांदगाव खंडेश्र्वर तालुक्यातील पुसनेर येथे जन्मगावी त्यांच्यावर अंत्यसंस्कार पार पडले.तुळशीराम माधवराव काजे यांचा जन्म १८ मार्च १९३२ रोजी पुसनेर या लहानशा खेडेगावात झाला. नागपूर येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठातून त्यांनी एम.ए. (मराठी), बी.एड.चे शिक्षण घेतले. अमरावती जिल्ह्यातील वरूड तालुक्यातील लोणी येथे त्यांनी माध्यमिक शिक्षकाची नोकरी केली. दरम्यान काजे यांचा १९५८ साली नभ अंकुरले हा पहिला काव्यसंग्रह प्रकाशित झाला. दुसरा काव्यसंग्रह भ्रमिष्टाचे शोकगीत हा १९८३ मध्ये तर काहुरभैरवी तिसरा काव्यसंग्रह २००७ मध्ये प्रकाशित झाला. महाराष्ट्र शासनाने १९८४ साली तुळशीराम काजे यांना केशवसूत पुरस्काराने सन्मानित केले आहे. भ्रमिष्टाचे शोकगीत या काव्यसंग्रहाने त्यांचे नाव सर्वदूर प्रसिद्ध झाले. काजे यांनी १९५९ मध्ये धारा त्रैमासिकाचे प्रकाशन केले. मात्र, काही अडचणींमुळे ते फार काळ प्रसिद्ध करू शकले नाही. संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या मराठी भाषा अभ्यासमंडळात १९८७ ते १९९० पर्यंत त्यांनी तज्ञ्ज म्हणून काम केले. अमरावती येथील मराठी जनसाहित्य परिषदेचे अध्यक्षपद सन १९९० ते २००२ पर्यंत त्यांनी भूषविले. अमरावती जिल्ह्यातील वरूड येथे २००२ साली झालेल्या सातव्या मराठी जनसाहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाची धुरादेखील त्यांनी यशस्वीरीत्या सांभाळली. लोकमत, अक्षर वैदर्भी आणि मौज' या दिवाळी अंकात काजे यांचे काव्यसंग्रह प्रकाशित झाले. काजे यांनी कसोशीने, ओंजळीतल्या दिव्याप्रमाणे कविता जपली. संपूर्ण आयुष्य त्यांनी कवितेला समर्पित केले.काजे यांच्या निधनाने साहित्य क्षेत्रात शोककळा पसरली आहे. साहित्य क्षेत्रातील अनेकांनी त्यांचे अंतिम दर्शन घेण्यासाठी पुसनेर येथे धाव घेतली. त्यांच्या पश्र्चात पत्नी विमल, मानस मुलगी अलका उगले व नातू सुमित उगले आहेत.

टॅग्स :literatureसाहित्य